Sarita Sawant Bhosale

Tragedy Romance

3  

Sarita Sawant Bhosale

Tragedy Romance

तो, ती आणि पाऊस

तो, ती आणि पाऊस

7 mins
1.3K


बाहेर धोधोधोधो पाऊस पडत होता. आज जरा जास्तच पाऊस पडत होता. आरोहिला कॉलेजला जायचं होतं. आज प्रॅक्टिकल परीक्षा असल्यामुळे जाण गरजेचच होत, त्यात भाऊ सकाळी लवकर ऑफिस मध्ये गेल्यामुळे तिला कॉलेजला सोडायला कोणच नव्हते. आरोही आवरून बस स्टॉपवर आली तर कळाल बस खूप उशीर येतायत आणि रिक्षा पण लवकर मिळत नाहीत. आरोहिला खूप टेन्शन आलेलं परीक्षेला लवकर पोहचले पाहिजे. कोणत्या मैत्रिणीचा फोन पण लागत नव्हता. तेवढ्यात एक चार चाकी गाडी आरोही समोर येऊन थांबली. विंडो मधून आरोहिला गाडीत बसण्यासाठी सांगत होत कोणतरी. आरोहिने वाकून पाहिलं तर समर तिच्या कॉलेज मधला मुलगा जो तिचा सिनिअर होता. समर बोलला "कॉलेजलाच मी पण चाललोय, बस लवकर नाहीतर उशीर होईल". आरोहिला काय कराव सुचत नव्हतं पण कॉलेजमध्ये लवकर पोहचायच होत म्हणून ती गाडीमध्ये बसली. बसल्यापासून ती हाच विचार करत होती की याच्याशी काय बोलू? याने कशी गाडी थांबवली? तिला माहीत होतं समर कोणत्याच मुलीशी जास्त बोलायचा नाही. त्याची आणि आरोहिचीही फक्त तोंडओळख होती एकाच कॉलेजमध्ये असल्यामुळे. समर दिसायला राजबिंडा होता. गोरापान, उंच, सरळ नाक अगदी एखाद्या राजकुमारासारखा देखणा होता. आणि वरून गर्भश्रीमंतही होता. तो दिसायला जसा सुंदर तसा स्वभावही चांगला आणि मदत करणारा होता त्यामुळे त्याच्याभोवती नेहमी मुलींचा घोळका असायचा पण समरला त्यात रस नव्हता. त्याला या उगाच त्याला दाखवण्यासाठी पुढे मागे करणाऱ्या मुलींमध्ये काहीच रस नव्हता. त्याला तर सरळ साधी, सोज्वळ मुलीच आवडायच्या पण आजपर्यंत तो कोणाच्याही प्रेमात वगैरे पडला नव्हता. आरोहिला हे सगळं माहीत होतं म्हणूनच ती विचार करत होती की कधीही न बोलणारा मुलगा आपल्यासाठी कशी गाडी थांबवू शकतो. आरोही दिसायला सुंदर या वर्गवारीत बसत नसली तरी डोळे रेखीव आणि बोलके होते तिचे. मधाळ हास्य होत आणि लांबसडक केस होते. रंग तिचा सावळा होता ज्याचा न्यूनगंड तिच्या मनात नेहमी असायचा. त्यामुळे कधीच आत्मविश्वासाने कोणाशी बोलायची नाही. गोरा रंगच सर्व काही असत अस कुठेतरी तिला वाटायचं. आरोहिचा स्वभाव खुप मनमिळाऊ, प्रेमळ, संकटसमयी धावून जाणारा असा होता. इतरांसाठी जगण तिला खुप आवडायचं. आरोही सगळ्या विचारचक्रात असतानाच कॉलेज आलं आणि ती गाडीतून उतरली, समरला थँक्स बोलली त्यावर समर म्हणाला "तुला उशीर होऊ नये म्हणूनच मी लिफ्ट दिली यात थँक्स वगैरे बोलू नको आणि प्रॅक्टिकलं साठी बेस्ट लक" एवढं बोलून समर गेला आणि आरोहीने धावत पळत प्रॅक्टिकलं रूम गाठली. आरोहिने मैत्रिणीला