अस्तित्व विसरले भाग १
अस्तित्व विसरले भाग १
पूर्ण वेळ तुझ्यासाठी काम करते. सुरुवातीला अवघड वाटायचे पण आता सवय झाली आहे. सुरुवातीला कुठे काय चांगल होत! आपण वेगळ्या जातीचे म्हणून आईने आपल्या लग्नाला परवानगी नाही दिली पण तरीही आपण लग्न केलच आणि त्यांना मान्य कराव लागलं. पण आज खोली आवरताना डायरी सापडली. कामं आवरली आणि डायरी वाचत बसले काही तरी लिहवस वाटत होत मग विषय घेतला,"तुझ्यात रंगले आणि स्वतःच अस्तित्व विसरले".
लग्नापुर्वी राणी बनून राहशील असे स्वप्न पाहायला लावलेस आणि ते पाहिले मी कारण,राजा तु होतास. स्वप्न पाहणे वाईट नाही पण एकत्र येऊन अस्तित्वात आणली तर हरकत काय?? खूप बोलायचे आहे रे तुझ्याशी! तुला कामातून वेळ नाही मिळत माहिती आहे मला पण अगदी "आजचा दिवस कसा गेला?काय काय केलास आज घरी?" हे तरी विचार! किंवा आईंना विचार " गार्डन मध्ये काय झालं आज? सिरीयल मध्ये काय काय झालं?". अरे रेवा ला किती दिवसापासून तुझ्याबरोबर बाहेर फिरायला जायचं आहे पण तु कामात असतो म्हणून काही नाही बोलत ती. मान्य आहे कि एकट्या पुरुषाला घर नाही सांभाळता येत पण मलाही जॉब करायचा होता आणि आईनी पण परवानगी दिली होती पण तु नाही म्हणालास म्हणून जॉब पण सोडला मी.
सुरुवातीला अवघड वाटायचं घरातलं कामं पण आता भांड्याना सुद्धा सवय झालीय माझी. कळलं नाही कधी इतकी संसारात/तुझ्यात गुंतून गेली. स्वतःच अस्तित्व विसरली! तुझ्या रुमाला पासून सगळं तुझ्या हातात आणून देणे,तुला जि भाजी आवडेल तेच करणे,घर फक्त स्त्रीने सांभाळावं म्हणून जॉब सोडला,तुला जे पाहिजे ते सगळं केलं. पण स्वतःसाठी करायचे राहून गेले. पण आज हा तास भर का होईना भेटला हेच खूप.खिडकीत लक्ष गेलं तुझी गाडी येत होती आणि रेवा सुद्धा तुझ्या बरोबर घरी आली. चला आता आपली वेळ संपली म्हणत डायरी ठेवून दिली!!
