Ujwala Rahane

Inspirational

2  

Ujwala Rahane

Inspirational

तीन पिढ्याचा बाबा फ्रेममधून

तीन पिढ्याचा बाबा फ्रेममधून

5 mins
124


आज विषय थोडा अवघडच होता. कारण याचे स्पष्टीकरण आज द्यायला लागणार होते. कोठे चुकलो, कोण चुकले? प्रश्नांची सरबत्ती चालू होती दादा, ताई व आई ऐकमेकावर ताशेरे ओढत होते. मी लहान आसल्यामुळे मध्ये बोलण्याचा प्रश्नच नव्हता. पण समजत सगळे होते. विषय साधाच आईला व मला थोडे दिवस कोण घेऊन जाणार? बाबांना जाऊन महिनाच झाला होता, लगेच वाटणी चालू झाली. ताई ऐकत्र कूंटुबाचे कारण पुढे करत होती, तर दादा आम्ही दोघेही working असल्याचे.


  मला वाटलं सांगावं, तुम्ही जा,मी सांभाळू शकते पण आणि परंतु त्याचे उत्तर सापडत नव्हते. आई शेवटी म्हणालीच,आता बस्स झाले मि पाहते तुम्ही जा आता! निर्धाराने तिने पाऊल उचलले व तिच्या सुरक्षित कवचात आम्ही ऐकमेकित बांधले गेलो, ते आजगायत. 

  आज जुन्या आठवणी जाग्या झाल्या तुमच्या या कठीण विषयामुळे. हो वडील या नात्याला प्रत्येक जण वेगवेगळ्या साच्यात बंद करतो. प्रत्येकाचा साचा वेगळा,कठोर, शिस्तबद्ध, प्रेमळ जो जसा पाहिल तसा.पण माझे बाबा माझ्या साठी ऐक वेगळेच टॉनिक होते.


 आज वडिलांची व्याख्या माझ्यासाठी बंद दरवाजा मागील किलकिला प्रकाश, निरपेक्ष प्रेम न रडता केलेली प्रेमयुक्त बरसात. त्यालाही वाटतं आपले पण कोठे नाव व्हावं. आपल्या कष्टाचे चीज लेकरांनी योग्य पध्दतीने केले नाव कमावले कि तोही आनंदाने भरून पावतो. फक्त त्याला व्यक्त होता येत नाही.त्याची भरपाई आई पदोपदी करते.


 बाबांची ऊणीव जाणवते जेंव्हा, कोणत्याही परवानगी साठी इतरांनाकडे परवानगी मागावी लागते. 

 खरच वडील असल्यावर त्यांची किंमत नसते,पण ते गेल्यावर कशालाच किंमत ऊरत नाही.मग त्याची किंमत समजते.वडील यावर लिहू तेवढे कमीच आहे, त्यासाठी आपण एकदा त्यांच्या जागेवर स्वत:हाला निदान गृहीत धरून पहावे. खरच 'कसल्या परताव्याची ना डिल, ना कधी अश्रू गाळणारे डोळे, ते असती तिर्थस्वरूप वडील'!


  आज मी खूप सुखी आहे पण कधी कधी जुने आठवते. आपला बाबा कसा होता हा प्रश्न मग मी मनाला विचारते. मग उत्तर मिळते, हो चांगलाच होता फक्त परिस्थितीशी बांधलेला होता.नवीन जगात मिसळायला थोडा कचरत होता.म्हणून आपल्याला पण मोकळ्या वातावरणात सोडत नव्हता.  हा बाबा सत्तर ऐंशीतला होता. एकंदरीत कडक, हिशोबी, व भविष्याची जाण ठेवून पुढे चालायला शिकवणारा होता हे नक्कीच भले त्याची आर्थिकबाजू कमकुवत होती.


  आज उगाच हे सगळं आठवले. आणि प्रकर्षांने बाबांची आठवण आली. फोटोतला बाबा माझ्याकडे पाहत होता. जणू काही आशीर्वाद देत होता.आई खबींरपणे उभी राहिली म्हणून आज मी घडले एवढे मात्र निश्चित.तसे आई बाबांशी मुलांचे नातं सारखेच कधीच भेदभाव नाही ती पण वेळ बरोबर नव्हती इतकेच.बाबा गेले कायमचे परत न येण्याच्या वाटेवर.


  जाणार जातो पण मागे राहणाऱ्या त्याचा कार्यभाग चुकवावा लागतोच शेवटी.मग मी घरातील प्रत्येक सदस्यांत बाबांना शोधू लागले.पण प्रत्येक व्यक्तीत मर्यादा दिसू लागली. कारण बाबा हे नातं मर्यादेशी निगडित नसते हे खरे. मध्ये एक प्रामाणिक भिंत असते पण त्याला आपण त्याला सुरक्षेचे कुंपण म्हणतो असो. असे हे माझे बालपण आता इतिहास जमा झाले होते. माझ्या पिढीतले ज्याने हा बाबा अनुभवला ते आता कोणी कोठे कोठे आपापल्या जागी स्थिरस्थावर झाले असो. 

  

  आता मी भुतकाळात भरकटलेल्या मनाला मी भविष्यकाळात आणले आणि नवीन पिढीचा नवा बाबा शोधत मी भविष्यकाळात पोंहचले.इथे चित्र सगळे वेगळे दिसले. सगळेच बदलले.