सांगितलं की समरने तिला गाडीतून कॉलेज पर्यंत आणलं यावर मैत्रिणीचा विश्वासच बसला नाही. ती उगाच आरोहिला समरच्या नावाने चिडवायला लागली. आरोहिने तिच्याकडे दुर्लक्षच केलं. प्रॅक्टिकलं झालं आणि आरोही घरी गेली. दुसऱ्या दिवशीही खूप पाऊस होता, आजही आरोहिच प्रॅक्टिकल होत. नेहमीप्रमाणे ती बस स्टॉप वर आली आणि तेव्हाच बस निघून गेली. आरोही टेन्शन मध्ये होतीच तोच समरची गाडी आली, आज परत समरने आरोहिला गाडीत बसायला सांगितलं आणि आरोही बसली. गाडीमध्ये छान गाणं लावलेलं "सावन बरसे, तरसे दिल". आरोही काहीच बोलत नव्हती. समरनेच पुढाकार घेतला आणि विचारलं "काल प्रॅक्टिकल कस गेलं?" आरोही म्हणाली "चांगलं गेलं आणि तू वेळेत पोहचवलस म्हणून माझं टेन्शन गेलं". समर म्हणाला औपचारिकता नको करु आता, मी फार काही मोठं काम नाही केलं. समरने पुढे विचारलंही "पावसाचं कोणतं गाणं आवडत ?"त्यावर आरोहीने सांगितलं "पाऊसच खूप आवडतो त्यामुळे सर्वच गाणी माझ्या फार जवळची आहेत, आता तू लावलंयस तेही". अश्या रितीने दोघे गप्पा मारत कॉलेज कधी आलं त्यांना कळलंही नाही. आता समर अधून मधून आरोहिला बस नाही मिळाली तर किंवा कधी ठरवून कॉलेजला सोबत घेऊन जायचा. दोघांची छान मैत्री झालेली. आरोहिला आश्चर्य वाटायचं की ती कधीच कोणत्या मुलाशी एवढ्या मनमोकळेपणाने बोलली नव्हती पण समरशी तीच चांगल जमत होत. तिच्या रंगामुळे तिच्यात जो न्यूनगंड होता त्याने तिला कोणाशी आत्मविश्वासाने, मनापासून गप्पा मारून दिल्या नाहीत. समरशी बोलताना मात्र तिला हे कधी जाणवलं नाही. समर तिला ती आहे तशीच राहा, सुंदर आहेस असच म्हणायचा आणि तिचा आत्मविश्वास वाढायचा. त्यामुळे त्यांची मैत्री खूप घट्ट होती. दोघांनाही पाऊस खूप आवडायचा. पावसावर दोघेही कविता करायचे आणि एकमेकांना ऐकवायचे. पावसात फिरणं आणि कविता करण हा दोघांचा छंदच जणू. फोनवरही तासंतास बोलायचे. कॉलेजमध्ये गॅदरिंग होत, आरोही भरतनाट्यम शिकलेली. समरला फार वाटायचं की तिने गॅदरिंगमध्ये भाग घ्यावा पण आरोहिला वाटायचं तिला कोण बघणार? तिचा रंग सावळा असल्यामुळे तिचा डान्सही कोणी बघणार नाही पण समरने त्याची शपथ घातल्यावर ती भाग घ्यायला तयार झाली आणि तिने ती स्पर्धा जिंकली सुद्धा. तिचा पहिला नंबर आला. आरोही खूप खुश होती. दुसऱ्यादिवशी कॉलेजमध्ये साडी डे होता. आरोही तयार होऊन बस स्टॉप वर आली तर समर तिच्याआधी तिथे हजर होता. गुलाबी रंगाचा साडीमध्ये आरोहिच सौंदर्य खुलून दिसत होतं. एक क्षण समर आरोहिला बघतच राहिला. आरोहिने खुणावले की जायचंय ना कॉलेजला तेव्हा तो भानावर आला. अर्थातच समर तिच्या प्रेमात पडलेला पण आरोहिच्या मनात काय होत हे त्याला माहित नव्हतं. आज तो आरोहिला प्रपोज