वाचन
वाचन
मनापासून वाचल्याने खूप काही उमगते,
नुसते नजर फिरवल्याने काहीच नाही समजते.
एखादे चरित्रात्मक पुस्तक म्हणजे एखाद्याच्या जीवनाचा आरसाच आहे किंवा एखादे काव्य म्हणजे लेखकाने लिहिलेला त्याचा भाव होय. आपल्या आयुष्यात येणाऱ्या संकटांना सामोरे जाण्यासाठी किंवा आलेल्या प्रश्नांना सोडविण्यासाठी, मोठ मोठ्या लेखकांचे अनुभवच पुरेसे आहेत. त्यासाठी त्यांची जीवन गाथा वाचणे, त्याला समजून उमगणे, फार महत्त्वाचे आहे.
मी वाचन करते म्हणून पुस्तकावरून नुसती नजर फिरवून त्यातले काहीच समजत नाही. परंतु तेच जर मनापासून एखादे साहित्य वाचनास घेतले तर ते आपले आयुष्यही बदलू शकते.
