Memory Card
Memory Card
पैसे साठवून ठेवण्यासाठी "सेविंग अकाउंट".तसेच
महत्वाचे फाईल,फोल्डर किंवा गाणी,विडिओ साठवून ठेवण्यासाठी "मेमरी कार्ड".
आपल्याकडे हि असते एक मेमरी कार्ड!! आईच्या डोक्यात असलेली सामानाची यादी किंवा कुटुंबातील सदस्यांच्या वाढदिवसाची यादी. बाबांनी नविसरता आई साठी आणलेला गजरा अजून बरच काही.पण आम्हा मुलांची/मुलींची गोष्टच वेगळी असते.आमच्या मेमरी मध्ये मैत्रिणींचे वाढदिवस,मैत्रिणींसोबत कोणता चित्रपट पाहायचा,उद्या कोणता ड्रेस घालू,कुठे फिरायला जायचं हे आधीच सेव्ह असत.
खूप काही साठवल नाही मेमरी मध्ये पण लहान असताना आजी सारखी डॉक्टर कडे जायची.तेव्हा ठरवलं होत डॉक्टर बनायचंय.आईला एकटीला स्वयंपाक करताना त्रास व्हायचा म्हणून एक मोठं घर घेऊ आणि त्यात दोन नोकर ठेवणार.बाबा चि बस गेली कि धक्के बुक्के खात ट्रेन ने जावे लागते म्हणून स्वतःची एक गाडी घेऊन त्या गाडीत ड्राइवर ठेवून बाबाला ऑफिस मध्ये सोडून यायचं.कार्ड कधी कोणाला शेअर केलं नाही पण आज हातात लॅपटॉप होता आणि त्याला पेनड्राईव्ह लावल होत.प्रत्येकाने आपल्या मेमरी मध्ये काय सेव्ह करायचं आणि काय डिलिट करायचं हे स्वतः ठरवावं!!