करणारच होता. संध्याकाळी कॉलेज सुटल्यावर खूप पाऊस सुरू झालेला, त्यामुळे समर तयारच होता आरोहिला घरी सोडायला. आरोही नेहमीप्रमाणे गाडीमध्ये बसली. समोर लाल गुलाबांचा पुष्पगुच्छ ठेवलेला. आरोहिने विचारले कोणासाठी तर ते तुझ्याचसाठी आहे असं समरने सांगितलं. तिने पुष्पगुच्छ हातात घेतला तर त्याखाली एक ग्रीटिंग होत जे समरने स्वतः हाताने बनवलेलं. कुतूहलाने आरोहिने ते उघडलं, आतमध्ये समर आणि तिचे फोटो होते. आणि समरने त्यातच लिहिलं होतं की " तू जशी आहेस तशीच खुप सुंदर आहेस आणि मला खुप आवडतेस. माझ्या सोबत सात जन्माचं नातं जोडशील का?" आरोहिला धक्का बसला ते वाचुन. तिने कधीच समर तिला प्रपोज करेल असा विचार केला नव्हता कारण तिच्या आणि समरच्या परिस्थिती मध्ये खुप तफावत होती. ती मध्यमवर्गीय कुटुंबातील होती तर समर खूप श्रीमंत होता. समर दिसायला राजकुमार होता तर ती स्वतःला त्याच्या समोर दासीचही स्थान देऊ इच्छित नव्हती. आरोहिने तेव्हाच या गोष्टी त्याच्या समोर ठेवल्या आणि म्हणाली "आपल्यातील हे अंतर नाही पार होऊ शकत. मलाही तू खूप आवडतोस पण मी मनातच हे ठेवलेलं कारण मी तुझी नाही हाऊ शकत. तेवढी योग्यता नाही माझी." समरने शांतपणे सगळं ऐकून घेतलं आणि म्हणाला "तुझ्या रंग रूपावर मी प्रेम नाही करत. तू माणुस म्ह्णून जशी आहेस त्या माणसावर मी प्रेम करतो. तुझ्यातल्या बाह्यरूपावर नाही मी तुझ्या अंतर्मनावर प्रेम करतो. मी पहिल्यांदा तुला आमच्या वृद्धाश्रमात पाहिलं तेव्हाच तुझ्या प्रेमात पडलो. तिथे तू प्रत्येक रविवारी त्या आजी आजोबांना भेटायला, गोष्टी सांगायला, त्यांना काय हव नको ते विचारायला येतेस माहीत आहे मला. रोज गरिबांच्या मुलांना शिकवायला जातेस तेही फुकट हे पण माहीत आहे मला. तू खूप प्रेमळ आहेस आणि कोणाला संकटात नाहीस बघू शकत. तुझ्यातल्या या माणुसकीवर,या प्रेमावर मी प्रेम करतो. तू मला आहेस तशी हवी आहेस सात जन्म. मी तुझी साथ कधीच सोडणार नाही. आजच्या दुनियेत जिथे मुली स्वतःच्या सौंदर्यालाच महत्त्व देतात तिथे तू फक्त इतरांसाठी जगतेस. त्यांच्या आनंदाने तुझ्या चेहऱ्यावर हास्य खुलत. अश्या गोड मुलीशी मला लग्न करायचंय." आरोहिच्या डोळ्यात यावेळी फक्त अश्रू असतात. तिला आज कळत की रंगच सर्वस्व नाही. माणूस म्हणून पण तिची दखल कोणीतरी घेतलीये आणि तिला त्याला गमवायच नसत. त्या बरसणाऱ्या पावसाच्या साक्षीने ती त्याला होकार देते. आज दोघेही पावसात चिंब भिजतात आणि कधीही वेगळे न होण्याची शपथ घेतात. दोघे खूप खुश असतात.