STORYMIRROR

Priyanka Damare

Comedy Horror Romance

3  

Priyanka Damare

Comedy Horror Romance

त्या रात्री प्रचंड पाऊस होता..,

त्या रात्री प्रचंड पाऊस होता..,

2 mins
250

त्या रात्री पाऊस प्रचंड येत होता आणि माझ्या डोक्यात विचारांचा कल्लोळ चालला होता .माझा देह घरात निपचित पडून होता आणि पाऊस आणखी आणखी कोसळत होता मी अस्थिर होते त्या अशांत रात्री जणू भीती जाणवत होती कसली तरी अचानक होणाऱ्या आभासाची चाहूल असेल कदाचित त्या रात्रीचा पाऊस थांबतच न्हवता अगदी त्या अचानक येणाऱ्या विजेप्रमाणे डोक्यात विचार येऊन सतत माझ्या डोळ्यांमधून चमकत होता आणि लगेच धूसर वाटू लागायचा ..पाऊस नव्हे तर विचार म्हणतेय मी पाऊस येणार ह्या कल्पनेनेच सतत मोहित होणारी मी, त्या रात्री घाबरत होती कुणास ठाऊक का पण?अलगद नको त्या विचारांना सावरत होते .मला धास्ती वाटत होती का कुणास ठाऊक पण कशाची? ती हे कळायला मार्गच न्हवता कारण त्या रात्री पाऊस प्रचंड होता.


मी खिडकीनजीक बसून असतांना माझे हात खिडक्यांचे थंडगार गज घट्ट पकडून सोडवत न्हवते .माझ्या पालथ्या मुठीवरन पावसाचे थेंब सरसर ओसंडत होते आणि श्वासाची लय मात्र कमी जास्त होत होती.हुरहुर भयानक वाढत होती बघता बघता त्याचक्षणी मागच्या खोलीतून धापकन काहीतरी पडण्याचा आवाज आला.माझे गारठलेले हात ताडकन गजावरून निसटलेत आणि उगाच छातीत काहीतरी धडधडून आता मात्र मला कळुन चूकल होत की बेटा आता माझी घाण लागणार जसा आवाज आला त्याक्षणी मी ठरवलं जायचं का थांबायचं?पण ह्यावर काही option च न्हवतं कारण घरात माझ्यखेरीज कुणीच न्हवत


त्यामुळे खोलीत कुणी जाण्याचा कारण न्हवत कारण जाण्याचा पर्यायच मी होते त्यामुळे अगदी जीव मुठीत घेऊन चोरपावलांनी मी जात होते आणि माझ्या पडणाऱ्या पावलापावलानंतर अगदी कडाडून ढग आरडाओरडा करत होते.मी तसतसे घाबरत होते मी पोहोचेस्तोवर हळूच डोकावून बघितले तर काय एक बिचारं मांजर धडपडल होत आणि थंडीने कुडकुडत घाबरून माझ्याकडे बघत होत .त्याक्षणी माझ्या विचारांचा कल्लोळ थांबला स्वतःच स्वतःशी हसून मला माझा फाजिलपणा वाटला क्षणभर हात डोक्यावर ठेवून मी हसले अन् पुटपुटले ,काय रे देवा ह्यासाठी च पाठवलंयस की काय पावसाला मुद्दाम माझी फजीती करायला म्हणूनच त्या रात्री पावसाने प्रचंड येण्याचे ठरवले अन माझ्या डोक्यात मात्र romance ऐवजी horror climax चे जाळे पसरवले कारण त्या रात्री पाऊस प्रचंड होता.


Rate this content
Log in

Similar marathi story from Comedy