STORYMIRROR

Crazy Headphones

Abstract Drama Romance

3  

Crazy Headphones

Abstract Drama Romance

ट्रेन मध्ये भेटलेली ती...भाग 1

ट्रेन मध्ये भेटलेली ती...भाग 1

2 mins
115

आज बऱ्याच दिवसांनी गावी जाण्याचा योग आला होता. कामामुळे सुट्टी घेता येत नव्हती, म्हणून आता कुठे घरी जाण्याची संधी मिळाली होती. Short hair गोरा वर्ण आणि हातात घड्याळ, red flannel(shirt ), white T-shirt आणि jeans असा पेहराव असलेली साक्षी ट्रेन मध्ये खिडकी जवळ बसली होती, खिडकी बाहेरील परिसराचे निरीक्षण करीत होती. गाडी प्लॅटफॉर्म वर थांबली. थंडगार हवेची झूळूक आली व साक्षीच्या अंगावर शहारा आला, म्हणून तिने खिडकीवर टेकावलेला हात मागे घेतला, तेवढ्यात तिची नजर प्लॅटफॉर्म वर उभ्या असलेल्या एका मुलीवर गेली. Black कुर्ती red leggings असा outfit आणि clutcher लावून सोडलेले मोकळे केस, रंग गोरा आणि शरीरयष्टी देखील सुडौल. Simple yet elegant look. "सुंदर!... ही जर ट्रेनच्या ह्या डब्यात येऊन बसली तर...." हा विचार चटकन तिच्या मनाला शिवून गेला. "श्या!! काय विचार करतेय मी... जाऊदे." असा विचार करून गाणी ऐकत बसली. तेवढ्यात ती नेमकीच समोर येऊन बसली. तिचा फोन काढून ती timepass करत बसली. तिच्या सोबत बोलायचं काही कारण नाही, काही संबंध नाही मग आपण कशाला बोलायचं, असा विचार करून साक्षी गपगुमान गाणी ऐकत बसली. वाऱ्यामुळे भुरुभरू उडणारे केस सावरत ती खिडकी बाहेर बघत बसली होती. साक्षी तिच्या कडेच पाहत बसली होती. तेवढ्यात ती म्हणाली, "आज जरा जास्तच हवा सुटली आहे ना?"

साक्षी कानातलं earphone काढत म्हणाली, "काय?"

ती म्हणाली, "मी म्हणले आज जरा जास्तच हवा सुटली आहे नाही का?"

साक्षी म्हणाली, "hmm. आजचं वातावरणच असं ढगाळ आहे."

ती म्हणाली, "तुम्ही कुठे उतरणार आहात?"

साक्षी म्हणाली, "मी पुढच्या station वर आणि तुम्ही...?."

ती म्हणाली, "मी पण."

*जरा वेळ स्तब्ध शांतता आणि ट्रेनचा झुकझुक आवाज *

ती : "अं.. आता पुढचं station येणार आहे. तुम्हाला पण उतरायचंय ना?"

साक्षी: हो. चला.

दोघी गर्दीतून वाट काढत दरवाजा जवळ पोहोचतात.ट्रेन स्टेशन जवळ आल्यामुळे slow होते. लोक platform वर उतरण्यासाठी धक्काबुक्की करत असताना तेवढ्यात कोणाचा तरी धक्का "ती"ला लागतो आणि तेवढ्यात साक्षी तिला स्वतः जवळ खेचते. ती जवळून आणखीनच सुंदर दिसते, असा विचार साक्षीच्या मनात येतो.well, she blushed at this moment पण मनातले भाव चेहऱ्यावर न दाखवता. ती म्हणते," तुम्ही ठीक आहात ना?"

ती स्वतःला सावरून म्हणते,"अं.. हो. थँक्स ??... तुमचं नाव?..."

साक्षी : "oh! हा.माझं नाव साक्षी आणि तुम... "

(तेवढ्यात ट्रेन थांबते )

सगळेजण उतरण्याच्या घाईत असतात मग गर्दी बरोबर साक्षी सुद्धा उतरली जाते.प्लॅटफॉर्म वर उतरल्यानंतर बघते तर 'ती' गायब.

"अरे यार! तिला नाव विचारायचं राहूनच गेलं..."असं म्हणून साक्षीने सुस्कारा टाकला.


Rate this content
Log in

Similar marathi story from Abstract