 हा आता माझ्या मुलांचा बाबा तशी खुपशी तफावत.माझ्या पिढीतला बाबा जेव्हा समोर येतो ना तो बाबा आणि हा बाबा खुपच वेगळा भासला. या पिढीला आईच्या मांडीवरची सुरक्षितता बाबांच्या खांद्यावर विसावण्यात पण आहे. या पिढीला बाबांची भिती वाटत नाही. उलट तो सहवास हवाहवासा वाटतो. बाबा बरोबर मस्ती करताना धमाल येते असे मुले सहज बोलून जातात.उलट आई तुझाच धाक असतो असे म्हणतात. आपल्या बाबामध्ये आणि या बाबामध्ये केवढा फरक पहा. 


 आपला बाबा घरात येण्याच्या वेळेला घरातील वातावरण चिडचूप असायचे. आता या पिढीला बाबांच्या आगमनाची मुले उत्सुकतेने वाट पाह्यचे कारण बरेच प्लॅन त्यांचे आधिच ठरलेले असायचे.इथे आईची मध्यस्थीची गरज कधी भासलीच नाही. कारण हा बाबा प्रत्येकाच्या आवडीनिवडीचा विचार करू लागला. सहज तुला जमेल करून तर बघ म्हणू लागला.कोठेही जबरदस्ती न करता बरका! आपल्या बाबासारखा तो हिशोबी नव्हता. प्रेमानं समजावून घेऊ लागला. 


  हा नव्वदीतला बाबा मग आपली प्रतिमा बदलून गेला.कोठे कोठे तर आहो बाबांचा, अरे बाबा झाला. तो कधी, कधी वेळेनुसार आईचे कर्तव्य श्रेष्ठ समजू लागला.मग तो सगळ्या मुलांच्या संगोपनात जातीने सहभागी होऊ लागला. आता नव्वदीत जन्मलेला मुलगा पुढे मोठा झाला. 


 आता नव्वदीचा काळ थोडा पुढे गेला. मग विसाव्या शतकाचा एक नवीन बाबा उदयास आला. हा बाबा तर अजून वेगळाच अनुभवायला मिळाला.हा बाबा स्वत:हाच्या करिअर च्या मागे धावणारा, स्वतःच्या एक ध्येय साध्य झाल्याशिवाय कसलाच विचार न करणारा, आणि मग लवकर पालकत्व स्विकारण्यास कचरू लागला.


 पण तो खरच हुशार बाबा निघाला. सगळे व्यवस्थापन व तरतूद करून मग बाबा होण्यासाठी तयार झाला. या बाबाची तराच वेगळी, पहिल्या फटक्यात याने बाजी मारली. बाबा होण्याची जेव्हा याला चाहूल लागली, तेव्हा पासूनच याची जबाबदारी वाढली.सगळे स्थीतबद्ध करुन मग तो बाबा झाला. हा बाबा जरा वेगळा होता,कारण तोच संगणकाच्या जगात वावरत होता. लहानपणापासूनच व्यवहाराचे धडे तो मुलाला देत होता. 'हे केल तर हे होईल, ते केले तर ते होईल' पुढचे शिक्षण आधीच मुलाला शिकवत होता.अर्थात पाळण्यातच मुलाला हातात मोबाईल धरायला शिकवत होता. हा बाबा खरच फार लवकर मुलाचा मित्र झाला थोडक्यात बाबाई झाला. त्यामुळे दोघांमधील भितीचा राक्षस केंव्हाच पळून गेला. नाते थोडे वेगळे झाले.कारण या बाबानीच आईला पण तेवढेच महत्त्व दिले. त्यामुळे नावामध्ये बाबा आधी आईचे नाव पुढे जोडले गेले.अजून खुपशी प्रगती झाली.मुलांना प्रत्येक गोष्ट मागण्या आधीच हातात मिळू लागली. एवढेच नाहितर लहानग्यांना देखील हात लावताच ब्रॅण्डेंड वस्तू समजू लागली. हरवलेली वस्तू शोधण्यापेक्षा लगेच नवीन मिळू लागली. त्यामुळे 'नाही' ऐकण्याची सवय नाही राहीली. एकंदरीत शेवटी शेवटी पिढीगत बाबा बदलताना दिसला. एकूण काय बाळाचा साचा तोच होता, पिढीनूसार फक्त नि फक्त बाबाचे रूप बदलत होते.फक्त न्यू जनरेशन या गोंडस नावाखाली!


   आपण कोठे कमी पडायला नको म्हणून प्रत्येक बाबा धडपडत होता. आपल्यापरीने जो तो बाबा देतच होता. पण अजूनही मला वाटते, आपल्या पिढीतला म्हणजेच, मधला बाबा थोडा कमीच पडला होता का? खरंच थोडा कमीच पडला होता.तो ही सुखवस्तू होता. चैनीच्या मार्गावर तो मार्गस्थ होत नव्हता. कारण तो स्वतःच एक मार्ग तयार करण्यात बंदिस्त होता. तो चुकीचा नव्हता पण दूरदृष्टीचा होता.म्हणूनच तर तिसऱ्या पिढीतला बाबा ऐवढा हुशार झाला होता हे नक्कीच!  माझ्या मार्गात मला हे भेटलेले बाबा नक्कीच अनोखेच होते.पण खरेच आपापल्या परीने ते कर्तव्यदक्ष होते एक सूजान पिढी घडवत होते. 


Rate this content
Log in

Similar marathi story from Inspirational