अस्तित्व विसरले भाग-२
अस्तित्व विसरले भाग-२
आज 2 महिन्यांनी वेळ भेटला आहे डायरी लिहायला. रेवा आणि तो बाहेर गेलेत फिरायला. खुश होती आज ती. तिचा बाबा आज पूर्ण दिवस तिच्या बरोबर असेल म्हणून.आई पण दुपारची झोप काढतात. आणि उरला प्रश्न माझा..माझ्या बरोबर आहे ही डायरी. शेवटी,आपल्या ओठावर असलेलं हसू आणि मनात असलेलं दुःख हे आपल्या diary ला माहित असतं. आज स्नेहा चा कॉल आला होता. खूप दिवसांनी बोललो आम्ही. काही तरी ४-५ महिन्यांनी. तिला सांगितलं सगळं. मन मोकळ नाही पण थोडं हलकं झाल्यासारखं वाटल.
ती माझी बालपणीची मैत्रीण आणि आम्ही बहिणी होतो एकमेकींसाठी. तिला वाटल सुद्धा नाही मी इतक्या अडचणीत असेल आणि जॉब सोडला हे कोणालाच समजू हि दिल नाही मी. तिने सुद्धा हेच ऐकवल कि,"शेवटी तुझी choice होती आणि मी काही करू शकत नाही". पण तीच काही चुकल नव्हतं. खरं तर त्याला मी सुद्धा लाडावून ठेवले आहे आणि एकुलता एक असल्यामुळे आई बाबा ने पण खूप लाडावल. त्याचा रुमाल,त्याची कपडे,त्याची बॅग, डबा, लॅपटॉप, कॉफी..सगळे हातात नेऊन द्यायचे. म्हणुन त्याला कोणत्याही गोष्टीची किंमत नाही.
पण एक प्रश्न मनाला खटकतोय तो म्हणजे,"चूल आणि मुलं" हे स्त्रीने च का सांभाळावं? जन्माला घातलेल मुलं जर दोघांचं आहे तर त्याला सांभाळायची जबाबदारी एकट्या स्त्रीने का घयायची? पण माझे हे प्रश्न हे फक्त ह्या डायरी पुरते मर्यादित आहेत. बाहेर त्याला किंमत नाही. एक कविता सुचतेय
"स्वप्नांच्या दुनियेतल खरं होत नसतं"
दोन लव्ह बर्डस एकत्र येतील
आपलं घरटं बांधतील
कोणी चारा तर कोणी पाणी आणलं असत
पण,स्वप्नांच्या दुनियेतल खरं होत नसतं.
