उत्तर...
उत्तर...
कुंपणाबाहेरचे झाड अंगणातील कुंड्यातील झाडांना वाकून वाकून बघत होते.
किती कौतुक असते ना या झाडांचे नाहीतर आपण. ना कुणाचा आधार ना कौतुक.
एवढ्यात थकूनभागून आलेली भाजीवाली या झाडाच्या सावलीत येऊन बसली. तिच्या चेहर्यावरचे समाधान पाहून झाडाला त्याच्याच प्रश्नाचे उत्तर मिळाले आणि मनोमन ते खूप खुश झाले.
