मी, फोन आणि त्याची लोकेशन
मी, फोन आणि त्याची लोकेशन
इंस्टाग्राम हाताळता हाताळता एका मुलाचा फोटो दिसला. मुलगा दिसायला भारी, रुबाबदार आणि मनात बसला.
मी त्याच्या प्रत्येक फोटो ला लाईक करत होती. पण त्यात अजुन एक गोष्ट होती. ती म्हणजे त्याच्या फोटोचे लोकेशन. तो दिसायला चांगला असला तरी मला त्याच्यापेक्षा ती लोकेशन खूप आवडली होती. काही वेळाने मनात एक विचार आला की," चांगल्या मुलांना शेजारी पण पाठवत नाहीत आणि ह्या मुंगुसाना गोवा, पुणे, इगतपुरी, कळसूबाई ला पाठवतात". असा थोडा वेळ टाईमपास केला.
पण काही वेळाने मला त्याच्या लोकेशन जास्त आवडू लागल्या. त्या लोकेशन कोणत्या ठिकाणाच्या आहेत, किती वेळ लागतो जायला, किती खर्च येईल'. मी खूप गुंगली होती त्या लोकेशन मध्ये. त्या लोकेशन ची एक यादी तयार झाली. ह्या वीकेंड ला इथे जाऊयात,तिथे जाऊयात अस खूप प्लॅनिंग केल. मित्रांना/मैत्रिणींना सेंड केले फोटो आणि प्लान ठरण्या आधी कॅन्सल झाला. "अभ्यास कर म्हणाल्या, बारावी आहे,लक्ष दे अभ्यासावर". मी "हो" बोलून टाईमपास बंद केला आणि ती त्याच्या पोस्ट ची लोकेशन यादी फाडून टाकली.
ह्यातून एक गोष्ट समजली, डोळ्यांना आवडलेली प्रत्येक गोष्ट मानला आवडत नाही आणि मनात बसलेली प्रत्येक गोष्ट डोळ्यांना लवकर दिसत नाही".
