Suhas Mishrikotkar

Thriller

3  

Suhas Mishrikotkar

Thriller

ती संध्याकाळ पुन्हा

ती संध्याकाळ पुन्हा

1 min
218


कथाप्रकार- भयकथा


  एक दिवा


मी,माझी बहिण व माझे आईवडील आम्ही एका खेडेगावात रहात होतो. आई प्राथमिक शिक्षिका तर वडील इलेक्ट्रिशियन होते.आमच्या गावापासून ६ किमी अंतरावर असलेल्या कारंजा (लाड) या तालुक्याच्या ठिकाणी जातांना रस्त्याच्या कडेला एक शनिदेवाचे मंदिर.आमच्या गावातून कारंज्याला गेलेले सर्व लोकं अंधार पडायच्या आत घरी यायचे कारण त्या मंदिर परिसराविषयी अनेक आख्यायिका सर्वत्र चर्चिल्या जात होत्या.

मंदिराच्या आजूबाजूला रात्री दिवा फिरतो अशी चर्चा होती.

 मला अचानक कारंजा येथील मामांकडे सायकलने जावे लागले.

मी जेमतेम बारा वर्षाचा होतो. मामाकडचे काम आटोपून परत निघणार तेव्हा मामामामींनी सायंकाळी जेवणाचा आग्रह केल्यामुळे निघतांना सात वाजले.

मनात अत्यंत भिती तरीही सायकलने परत निघालो. मंदिराच्या जवळ येईपर्यंत अंग घामाने चिंब झाले होते.

देवाचे नाव घेत सायकलवरून मंदिराकडे तिरपी नजर टाकली तर दिवा फिरतांना दिसला.

हिंमत करून थांबले व देवाचे नामस्मरण करीत जवळ गेलो तेव्हा आश्चर्याचा धक्काच बसला* *मंदिरपरिसरातील शेतातील उंदिर कणकीचे दिवे ओढून नेत होते. 

हे दृश्य पाहून मनातील भिती पूर्ण दूर झाली व त्यानंतर त्या परिसरातून जातांना मला काहीही गैर वाटले नाही.

मनुष्य स्वतः मनात भिती घालून घेत जीवन जगत असतो. म्हणून प्रत्येक गोष्टींची शहानिशा केलीच पाहिजे


Rate this content
Log in

Similar marathi story from Thriller