दिवसामागून दिवस जात असतात तस प्रेम अजून बहरत जात. प्रत्येक पावसात दोघांच्या प्रेमाचा रंग अजून गहिरा होत जातो. दोघांचं कॉलेज संपत. घरी लग्नाबद्दल बोलतात. अर्थातच समरच्या घरून विरोध होतो पण तो त्याचा हट्ट सोडायला तयार नसतो त्यामुळे त्याच्या घरचे शेवटी तयार होतात. आरोहिच्या घरी मात्र आनंदाचे वारे पसरलेले असते. सगळे खूप खुश असतात. आरोही आणि समर पण भविष्याची स्वप्न रंगवत असतात. एक दिवस पाऊस बरसत असतो आणि दोघांनाही वाटत फिरायला जावं. याच पावसाने त्यांना एकत्र आणलेलं असत. दोघेही मस्त फिरायला जातात. दोघांच्याही आनंदाला पारावार उरला नसताना अचानक समरची गाडी ट्रकला जाऊन धडकते आणि दोघेही तिथेच बेशुद्ध होतात. आजूबाजूचे लोक त्यांच्या घरी कळवतात आणि त्यांना हॉस्पिटलमध्ये नेतात. काही वेळाने समरला शुद्ध येते. त्याच्या डोक्याला दुखापत झालेली असते पण फारशी गंभीर नसते. तो बोलू चालू शकत होता. शुद्धीवर येताच त्याने आरोही बद्दल विचारले. आरोहि जिथ असते तिथे त्याला घेऊन जातात. समर तिच्या हातावर हात ठेवतो आणि त्याच्या स्पर्शाने आरोही शुद्धीवर येते. ती उठायचा प्रयत्न करते, पायाची हालचाल करते आणि तिला जाणवत की तिचा एक पाय नाही. तिच्या पायाखालची जमीनच सरकते. ती खूप खचते. समरशी नजरानजर पण ती करू शकत नव्हती. समरला डॉक्टरांनी आणि घरच्यांनी याची कल्पना आधीच दिलेली होती. त्यालाही मोठा धक्का बसलेला पण त्याने त्यातून स्वतःला सावरलं. आता त्याला आरोहिला सावरायच होत. आरोही खूप आक्रोश करते. समरला बोलते "तू जा निघून, तुझं आयुष्य जग. माझ्याकडे आता तुझ्याशी लग्न करायला काही राहील नाही. मी अशी तुझी होऊ शकत नाही. तुझं आयुष्य माझ्यामुळे उध्वस्त नको करू." समर म्हणतो " तू कालही माझीच होतीस आणि आजही माझीच आहेस, उद्याही माझीच राहशील. मी प्रेम तुझ्या मनावर केलं. या शरीराला झालेले घाव आपण दोघे मिळून भरून काढू पण तुझ्या मनापासून मला वेगळं नको करू. तुझ्यातल्या माणसावर मी प्रेम केलं आणि तू मला तशीच हवी आहेस. मी आणि तू कधीच वेगळे नाही होऊ शकत. तो रंगाचा न्यूनगंड, ती गरीब श्रीमंत दरी आणि आज आलेलं हे अपंगत्व यातली कोणतीच गोष्ट तुला आणि मला वेगळं नाही करू शकणार. या गोष्टी फार दुय्यम आहेत ग. माझ्यासाठी तू न तुझं प्रेमच जगण्याचा आधार आहे. आज तुझ्या ऐवजी माझ्यावर अशी परिस्थिती ओढवली असती तर तू गेली असतीस का मला सोडून? नाही ना. मी ही नाही जाणार. तुझा होतो, आहे आणि राहणार." आरोही हे ऐकून त्याचा हात हातात घेते आणि म्हणते "मी ही कसलीही परिस्थिती आली तरी तुला कधी सोडून नाही जाणार." बाहेर धोधोधोधो पाऊस पडत असतो आणि समर आरोहिच्या गळ्यात मंगळसूत्र घालतो. या पावसाच्या साक्षीने ते पहिल्यांदा भेटले,पहिल्यांदा प्रेमाची कबुली दिली आणि त्याच पावसाच्या साक्षीने आज सात जन्मासाठी एक झाले.


Rate this content
Log in

Similar marathi story from Tragedy