Archana Dagani

Inspirational

3  

Archana Dagani

Inspirational

उमेद

उमेद

3 mins
206


आज प्रधान साहेब खूपच खुश होते, आणि खुश का नसतील त्यांचा एकुलता एक मुलगा रेयांश न्युरोलोजिस्ट झाला होता. सौ. प्रधनांची खुशी पण गग्नात मावत नव्हती. त्याही सारखा पदर डोळ्याला लावत होत्या. सुखाचे व खुशी चे आसू

आज थांबता थांबत नव्हते.


पण तीस वर्षा पूर्वी परिस्थिती इतकी सोपी नव्हती. रेयांश जेव्हा जन्माला आला तेव्हा तो आठव्या महिन्यात जन्माला आला. वजनाला कमी, अशक्त बाळ कसाबसा देवाच्या कृपेने खूप जतन करून वाचला होता.


प्रधान कुटुंब रेआंशलां घरी घेऊन आले. त्यांना वाटले होते दोन महिन्याच्या अथक परिश्रमा नंतर आपण सर्व जग जिंकलो. रेआंशलां वाचवण्यात त्यांना यश मिळाले होते. दोन महिन्याच्या दगदगी नंतर आता कुठे सर्व गोष्टी सुरळीत सुरू झाल्या होत्या.


रेयांश आता ४ महिन्याचा झाला होता. त्याच्या बाललीला बघण्यात वा त्याचं आवरण्यात दिवस अपुरा पड्यायचा नीलिमा ताईंना. दिवस सुखात चालले होते.


एकदा दुपारी जेवण झाल्यावर नीलिमा ताई सहजच टीव्ही बघत बसल्या होत्या, छोटा रेयांश बाजूलाच दिवाण वर झोपला होता आणि अचानक तो जोरजोरात हात पाय हलवायला लागला, तोंडातून फेस बाहेर येत होता, त्याने डोळे फिरवले होते, तो दात ओठ खात होता. नीलिमा ताई घरात एकट्याच असल्यामुळे, काय करावं त्यांना सुचलेच नाही. थोड्या वेळात रेयांश शुद्धीत आला. नीलिमा ताईंच्या जीवात जीव आला.त्यांनी प्रधांनाना फोन लावला व दोघे लगेच बाळाला जवळच्या रुग्णालयात घेऊन गेले. नांदेड शहरात त्या काळात मोठे रुग्णालय नव्हते.


डॉक्टरांनी त्यांना सांगितले की बाळाला फिट आली आहे. कधी कधी ताप असेल तर फिट येऊ शकते पण घाबरायचे काही कारण नाही. काही औषधे घेऊन बाळाला ते दोघे घरी घेऊन आले. दोघे सून झाले होते. बाळ औषधे घेऊन झोपला होता.


नीलिमा ताई बाळाकडे बघून एकटक अश्रू घाळीत होत्या. त्यांच्या डोक्यातून काही तासा पूर्वीची बाळाची झालेली अवस्था जाता जात नव्हती.


हळूहळू दिवसा आड बाळाला फिट्स येऊ लागल्या. औषधांचा फारसा काही फरक बळावर दिसत नव्हता. रेयांशची तब्येत दिवसेंदिवस खालवत चालली होती.


एक दिवस कोणी तरी प्रधानांना ऑफिस मध्ये सांगितले की पुण्याला बाळाला घेऊन जा. तेथे मोठे न्युरोलोगिस्ट आहेत , जे बालरोतज्ज्ञ पण आहेत. ते बाळाला बरं करतील. दोघेही बाळाला घेऊन पुण्याला गेले.


डॉक्टर चौधरी हे खूप मोठे तज्ञ होते. बाळाच्या सर्व तपासण्या करण्यात आल्या व त्यात कळले की बाळाला आईच्या गर्भात असताना डोक्याला मार बसला आहे म्हणून फिट्स येत आहेत. नीलिमा ताईंच्या डोक्यात लख्ख वीज चमकली. पाचव्या महिन्यात गरोदर असताना त्या बाथरूम मधून बाहेर येताना पयपुसणी मध्ये पायाचा अंगठा अडकून पोटावर पडल्या होत्या पण त्या वेळी त्यांना कसलाच त्रास जाणवला नव्हता. त्यांनी डॉक्टर कडे स्वतःची तपासणी पण केली होती, सर्व रिपोर्ट्स नॉर्मल आले होते आणि डिलिव्हरी पण नॉर्मलच झाली होती. बाळ premature होते खरे पण नंतर सर्व छान झाले होते.


बाळाच्या डोक्याला इजा झाली होती आणि तीही आतून. डॉक्टरांनी औषधे दिली पण ठोस इलाज असा नव्हता.


डॉक्टर चौधरीच्या औषधांमुळे थोडाफार फरक होता पण बाळाला मधून मधून फिट्स येतच होत्या.


रेयांशच्या आजारपणात प्रधान कुटुंबाचे खूप सारे पैसे आणि वेळ वाया जात होता, पण त्याला पर्याय नव्हता. रेयांश कडे दुर्लक्ष होईल म्हणून त्यांनी दुसरे मुल होऊ दिले नाही.


नीलिमा ताई रेयांश कडे खूप लक्ष्य द्यायच्या. रेयांश मोठा होऊ लागला होता. फिट्स मध्ये मध्ये येतच होत्या, पण त्याचा परिणाम त्यांनी कधीच रेयांशच्या अभ्यासात होऊ दिला नाही. त्या स्वतः त्याचा अभ्यास घायच्या. शाळा भरल्या पासून तर सुटे पर्यंत शाळे बाहेर बसून राहायच्या. रेयांशलां फिट्स येत होत्या पण तो अभ्यासात फार हुशार होता. नेहमी शाळेत पहिला असायचा. खूप अडचणींना सामोरे जाऊन रेयांशलां डॉक्टर बनवण्यात प्रधान कुटुंबीयांना यश आले होते.


प्रधान कुटुंबाच्या मेहनतीचे फळ आज त्यांना मिळाले होते. आज रेयांश स्वतः एक न्युरोलोगिस्ट झाला होता. डॉक्टर चौधरी त्याच्या क्लिनीचे उद्घाटन करण्यास प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. उद्घाटनाची वेळ आली तेव्हा डॉक्टर चौधरी म्हणाले, "रेयांश उद्घाटनअचे खरे हकदर मी नाही तुझे आई बाबा आहेत. खूप अडचणी सहन केल्या या दोघांनी तुला इथवर पोहोचवण्यासाठी. खूप ठेचा खाल्या. प्रधान व सौ. प्रधानांनी रिबीन कापली आणि आपल्या मुलाला अशक्य असे काहीच नाही हे न सांगताच सांगून दिले. जगण्याची नवी उमेद दिली. स्वतः साठीच नाही तर दुसऱ्यांसाठी पण.


जगात अशी किती मुले असतात ज्यांना आपण स्पेशल चाईल्ड म्हणतो पण ही मुले खरोखरच खूप स्पेशल असतात.


आई वडिलांनी न थकता, त्यांचा तिरस्कार न करता खंबीरपणे आपल्या मुलांना पूर्ण पाठिंबा द्यावा. शारीरिक व बौदधिक पातळीवर त्यांना फुलवावे. आयुष्यात त्यांना स्वतःच्या पायावर उभे राहण्यास मदत करावी हीच अपेक्षा.


धन्यवाद 🙏


कथा आवडल्यास शेअर, लाईक, कमेंट नक्की करा.



Rate this content
Log in

Similar marathi story from Inspirational