STORYMIRROR

Crazy Headphones

Abstract Drama Romance

3  

Crazy Headphones

Abstract Drama Romance

ट्रेन मध्ये भेटलेली ती...भाग 4

ट्रेन मध्ये भेटलेली ती...भाग 4

4 mins
140

आता साक्षी आणि प्राची या दोघींची मैत्री अगदी घट्ट झाली होती. रोज chatting करणे, भेटल्यावर गप्पा मारणे सुरु झालं. असंच सहज एका संध्याकाळी एका नदीकाठी त्या दोघी गप्पा मारत बसल्या होत्या. तेवढ्यात त्यांचा dating चा विषय निघाला.

साक्षी : "प्राची, तू single आहेस की relationship मध्ये आहेस?"

प्राची : "नाही बुवा. मी single च आहे आणि तू?"

साक्षी : "मी पण single च आहे. पण तुला नाही का आवडत कोणी? म्हणजे तुझा नाही का कोणी crush वगैरे?"

प्राची : "नाहीये."

साक्षी : "खरंच का? नाही गं असं होऊच नाही शकत की तुला कोणीच नाही आवडत. कमीतकमी celebrities पैकी तरी कोणी असेलच ना."

प्राची : "हा. भरपूर celebrities आवडतात मला. असं कोणी एकच जास्त आवडतं असा विषय नाहीये."

साक्षी (शांतपणे) : "पण real मध्ये पण असेल ना कोणीतरी?"

(अचानक वातावरणात कमालीची शांतता आली होती तरी त्या शांततेत फक्त नदीच्या झुळूझुळू वाहणाऱ्या पाण्याचा आवाज येत होता.)

प्राची जरावेळ स्तब्ध होते नंतर शांतपणे बोलू लागते.

प्राची : "hmm. जरी कोणी आवडीचं असलं तरी काय फरक पडणार आहे? असं तर नाही ना की लगेच सर्वजण accept करणार आहेत..."

साक्षी : "अगं, का नाही करणार. जर तुला खरंच कोणी आवडत असेल आणि त्या व्यक्तीलाही तू आवडत असशील तर काय problem आहे?"

प्राची : "अगं, पण घरचे मान्य नाही करणार आणि लोकं पण..." (तीचं वाक्य मध्येच तोडत साक्षी म्हणते)

साक्षी : "लोक काय म्हणतील हा विचार तर अजिबात करू नकोस. तू लोकांना घाबरून राहिलीस तर आयुष्यात काहीही करू शकणार नाहीस."

प्राची पुन्हा शांत होते. कदाचित ती याच गोष्टीवर विचार करत बसली असेल. साक्षी तिचा mood परत नीट व्हावा म्हणून मस्करीत बोलते -

साक्षी : "Teacher... अहो, teacher.... पण तुम्ही सांगितलंच नाही की ती कोण व्यक्ती आहे ज्याच्यामुळे तुम्ही एवढ्या tension मध्ये आल्या. कमीत कमी जीजू चं नाव तरी सांगा."

प्राचीचा चेहरा शरमेनं लालबुंद झाला. साक्षीने ते हेरलं. साक्षीचा चेहरा काही सेकंदासाठी निर्विकार झाला होता पण तिने चेहऱ्यावरचे हावभाव बदलून पुन्हा हसतमुखाने तिला चिडवायला सुरुवात केली.

साक्षी : "ओहो... जीजूचा विषय निघाला तर तुझा चेहरा बघ कसा कसा tomato सारखा लाल झाला."

प्राची (आणखी embarrassed होते) : "गप. असं काही नाहीये."

साक्षी : "नाही नाही. असंच आहे. आता तर confirm झालं."

ती embarrassment मध्ये (चूप बस या अर्थाने ) तिला एक चापट मारते.

साक्षी (मस्करीत) : "ouch! बापरे बिचाऱ्या जीजूचं काय होईल... ही teacher बायको मारून मारून त्याचं भरीत बनवायच्या मागे दिसतीये."

