तुझ्या माझ्या संसाराला...
तुझ्या माझ्या संसाराला...
गौरीच्या लग्नाला दोन वर्ष झालेल होत. गौरी एका छोट्याशा गावातुन आलेली शेतकरी कुटुंबातील मुलगी. गौतम तिला बघायला आलेला पहीलाच मुलगा , त्याचा स्वभाव पाहून तिने त्याला होकार दिला. घरच्यांनाही गौतमच स्थळ आवडलेल. दोघांचा थाटामाटात लग्न झाल. गौरी छान सुखात नांदत होती. गौरी दिसायला खुप सुंदर होती. तिचे काळे कुरळे केस, हळूहळू उमलणार्या चाफेकळीसारखे सुंदर नाजूक ओठ, कापणीला आलेल्या गव्हाप्रमाणे सोनेरी वर्ण, कस्तुरी मृगासम काळे नक्षीदार डोळे , कमनीय बांधा आणि कुणालाही भरळ घालेल अस तिच निखळ मनमोहक सौंदर्य. तशी ती साधीच राहायची, पण सगळे तिच्याकडे बघत असायचे. गौतमच स्वतःचा व्यवसाय होता. ती त्याला घरी बसण्यापेक्षा मदत करायला जायची. तेव्हा येणारे जाणारे आणि शेजारी राहणारे मुले, माणसे तिच्याकडे बघत असायचे. पण ती कधीही लक्ष देत नव्हती. ती बिचारी तिच्या कामात दंग असायची. या लोकांच्या नजरा अश्याच असतात. आपण दुर्लक्ष केलेल बर म्हणुन ती कुणाकडे बघतच नव्हती पण जर तिला कुणी काही म्हटला तर ती त्याला दाखवायच एवढी ती खंबीर होती. तिचा नवरा गौतम खुप समजदार आणि त्याचा गौरीवर स्वतःपेक्षाही जास्त विश्वास होता. गौतमला या सगळ्या गोष्टी माहीती होत्या. पण तोही लक्ष देत नव्हता. लोकांच्या नजरा वाईट आहेत, कुणी बाई सुंदर दिसली की तिला त्रास देणे, वाईट नजरेने बघणे काही लोकांना अश्याही वाईट प्रवृत्तीची लोक असतात. गौतम सरळ, साध्या विचारांचा माणुस होता. त्यालाही एक बहीण होती. त्यामुळे तो गौरिला कधी काही बोलत नव्हता. गौतम आणि गौरी आनंदाने राहत होते. खुप छान दिवस जात होते.
दोघांचा सुखी संसार चालू असतो. त्याचे आईवडील गावाकडून मुलाला आणि सुनेला भेटायला येतात. तेव्हा तिच्या सासुला गौरी विषयी काही गोष्टी कळतात. शेजारच्या बाईने एक च्या दोन सासुला सांगितल्याने तिने गौरीला बोलायला सुरूवात केली. " तु बाहेर जात जाऊ नकोस, घरचच काम करत जा, " अस सासुने गौरीला सांगितल. पण तिची काय चुक झाली तिला कळल नाही. त्यादिवशी गौरीला शांत बघून गौतमला कळल की नक्किच आई गौरीला काहीतरी बोलली असणार. गौतमने गौरीला जेवण करताना विचारलही पण तिने आई मुलामध्ये वाद नको, म्हणून तिने विषय काढला नाही. गौतमच्या शेजारी राहणार्या काकु त्याच्या आईला भेटायला आल्या. गौतमची आई आणि काकु दोघीही छान गप्पा मारत होत्या. आई त्या काकुंना गावाकडच सगळ सांगत होत्या. गौरीने दोघींसाठी मस्तपैकी आल्याचा चहा आणुन दिला. तेव्हा गौरीला पाहुन काकु म्हणाल्या, " ताई, खरच सुनेच्या बाबतीत नशीब काढल म्हणायच तुम्ही, खरच गौरी खुप छान गुणाची मुलगी आहे. अगदी माझ्याशी तर आईसारखच