STORYMIRROR

Crazy Headphones

Abstract Drama Romance

3  

Crazy Headphones

Abstract Drama Romance

ट्रेन मध्ये भेटलेली ती...भाग 3

ट्रेन मध्ये भेटलेली ती...भाग 3

2 mins
156

बऱ्याच दिवसांनी घरी आल्यामुळे साक्षीचा mood प्रसन्न होता. म्हणून ती अशीच जरा गावात फेरफटका मारीत होती आणि जुन्या आठवणी ताज्या करीत होती. तेवढ्यात तिला आवाज आला, "साक्षी". तिने वळून मागे पहिले तर प्राची उभी होती.

प्राची : Hi.

साक्षी : oh! hi...

प्राची : आज इकडे कुठे?

साक्षी : काही नाही जरा फेरफटका मारत होते. अं.... एक विचारू?

प्राची : हो, विचार ना. एवढी काय formally बोलतेस. Casually बोल.

साक्षी : hmm. तू college ला आहेस की job करतेस?

प्राची : सध्या tutoring करतेय आणि B.Ed. देखील करतेय.

साक्षी (मस्करीच्या सुरात ) : oh! माझ्या समोर साक्षात Teacher उभ्या आहेत का? यार, मला teacher लोकांची खूप भीती वाटते...

प्राची (हसून ) : हो का... का बरं भीती वाटते?

साक्षी : अगं, म्हणजे आदरयुक्त भीती वाटते.

प्राची (साक्षीला चिडवत ) : हो का... म्हणजे माझी पण भीती वाटते की काय तुला?

साक्षी : एवढ्या सुंदर teacher ची कोणाला भीती वाटेल... (साक्षीला कळलं हे ऐकल्यामुळे प्राची blush करतेय म्हणून awkwardness कमी करण्यासाठी ती पुढे म्हणते) teacher, पण जर तुम्ही गणित शिकवायला सुरुवात केली तर मात्र मला खरंच भीती वाटेल.

अशा मस्तीमजाकमुळे तिचा mood देखील हलकाफुलका झाला होता.

प्राची : By the way, तू काय job करतेस ते तू सांगितलंच नाहीस.

साक्षी : मी accountant आहे. तसा तर माझा job पुण्यात आहे पण काही दिवसांची सुट्टी घेतली जरा आणि गावी आलेय.

प्राची : hmm. चांगली post आहे तुझी. (प्राची मस्करीत बोलते )तू स्वतः accountant असून गणिताला घाबरतेस काय?

साक्षी : हा, मग. Finance संबंधीच्या कामात चूक करून चालत नाही. म्हणून तर आपोआपच गणिताचा phobia झालाय मला...

प्राची (मस्करीत) : अच्छा, असं आहे का मग माझ्याकडे class लाव म्हणजे तुझा phobia(भीती) कमी होईल

साक्षी : बरं, madam ठीक आहे, लावू की मग class तुमच्याकडे .

(तेवढ्यात सहज 'ती' phone मध्ये बघते आणि तीचं time वर लक्ष जातं.)

प्राची : अरेच्या!! आपण एवढा वेळ गप्पा मारत बसलो की मी विसरलेच की मला उशीर झालाय.

साक्षी : oh sorry! माझ्यामुळे तुला उशीर झाला. बरं चल ठीक आहे, जा तू आता नाहीतर अजून उशीर होईल तुला.

प्राची : hmm. एक मिनिट, तुझा phone बघू. (ती पटापट साक्षीच्या phone मध्ये काहीतरी type करते) मी माझा number दिलाय तुला. आता आपण contact मध्ये राहू. चल निघते मग मी आता. Bye. (एवढं बोलून ती fast मध्ये निघून जाते.)

इथं साक्षी hang पडली कारण just आताच मैत्री झाली आणि ही एवढ्या लवकर number पण देऊन गेली. आता काय बोलावं हिला. 

तिच्या घाई घाईने जाणाऱ्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहत साक्षी हसून म्हणाली, "ही पोरगी कायम घाईतच असते.. "


Rate this content
Log in

Similar marathi story from Abstract