प्राची : "गप ना गं... (Irritate होऊन ) तुला सांगायलाच नको होतं..." *Hmph*

साक्षी : "बरं बाई... मी गप्प बसते. तू नको रुसून बसू. बरं काय नाव आहे जीजूचं?" (प्राची साक्षी कडे रागाने बघते) "अगं, म्हणजे काय नाव आहे त्या पोराचं? आणि काय कामधाम करतो?"

प्राची पुन्हा silent झाल्यावर साक्षी उचकते तिच्यावर.

साक्षी : "काय चाललंय तुझं... लवकर सांग ना काय संगायचं ते . सारखी काय silent mode वर जातेस तू?"

प्राची : "um... अथर्व नाव आहे त्याचं. आम्ही सोबतच college ला होतो आणि आता colleagues आहोत."

साक्षी : "बघ. एवढीश्या गोष्टी साठी एवढा time लावलास."

प्राची स्वतःचा विषय टाळण्यासाठी म्हणते,

प्राची : "बरं. माझ्याविषयी खूप बोलून झालं. आता तुझ्याविषयी सांग. तुझा crush कोण आहे?"

साक्षी एकवारी प्राचीकडे पाहते. सूर्य आता मावळतीला आला होता. म्हणून मावळतीची लालसर किरणे तिच्या चेहऱ्यावर पडली होती. तिचा सौंदर्य त्या लालसर किरणांमध्ये देखील उठून दिसत होतं . तसेच उन्ह उतरल्यामुळं गार वारादेखील सुटला होता. साक्षी स्वतःची नजर तिच्यावरून हटवून नदीवर तरंगणाऱ्या मावळत्या सूर्याच्या प्रतिबिंबाकडे पाहत अगदी निर्विकार चेहऱ्याने म्हणते.

साक्षी : "माझं कोणी crush वगैरे नाही. मला या आधी relationship वगैरे मध्ये interest देखील नव्हता." साक्षीला माहित होतं की तिच्या भावना तसंही कोणी समजू नाही शकणार. तिला हेदेखील माहित होतं की एखादवेळेस प्राची आणि अथर्वचं relationship सर्वांना मान्य होईल पण तीचं नाही.तिला माहित होतं की जर तिने तिच्या भावना प्राचीपुढे व्यक्त केल्या तर कदाचित ही मैत्रीदेखील संपेल....साक्षी तिच्या चेहऱ्यावर हलकीशी smile आणून प्राचीकडे बघत म्हणते-

साक्षी : "प्राची, माझं (relationship च्या बाबतीत ) काय होईल ते तर मला माहित नाही, पण तुला जर काही मदत हवी असेल तर सांग, मी नेहमी तुझ्या पाठीशी राहील." (ती पुन्हा नदीकडे पाहू लागते. साक्षीच्या निर्विकार चेहऱ्याकडे पाहून प्राची एवढा वेळ शांत होती. पण आता वातावरणात जणू कमालीचं गांभीर्य भरलं होतं.प्राची काही बोलणार एवढ्यात साक्षी तिच्याकडे न बघता म्हणते,) "प्राची, घरी जा आता. नाहीतरी बराच उशीर झालाय."

प्राची : "साक्षी, तू पण चल. आपण सोब-..." (तिचं वाक्य पूर्ण व्हायच्या आधीचं साक्षी म्हणते,)

साक्षी : "मी जाईल थोड्या वेळानं. तू जा आधी."

प्राचीला काही कळत नाही पण वातावरणातील उदासीनता तिच्या लक्षात येते. पण ती अधिक काही न बोलता साक्षीला bye म्हणून जाते.

आता नदीच्या पाण्याचा प्रवाह संथ झाला होता. सूर्य मावळून गेला होता आणि अंधार पडायला सुरुवात झाली होती. तरी साक्षी तिथेच बसून होती. शून्यात पाहत बसली होती आणि विचार करीत होती, स्वतःच्या अनपेक्षित प्रेमाचा. कारण तिला माहित होतं, "Unrequited love does not die; it’s only beaten down to a secret place where it hides, curled and wounded .

The hardest thing to do is watch the one you love, love someone else..."


Rate this content
Log in

Similar marathi story from Abstract