बोलती हो. कुणी कधी काही बोलल तर मला येऊन सांगते. मी ही तिला माझ्या मुलीसारख समजुन सांंगते. " लोक काय हो काही बोलतात, उचलली जीभ अन् लावली टाळ्याला.. " तशी गत आहे लोकांची. गौरीच्या सासुबाई शांतपणे ऐकत होत्या. त्यांना आता समजल होत की आपण त्या बाईंनी सांगीतल काहीपण, त्यावर लगेच विश्वास ठेवून, शहानिशा न करता परक्या माणसाच ऐकून गौरीला काही बोललो... त्यांना त्यांची चुक समजली होती. त्या काकु घरी जातात. गौरी आत काम करत असते तेव्हा सासुबाई तिला स्वयंपाकात मदत करतात. तिच्याशी छान बोलतात. मायेने विचारपुस करतात. तो क्षण तर गौरीला आपली आईच बोलते अस वाटु लागल. मग सासुबाईंनी गौरीची माफीही मागितली. दुसर्या दिवशी ते गौतम आणि गौरीला आर्शिवाद देउन आपल्या गावी गेले. त्यांना गौतम आणि गौरीचा सुखाचा संसार पाहून मनाला खुप समाधान वाटल.
एक दिवस गौरीची शेजारी राहणारी मैत्रिण आली. गौरीला बोलण्यासाठी बर्याच दिवसांपासून एकमेकींना भेटता नाही आल म्हणुन गप्पांची चांगलीच मैफिल रंगली होती. संध्याकाळची वेळ होती. गौरीने मिनलसाठी काॅफी केली. थोड्या वेळानंतर मिनल गौरीला म्हणाली... " एक विचारू गौरी " हो विचार ना.. तेव्हा मिनल तिला म्हणाली... " तुला माहीती आहे ना त्या स्टाॅप जवळ नेहमी उभी असणारी टुक्कर मुले रोज तुला बघत असतात, तु काही बोलत का नाही ? " " हो मी बोलले त्यांना आणि मिनु, त्यांना काय काम आहे, बापाच्या जीवावर जगणारी ती मुल." लोक काय ग बघतात. आपण कश्याला लक्ष द्यायच. पण आपल्या वाटेला गेल्यावर तेव्हा त्याला सोडायच नाही... " तिच हे बोलण ऐकून आज मिनलला समजल होत की गौरी खुप स्ट्राँग आहे. " तस नाही ग, तुझी काळजी वाटली म्हणून मी हे बोलले.. " मिनलने अस म्हणताच गौरी म्हणाली. " अग माझी काळजी करायला गौतम आहेत की, ते माझ सुरक्षाकवच आहे ज्याने माझ संरक्षण होत कवच आहे. ज्याने माझ संरक्षण होत. त्यामुळे मला कसलीही भिती नाही. भले पुरूष माझ्याकडे बघत असतील पण चार हात लांबुनच बोलतात." " कुणी काही बोलल तर ते हाड तोडून टाकतील, तालमित जायचे ते. आपल्या नवर्याच कौतुक, तिच्यावरचा विश्वास, त्याच प्रेम व काळजी सगळच गौरी मिनलला सांगत होती. मिनलला तिच ऐकुन खुप छान वाटल... " खरच किती छान आहेत हे दोघे एकमेकांसाठीच बनलेले... " " खुप छान आहात तुम्ही दोघ. नशिब लागत अस समजुन घेणारा आणि काळजी करणारा नवरा भेटायला... गौरी तु मात्र लकी आहेस. गौरीच्या चेहर्यावर गोड स्माईल आली. मिनल आपल्या घरी जाते. तेव्हा गौरी किचनमध्ये जायला निघते... तेव्हा नेमका गौतम घरी येतो. तो मिनल आणि गौरीच बोलण चालू असताना आला होता. गौरी त्याच्याविषयी जे काही बोलत होती. ते ऐकून त्याला मनाला खुप छान वाटल.
