माझा राजकुमार मला मिळाला
माझा राजकुमार मला मिळाला
मला लव्ह मॅरेज करायचं असं काही ठरलेलं नव्हत माझं. पण माझा नवरा हा समजूतदार, दिसायला छान, प्रत्येक वेळी बायकोची बाजू न घेणारा पण गरजेच्या वेळी सतत माझ्या मागे उभा असणारा. मी खूप मुलीनं कडून ऐकेलेल आहे म्हणजे माझ्या मैत्रिणी पण असं बोलतात कि,मला chef नवरा पाहिजे! पण तो chef आपल्याला एकाच गोष्टी साठी पाहिजे ती म्हणजे त्याला जेवण छान करता येत असेल मग रोजच्या जेवणाचं टेंशन गेले. पण माझा नवरा मला chef पाहिजे हा आपला स्वार्थीपणा झाला. कोणी तरी आपल्याला आवडत ह्यापेक्षा महत्वाचं म्हणजे "कोणाला तरी आपण आवडतो". मग हट्ट कशाला कि मला माझा नवरा हा हाच जॉब करणारा हवा?
इन्स्टाग्राम रील्स वर एकदा ऐकलेलं कि," मुलगी जर एका मुला मुळे आपली वाट बदलत असेल तर गल्लीतल्या कुत्र्याची आणि त्या मुलाची जागा ही सारखी असते". पण त्या मुली मुळे जर एखादा मुलगा त्याच सर्वस्व सोडून येत असेल तर त्या मुली सारखी स्वार्थी कोणी नसेल नाही का! म्हणजे तो असा किंवा ती अशी ह्यापेक्षा स्वतः खाली किती अंधार आहे हे बघावं जरा. त्याच्या सॅलरीत घरचे राशन पाणी तरी भागेल ना! ह्यापेक्षा आपल्या सॅलरी तून 500 रुपये तरी त्याच्या खिशात हसून ठेवले तरी तो खुश होतो आणि सुखी संसाराला सुख आणि दुःख हवेचं.
शेवटी उरतो हा प्रश्न कि,"माझा राजकुमार मला मिळाला" हे कसं? एकमेकांचे सुख दुःख वाटून घेतले आणि त्याच्या खिशात स्वतःहून 500 रुपये ठेवले. तो chef जर शंभर लोकांचं पोट भरत असेल तर आपण त्या chef साठी नाही का स्वयंपाक करावा? इतके सगळे गुण असलेला नवरा भेटल्यावर हेच म्हणावं लागेल," माझा राजकुमार मला मिळाला" .
