वाचाल तर वाचाल
वाचाल तर वाचाल


*सुविचार* --वाचाल तर वाचाल
एका गावात पांडू नावाचा एक भंयकर मस्तीखोर मुलगा रहात होता.त्यामुळे त्याचे अभ्यासात अजिबात लक्ष नव्हते.सारखे खेळ मस्ती कळी काढणे. त्याचे आई वडील खूप कंटाळले होते.शाळेत बाईंनीही हरप्रकारे समजावले पण नाहीच होताच तो मस्त कलंदर.
खाणेपिणे मजेचे आयुष्य . आईबाबांना याचे खूप टेंशन येत असे.शाळेत पालकसभेस गेले की बाईंच्या आधी पालकच कंप्लेट करित.ते अगदी मेटाकुटीला आले. त्याचे मोठपणी कसे होईल याची काळजी सतत होत असे.
त्याचा मामा राधापूर गावात रहात असे. ते गाव खूप लांब होते.मधला रस्ता खूप अवघड होता.त्यामुळे त्याचे येणे जाणे नव्हते.त्या दिवशी तो अचानक बहिणीला भेटावयास आला.बहिणीने पांडूबद्दलची सारी हकिकत त्याला सांगितली.तो म्हणाला "काळजी करू नकोस. तसेच काही वाटले तर माझ्याकडे शिकायला .घराबाहेर राहिला तर कदाचित शांत होईल." विचार करुन सांगते असे बहिण म्हणाली भाऊ गेला.तितक्यात चार पाच माणसे पांडूची कंप्लेट घेऊन आली.ती वैतागली व पांडूला भावाकडे पाठवायचे ठरले.
पांडूला राग आला.तो म्हणाला" कुणी नको बरोबर जाईन मी एकटा. " आईने दिलेली शिदोरी व मामाचा गावचा रस्ता विचारून स्वारी निघाली मामाच्या गावाला.नाचत नाचत दगड फेकत.
जाता जाता दोन रस्ते लागले. दोन गावाकडे जाणारे. पण त्याला वाचता येत नव्हते. तिथे आजूबाजूला कुणीच नव्हते. त्याला कळेना कुणीकडे जायचे.दहा वीस करत जिथे शंभर आले त्या रस्त्यान
े जायचे त्याने ठरवले.पण मित्रांनो तो रस्ता जंगलाच्या दिशेने जाणारा होता.तो त्या रस्त्याने जाऊ लागला.खूप चालल्यावर त्याला वाघाची डरकाळी ऐकू आली.मस्तीखोर पांडूची पाचावर धारण बसली .कुठे जाऊ कुठे नको असे झाले त्याला.चमकते वाघाचे डोळेही दिसले. आ________ई कुठे? घशातला आवाज घशातच अडकला. पटपट तो समोरच्या झाडावर चढला.जीवाच्या आंकाताने तो पटपट झाडावर चढला. तो पर्यंत वाघोबाची स्वारी झाडापर्यंत आली होती.त्याच्याकडे पाहून डरकाळ्या फोडत होता. पांडू तर गारद च झाला होता.त्याच्या तोंडचे पाणी पळाले. पोटात कावळे ओरडत होते. पण वाघाचे पोट भरण्याची वेळ आली होती. रात्रभर तो झाडावर राहिला. दिवास्वप्न पाहण्यापलिकडे त्याच्यापुढे पर्याय नव्हता. कंटाळून वाघाने काढता पाय घेतला. हळूच पांडू खाली उतरला .तो पळत सुटला. आणी पुन्हा त्या वळणावर आला. आता तिथे दोघेजण उभे होते. त्यांना पाटीवरचे वाचायला सांगितले.ते त्याला हसू लागले. त्यावर लिहिले होते या रस्त्याने जाऊ नका. पुढे घनदाट जंगल आहे. हिंस्त्र श्वापदे आहेत.
त्यावेळी त्याच्या डोळ्यसमोर आई, बाबा, शाळेतल्या बाई ,समजावणारे शेजारी आले.खरेच अभ्यास केला असता तर फळा वाचता आला असता. संकटात पडलो नसतो.
बाई फळ्यावर नेहमी सुविचार लिहित
'वाचाल तर वाचाल' याचा खराखुरा अनुभव पांडूने घेतला.मामाकडे नाही आपल्याच घरी अभ्यास करून मोठे व्हायचे असा निश्चय करुन बदललेला
पांडू आपल्या घराकडे निघाला.