Priyanka Damare

Tragedy Others

2  

Priyanka Damare

Tragedy Others

एक पत्र असंही...

एक पत्र असंही...

1 min
131


वाट चुकलेले असता एक पत्र मला सापडले मी वाटसरु होते विचार करत होते ,पत्र उचलायचं का नाही त्यावर, साध्या सरळ एक पत्र होतं तरी उचलून वाचायचं धाडस होत नव्हतं कारण मला जाणवत होतं की ते कदाचित माझ्यासाठी नव्हतं मी उचलुन पाहील उघडलं चाळलं जसजशी पत्राच्या सुरुवातीकडे गेले तसतशी त्यात काळजी जाणवली नंतर मात्र मन जड व्हायला लागलं पत्र होतं एका अर्धवट शिकलेल्या तरुणांच ज्यातं त्याच्या स्वतःविषयी किळस तर जवळच्यांविषयी काळजी होती.


ते पत्र होतं का मुलाचं कंटाळलेल्या आयुष्याला मोठ्या मिन्नतवारीने आई बापांसमोर समाधानी हसतमुख जगतांना दाखवत होता ते पत्र होतं का नवऱ्याचं संसाराच जड ओझं कुठलाच त्रागा न करता पेलत होता ते पत्र होतंय एका बापाचं ज्याच्या दर संध्याकाळी येण्याने मुलाच्या डोळ्यात आतुरतेची चकाकी यायची इतरांच्या गरजेची पूर्तता करता करता त्याच्या स्वतःच्या असुरक्षितपणाची भावना त्या पत्रात जाणवत होती. पश्चात्ताप, विटंबना, दारुण पराभव या पलीकडे जाऊनही कुठेतरी काळजीची आस त्या पत्रात जाणवत होती. इतरांच्या कितीतरी संकटापेक्षा त्याला त्याचं संकट मोठे होतं कारण कदाचित त्याचं मन पत्रामधे हरवलं होतं ते पत्र होत


माझं वाटसरू म्हणून असण्याचं आणि माझ्या वाटे त्याचं व्यक्त होण्याचं ते पत्र होतं विनवणीचं निसर्गाच्या अविरहित वागण्याचं पत्र होतं आर्जवाचं आयुष्याच्या सरते शेवटी येणार्या दुर्दैवाचं, ते पत्र होतं येऊ पाहणाऱ्या पावसाच्या सरीने निदान या मातीला सुगंध सुटेल ह्या आहेचं, ते पत्रं होतं एका संपूर्ण कुटुंबाचं आणि ज्याच्याशिवाय कुटुंब अपूर्ण आहे अशा एका शेतकऱ्यांच्या आत्महत्येचे.....


Rate this content
Log in

Similar marathi story from Tragedy