मनातल पारतंत्र....
मनातल पारतंत्र....
एक पहाट निर्भीड वाटत होती जणू अभिमानाची कसल्या तर पारतंत्र्याच्या जोखमेतून बाहेर पडण्याची अश्या एका पहाटे एक चिमुरडी अगदी अल्लड गोड वाटावी अशी शाळेला निघाली होती कारण आज शाळेत स्वातंत्र्य दिन ना.आईचा हात पकडुन छोट्या छोट्या पावलांनी ती मोठं मोठं अंतर कापण्याचा प्रयत्न करत होती .कारण शाळेत जाऊन आज ती भाषण देणार होती. ती चिमुरडी तिची पावलं टाकत होती तितक्यात गर्दीतून एक जण ओरडला बाप नाही दिसतोय रे हीच कुठे गेला?
ह्यांना सोडून पळून तर नाही नसेल आणि खदखद हसण्याचा आवाज या गर्दीत एक झाला. चिमुरडीची आई पदर तोंडापाशी आणून फक्त आवंढा गिळत होती. माईकसमोर जाऊन तीच बोलणं ऐकायला सगळी गर्दी स्तब्ध राहिली. माझे बाबा ना सैन्यात होते मागल्या वर्षीच सैन्याच्या लढाईत देवाकडे गेलेत. कुजबुजलेल्या गर्दीत आता मात्र अनामिक शांतता पसरली आणि लोकांमधली उत्सुकता तिला ऐकण्यासाठी थांबली. ते माझ्या सोबत कायम राहणार आहेत घट्ट डोळे मिटून फक्त मला एकदा आठवशील मग बघशील तुझा बाबा तुला तुझ्या समोर दिसेल.
ऐकणाऱ्या गर्दीला सांगून तिने तिचे डोळे घट्ट मिटलेत तिचं अनुकरण करता सगळे तिच्यासाठी थांबत राहील. शहारलेल्या गर्दीला अचानक अलगद काहीतरी जाणवलं. अलगदपणे एक गुलाबाचं फुल येऊन तिच्या पुढ्यात पडलं. शहारलेल्या गर्दीला आता मात्र बाबांचं येणं खरं वाटलं. चिमुरडीला ऐकून सगळ्यांच्या डोळ्यात अचानक पाणी दाटलं...
