Sarita Sawant Bhosale

Fantasy Others

2  

Sarita Sawant Bhosale

Fantasy Others

गजरा

गजरा

4 mins
246


    गजरा फक्त नाव घेतलं की मोगरा,अबोली,जाई, जुई,बकुळी,चाफा,मधुमती अशा विविध रंगीबेरंगी फुलांचा झुबका आपला सुगंध दरवळत एका धाग्यात एका लयीत, एकसंध विणलेली अशी प्रसन्नतेची माळ डोळ्यासमोर उभी राहते आणि चेहऱ्यावर नकळतच लाली चढते.


   गजरा प्रत्येक सखीचा प्रिय सखा🌹

   गजरा अल्लड वयात स्वप्न दुनियेत घेऊन जाणारा

   गजरा दोन प्रेम करणाऱ्या व्यक्तींमधील सुगंधित दुवा😍

   गजरा नवरा बायकोच्या रुसव्यातील गोडवा♥️

   गजरा सखीच्या वेणीत सजणारा मोहक साज🌼

   गजरा हातात सजून मैफिलीची शान वाढवणारा

    गजरा देहबाजारातही 'तिच्या'साठी सोबत असणारा

    गजरा श्वास संपल्यावरही देहावर निपचित विसावणारा शेवटचा साथीदार

    गजरा तितकाच सुंदर, अलौकिक, मोहक, असा सुगंधित प्रिय धागा🌹


  जन्मापासून मृत्यूपर्यंत आणि देवाऱ्यातल्या गाभाऱ्यापासून कळसा पर्यंत सगळीकडे दिमाखात सजणारा हा गजरा सगळ्यांच्या हृदयात, मनात, चिंतनात आपलं अढळ स्थान स्थापित करून असतो. स्त्रीचं सौंदर्य या आभूषणाशिवाय अधुरच आहे. सण, उत्सव,लग्न कोणताही समारंभ असो गजरा नसेल तर शोभा नाही..स्त्री केशरचनेलाही नाही आणि समारंभालाही नाही. प्रत्येक सखीच असतं तस माझही गजऱ्यासोबत घट्ट आणि फार जून नात आहे. लहानपणी सुट्टीला आजोळी जायचो तेव्हा तिकडे विविध फुलांची बाग होती विशेषकरून मोगरा आणि अबोली. मोगऱ्याचा वेल शेवग्याच्या झाडावर चढून अगदी घराच्या छता पर्यंत पोहचलेला. पहाटे पहाटे अंगणात मोगऱ्याच्या फुलांचा सडा पडलेला असायचा. झोपेतून डोळे चोळत बाहेर यावं आणि त्या मोगऱ्याच्या सुगंधाने स्वतःकडे आकर्षित करून झोप कुठल्या कुठे पळवावी अस व्हायचं. तो मोगऱ्याचा पांढरा शुभ्र सडा आणि भोवतीकडे दरवळणारा त्याचा सुगंध याने मन मोहित नाही झालं तरचं नवल😊


  मग झाडावर चढून( हो झाडावर चढता येते😀) प्रत्येक फुल अलगद वेली पासून वेगळे करणं आणि ओंजळीत घेणं हा खेळ सुरू होई. सगळी फुलं तोडून झाली की मग लगबग असायची ती गजरे करायची. यात अबोलीच्या फुलांचाही सहभाग असायचा बरं का😀 कधी सुई धागा वापरून गजरे तर कधी फक्त धाग्यात विशिष्ट प्रकारे फुलं ओवून गजरे असे रोज विविध प्रकार असायचे. त्यातच तुला दोन तर मला चार गजरे अशी भांडणही व्हायची पण गजरा मिळायचा हे महत्त्वाचं. तेव्हा केस मोठे होते त्यामुळे रोज नवीन केशरचना करून गजरे घालून अजून सौंदर्य खुलवायचा प्रयत्न असायचा😊. तेव्हा ना मोबाईल ना एका क्लिकवर हजार केशरचना हजर करणार यू ट्यूब होतं...सगळा आनंद सोहळा आपल्या कल्पकतेचाच😍.

  

 सुट्टी संपून परत शाळा सुरू झाल्यावर रोज गजरा घालता यायचा नाही कारण एकतर तो मुंबईत विकत घ्यावा लागायचा आणि महत्वाचं म्हणजे शाळेत परवानगी नव्हती. कदाचित स्वतःसोबत इतरांचं लक्ष विचलित होऊ नये म्हणून तो नियम असावा असा मीच माझा लावलेला शोध. पण गजऱ्याची तरीही इतकी आवड असल्यामुळे मार्गशीर्ष महिन्यात गुरुवारच्या पूजेची फुले शुक्रवारी वेणीत माळायचा अलिखित नियम झाला होता. पुढे तो कॉलेजला गेल्यावर हळूहळू कमी झाला पण जेव्हा मनात आलं तेव्हा गजरे, फुल केसात माळली. ती कॉलेजची हवा, हेअरकट, मोकळे केस वगैरे वगैरे सगळ्या मोहात पडले तरी गजरा आणि फुलं यांच्या वरचं प्रेम किंचितही कमी झालं नाही. कॉलेज असो की नोकरीच ठिकाणं कधी traditional day असो किंवा saree day किंवा अजून कोणता function गजऱ्याशिवाय तो अधुराच. अशा वेळी मला ते 'so typical' ,'so outdated', 'so chip', 'so गावठी🤣' वगैरे वगैरे म्हणत नाक मुरडणाऱ्या महान व्यक्तींची किवही यायची,आजही येते आणि हसायलाही येते. कानामागे फुलं घालून फोटो घालणाऱ्या so called modern मैत्रिणींना स्त्रीच्या केसांना नवा साज देणाऱ्या गजऱ्यासारख्या सौंदर्यदागिन्याच महत्व ते काय कळणार नाही का😊 . 


