STORYMIRROR

Ankita Akhade

Others

3  

Ankita Akhade

Others

अस्तित्व विसरले भाग-३(शेवटचा

अस्तित्व विसरले भाग-३(शेवटचा

2 mins
277

मला समजत नव्हतं कि काय लिहू आणि काय नको पण तो क्षण विसरता येणार नव्हता. आम्ही फिरायला गेलो होतो (तो,मी आणि रेवा). खरं तर माझ्या नकळत रेवा ने डायरी त्याला दाखवली होती. थोड त्यालाहि वाईट वाटल असेल पण "जे होत ते चांगल्यासाठी होत" असं म्हणतात ते खरं आहे. त्याला त्याची चूक समजली ते चांगल झालं. त्याला थोडं अपराध्या सारखं वाटत होत कदाचित म्हणून आम्ही फिरायला गेलो होतो.

         खूप गप्पा गोष्टी मारल्या आम्ही. किती दिवसातून इतके मोकळे झालो आम्ही. एकमेकांसाठी वेळ दिला. आणि त्याने स्वतःहून वेळ दिला ह्यामुळे जास्त खुश होती मी. जसं मला तो पाहिजे होता तस त्याने प्रयत्न केला बनायचं त्या एका आठवड्यात. आणि त्याने प्रयत्न केला हीच खूप मोठी गोष्ट होती माझ्यासाठी. आणि रेवा सुद्धा खुश होती. आम्ही दोघ इतक्या दिवसांनी एकत्र आलो तिला हे बघून छान वाटत होत. 

         मी सुद्धा मन मोकळ केलं. त्याला सगळं सांगून टाकलं मनातल. आणि शेवटी आनंदाची गोष्ट होती ती म्हणजे, मला जॉब करायची परवानगी दिली. त्यालाही समजली स्त्रीची किंमत काय असते. आणि पुढच्या वीक मध्ये एक interview ला जाणार आहे मी. किती भारी वाटतंय,किती वर्षाने जग बगायला भेटतय. आणि त्याआधी आई कडे जाऊन यायचं ठरलं आहे. आई बाबा ला बघून सुद्धा खूप वेळ झाला आणि तो सुद्धा मला पटेल तस करतोय ह्याचा आनंद आहे मला. रेवाला सुद्धा स्कूल मध्ये सोडतो,स्वतःची कॉफी स्वतः बनवतो,स्वतःची कपडे स्वतः इस्त्री करतो,आई कडे लक्ष देतो,kitchen मध्ये सुद्धा मदत करतो. आता वाटतंय माझी चॉईस चुकीची नव्हती पण हरवली होती स्वतः मध्ये.


Rate this content
Log in