ती
ती
प्रत्येकाला प्रत्येकाचा जोडीदार हा त्याच्या वयानुसार पाहिजे असतो.आणि मी देखील हाच विचार करते.पण ती.. ती आपल्यापेक्षा वेगळी.आपण दिसत जरी वेगळे असलो तरी तिचे विचार देखील वेगळे आहेत आपल्यापेक्षा.ती आयुष्यात आल्यापासून जणू आयुष्य बदलून गेलं त्याच .ती जगाचा विचार करत नाही तिला फक्त तीच प्रेम मिळावं हीच अपेक्षा तिची.ज्या वयात त्याला "दादा" म्हणावं त्या वयात त्याला "अहो" बोलणारी ती.जणू मागच्या जन्माची पुण्याई.
पण गोष्टीतील रस असा होता कि, दोघांनाही घरून नकार होता.कोणाची जातं वेगळी तर कोणी समजून घेत नव्हते प्रेमाला त्यांच्या.हा पण संयम आणि तोंडात साखर डोक्यावर बर्फ ठेवला तर सार जग जिंकून घेता येत म्हणे.जर घरच्यांनचा होकार मिळाला असता तर त्याला संघर्षाचा अर्थ समजला नसता. पण तो नेहमी बोलतो,"कृष्णा ला त्याच प्रेम नाही भेटलं मग आपण सामान्य मानस" पण दरवेळेस राधा कृष्णाच प्रेम का पाहावं!! विठ्ठल काळा असला तरी रुक्मिणी त्याच्या सोबत होती आणि नेहमी राहिली. विठ्ठलाचा काळा रंग त्याच्या चेहऱ्या पुरता मर्यादित होता खरी सुंदरता रुक्मिणीने आयुष्यात आल्यावर दिली.