गौतम गौरीचा हात धरून थांबवतो व तिला पाच मिनिट बस म्हणून सांगतो... ती ही बसते. आज त्याने गौरीसाठी मोबाईल गिफ्ट म्हणून दिला. तिचा मोबाईलचा थोडासा प्रोब्लेम झाला होता. हे गौतमच्या लक्ष्यात आल होत. गौरीला खुप आनंद झाला. तिने एवढ महागडा का आणला तुम्ही अस त्याला विचारल्यावर गौतम तिला म्हणाला... " असु दे ग. तु कधी काही स्वतःहून मागत नाही. ती मोबाईल बघत असताना, ती खुप आनंदात होती. गौतमला तिच्या चेहर्यावरच हे स्मितहास्य नेहमी बघायला आवडायच. तो दोघांसाठी चहा करून आणतो. तेव्हा त्याच्या हातचा तो स्पेशल चहा पिऊन तिला तरीतरी आली. दोघेही आज निवांत गप्पा मारत होते. गौतमने आज गौरीशी खुप गप्पा मारत होता. त्याने आज खास तिच्यासाठी वेळ काढला होता. मिनलच्या बोलण ऐकल्यामुळे गौतम गौरीला म्हणाला. " तुला कुणी काही बोलत असेल तर मनाला लावून नाही घ्यायच. आणि हो कुणी काही म्हणू देत गौरी... माझा तुझ्यावर खुप विश्वास आहे. आणि तुला मला सांगायची काही गरज नाही. मला सगळ दिसतय ना आणि तु दिवसभर माझ्याच सोबत असते. गौतम तिचही कौतुक करत होता. आज गौरीला मनाला खुप छान वाटल... " एका स्रीला नवर्याच्या तोंडून आपल कामाच कौतुकाचे दोन शब्द ऐकले की बर वाटत... " तिला अजुन काम करायला एक नवा उत्साह मिळतो. गौतम सांगत होता. कुठल्याही प्रसंगात आपण आपली साथ सोडायची नाही. नवरा बायकोच नात म्हणजे स्वर्गात पडलेली गाठ. Relationship मध्ये चंद्र - तार्याची गरज नसते, गरज असते ती प्रेम, विश्वास आणि रिस्पेक्टची. एकमेकांवर प्रेम करतो तर तेवढा विश्वासही हवा.
गौरी आज आपल्या नवर्याने केलेल कौतुकाचे शब्द ऐकून खुपच आनंदात होती. तिने मोबाईल बघितला त्यात तिच्या आवडीची मराठी गाणीही भरली होती. एक गाण लागल... दृष्ट लागण्याजोगे सारे गालबोटही कुठे नसे जग दोघांचे असे रचु की स्वर्ग त्यापुढे फिका पडे स्पप्नाहून सुंदर घरटे मनाहून असेल मोठे दोघांनाही जे जे हवे ते होईल साकार येथे आनंदाची अन् तृप्तीची शांत सावली इथे मिळे जग दोघांचे असे रचु की स्वर्ग त्यापुढे फिका पडे... गौरी त्या गाण्यांत हरवून जाते. तिला एवढी आनंदी आज तो पहिल्यांदा पाहत होता. तो तिला जवळ घेतो. दोघेही एकमेकांच्या मिठीत विसावतात. संसार सुखाचा होण्यासाठी नवरा - बायको ही संसाराच्या गाडीची दोन चाक असतात. दोघांनाही एकमेकांना समजून घेतल आणि नेहमी एकमेकांना साथ दिली तसेच नवर्याच्या कर्तृत्वाचा अभिमान बाळगणारी बायको आणि आपल्या बायकोने केलेल्या कामाच कौतुक करणारा तिचा नवरा हे गणित छान जमल की अनेक संसार सुखाचे होतात.

