STORYMIRROR

Priyanka Damare

Others

3  

Priyanka Damare

Others

पाठवणी...

पाठवणी...

1 min
199

ती रडत होती नकळतचं सगळ्यांना रडवत होती ती मोकळी होत होती मनाने, अश्रू ढाळीत होती सहजपणे कुणास ठाऊक का पण माझ्यामते तिला बालपण तर आठवत नसेल जरी ती तिची पाठवणी असेल. ती स्वतःला थांबु पाहत होती पण तिची वेळ मात्र जाण्याची होती कदाचित तो दुसरा जन्म असेल जर पहिला जन्मही रडण्याने सुरू होत असेल तर दुसर्याचा ही आरंभ रडणे का नसेल ?


काही क्षणापूर्वी साजरा होणार आनंदाचा सोहळा ,तिच्या जाण्याच्या कारणाने गहिवरून आलेला तो क्षण एवढ्या स्तब्ध अन् अवचित होता की मांडवात तिच्याव्यतिरिक्त कुठलाच विषय नव्हता .तिच्या आयुष्याचा सबंध प्रवास एका अनामिका सोबत सुरू होणार होता आणि तिच्या रडण्यात घरच्यांचा संपूर्ण सहवास जाणवत होता. आई-वडिलांना सोडून जाणे तिला अवघडतच होते पण सतत चिडवणार्‍या भावाच्या मिठीत मात्र आज तिचे मन घट्ट होत होते.

आई वडिलांनंतर कदाचित तोच एक तिला समजून घेणारा होता म्हणूनच कदाचित तो देखील तिच्या मिठीतून स्वतःला सोडवत नव्हता कारण त्यांची हक्काची बहिण त्या दिवसापासून त्याची असूनदेखील तिच्या नवऱ्याची बायको होणार होती.तिचे त्या क्षणी रडणे नक्कीच रास्त असणारे होते कारण जणू माहेरचे ऋण तिला जन्मासहित आठवण्यात व्यस्त होते.


Rate this content
Log in