वाचन क्षमता विकास
वाचन क्षमता विकास


वाचन क्षमता विकास.. वाचन ही एक अभिव्यक्ती आहे. आगळावेगळा छंद आहे. हा छंद जोपासला तर 'वाचाल तर वाचाल ' या युक्ती प्रमाणे lजीवनातील ध्येये उंच करण्यासाठी प्रेरणा मिळते. वाचनाने माणूस ज्ञानी बनतो. जीवनाला एक दिशा मिळते. विचारांची गती वाढते. चांगल्या विचारामुळे आपल्या मध्ये सुसंस्कार रुजतात. सामाजिक कार्य होण्याची शक्यता असते. चांगले कार्य घडते. जीवनात योग्य, अयोग्य याची जाणीव होते. वाचनाने माणसात अगणित बदल होऊ शकतात. माणूस अंतर बाह्य विचार करू शकतो. उत्तम नियोजन करू शकतो. विचारांची देवाण-घेवाण होते. तर या वाचनाचे दोन प्रकार 1) प्रकट वाचन 2) मूक वाचन. प्रकट वाचन - उदा... गोष्ट वाचनाची पद्धत - गोष्ट वाचताना योग्य विरामचिन्हांचे वाचन करावे. वाचनाचा ओघ असा हवा की अचूकता यावी. वेग नियंत्रित असावा. वाचताना भावना अभिव्यक्ती झाल्या पाहिजेत. योग्यता विरामचिन्हांचा योग्य त्या ठिकाणी वापर असेल ते व्यवस्थित वाचन करायला हवे. शब्दांचा वाचनात अचूक उच्चार व्हायला हवा. ध्वनीचा वेग आणि योग्य वापर व्हायला हवा. मुलांनी अस्खलित वाचणे गरजेचे आहे. योग्य स्पीड मध्ये वाचणे गरजेचे आहे. वाचन करताना अभिव्यक्ती मध्ये शब्द वाक्यात योग्य चढ-उतार व्हायला हवे. वाक्यांच्या शब्दांमध्ये चढ-उतार असेल तर कानाला गोड वाटते. विरामचिन्हांचा वापर यामध्ये योग्य विरामचिन्ह समजून घेऊन वाचून झालेच पाहिजे. वाचन ओघात झाले पाहिजे. थांबत थांबत वाचन करणाऱ्या मुलांना त्या वाक्यांचा अर्थ समजत नाही. शब्द समजत नाही. त्यांना दररोजचा वाचनाचा सराव देणे अपेक्षित आहे. सहज व अस्खलित वाचन करणाऱ्या मुलांना शब्द वाक्यांचा अर्थ समजून घेऊन उत्तम वाचन करता येते. काही मुलांचे वाचन खूप छान असते पण त्यांना शब्दांचा किंवा वाक्यांचा अर्थ समजलेला नसतो. अशावेळी मुलांना शब्द वाक्य यांचा अर्थ समजावून सांगणे अपेक्षित आहे. कोणत्याही वाक्यांचा शब्दांचा अर्थ समजून घेतल्याशिवाय योग्य वाचन होत नाही. यासाठी गट वाचन घ्यावे. गाढवाचं घेतले की कोणाला येत नाही हे समजते व चूक लक्षात येते. अशा मुलांना वाचनासाठी प्रोत्साहन देता येते. उच्चार गडबडी न होतात अशा मुलांना थांबवून त्याचा उच्चार नीट करायला लावता येतो. अशी मुले स्वतःची चूक दुरुस्त करू शकतात. रोजच्या सरावाने ते छान वाचन करू शकतात. शब्दांचा अर्थ समजून घेऊन वाचन करू शकतात. यावर दुसरा उपाय म्हणजे.. वाचन येणारा व वाचन न येणारा अशा जोड्या करून वाचनाची दिशा द्यावी. मुले ही अनुकरणप्रिय असतात. ते इतरांचे अनुकरण लवकर करतात. आपल्या मित्राचे अनुकरण करायला त्यांना काही अवघड वाटत नाही. अशावेळी अनुकरणप्रिय असणारी ही मुले मित्रांच्या सहवासाने उत्तम वाचन करायला शिकतात. तिसरा उपाय म्हणजे... शिक्षकांनी पालकांनी मुलांचे वारंवार वाचून घ्यावे. परत परत वाचन घेताना झालेल्या चुका त्यांना समजून सांगाव्यात. वाचनासाठी घेतलेला उतारा अगदी सोप्या शब्दांमध्ये असावा. मुलांना शब्दांचे अर्थ विचारावेत. ज्या मुलांना योग्य वाचता येते त्या मुलांची नोंद ठेवावी. ज्या चुका होतील त्या सुद्धा नोंद करून ठेवाव्यात. या चुकांना समजावून घेऊन होणाऱ्या चुका टाळाण्याचा प्रयत्न करावा. मुलांना योग्य त्या सूचना द्याव्यात. मूक वाचन - मूक वाचन करताना कोणाला कसे वाचन येते हे समजत नाही. या साठी आपण मुलांना मूक वाचन झाल्यावर काय वाचले? हे लिहायला लावावे.सारांश सांगायला लावावे.म्हणजे मुलांना वाचलेले समजलेय का हे आपल्याला समजते. वाचन ही कला आहे वाचनाने माणूस घडतो जीवनातीला ध्येय, उद्दिष्ट साकार करण्या धडपडतो.. वसुधा वैभव नाईक धनकवडी,जिल्हा -