    जिथे परमेश्वरालाही मोहक, सुगंधित फुलांचा मोह आवरला नाही तिथे आपल्या सारख्या गजरा प्रेमींची काय कथा. लग्नानंतरही माझं गजरा प्रेम कमी न होता वाढतच गेलं. संसाररूपी वेल बहरायला गजरा महत्वाची भूमिका बजावतो अस मला वाटतं आणि लग्नानंतरच सखीचा अधिक प्रिय होतो😍. अलीकडच्या कोरोना, लॉकडाऊन काळात समोर फुलं असून गजरा करता आला नाही असंही झालं. या कोरोना काळात तर मन एकूणच कधी नकारात्मक तर कधी प्रचंड बेचैनीतून जात होतं. घराबाहेरच्या बागेत अबोलीची फुल मला रोज खुणावत होती पण मीच त्यांना आज नको आपण उद्या भेटू म्हणून पुढे जात होते. एक दिवस अबोली रंगाच्या साडीवर अबोलीचा गजरा घालून फोटो काढत असलेली माझी मीच मला स्वप्नातही दिसली😀( असे साडी नेसून फोटो काढत असलेले स्वप्न मला नेहमीच पडतात..साडी मात्र नवी हवी😝साडी आणि फोटो यावर वेगळा लेख होईल तो पुन्हा केव्हातरी).


  एक दिवस अबोली सोबत मोगऱ्याची फुलही विनवू लागली मग मात्र मनावर घेतलं. स्वप्नातली अबोली रंगाची साडी होतीच..वेळ काढून मुद्दाम सागर वेंणी घातलीच (बऱ्याच दिवसांनी). सगळी काम आटपून चार फुल अबोलीची, चार फुल मोगऱ्याची धाग्यात विणत सुंदर झुबकेदार गजरा तयार केला. फुलांच्या सान्निध्यात आल्याबरोबरच कोरोनामुळे मनावर आलेलं मळभ क्षणात दूर गेलं होतं. मोगऱ्याच्या सुगंधाने आणि अबोलीच्या रंगाने चेहऱ्यावर प्रसन्नतेची लाली पसरली होती. नकारात्मकता पसरलेल्या मनात सकारात्मकतेची फुलं उमलू लागली. साडी तर आवडता विषय😍 त्यामुळे 'फुलले रे क्षण माझे फुलले रे' असे गाणे गात मोर मनात थुईथुई नाचत होते😀. 


  झालं साडी, गजरा,सागरवेणी, हलकासा मेकअप.. परफेक्ट तयार. फोटो काढायला अजून काय हवं नाही का...सध्या बाहेर जाऊन फोटो सेशन नाही करता येत मग घरातच सेल्फी फोटो जिंदाबाद😎. 


साडी आणि फोटोच माझ्या सोबत वेगळं नात आहे. अतिआनंदात, दुःखात, निराशेत, frustration, depression, अगदी आजारपणातही स्वतःला खुश ठेवण्याचा, आनंदी ठेवण्याचा माझा एकमेव उपाय म्हणजे मस्त साडी नेसा, गजरा घाला आणि हवे तितके फोटो काढा. यासाठी मी कोणत्याही सण, समारंभ, कार्यक्रम किंवा विशेष दिवसाची वाट बघत नाही. ज्यादिवशी फोटो काढेन तोच खास दिवस♥️. (वेगळं आहे पण आहेच😀. एकदा फोटो काढले की मग पुढचे पंधरा दिवस तरी कुठला stress या मनाला शिवत नाही😃 आणि अशावेळी लोकांचा विचार अजिबात करायचा नाही).

   

साडी आणि फोटो हे माझं stress booster आहे असं मी नेहमी म्हणते कारण प्रत्येकाला असं एक ना एक वेड हवं, छंद हवा ज्यात स्वतःला कठीण काळात त्यात गुंतून ठेवता येईल. कठीण काळातून बाहेर पडता येईल. निसर्ग, फुलं, सुगंध यांचं सौंदर्य, यांचा स्पर्श मनाला मोहून नाही गेला तरच नवल आणि मनात चैतन्य नाही दरवळल तरच नवल😊.

माझ्यासाठी गजरा म्हणजे चैतन्य आणि आयुष्यावरच प्रेम आहे.    


Rate this content
Log in

Similar marathi story from Fantasy