Suhas Mishrikotkar

Romance

3  

Suhas Mishrikotkar

Romance

माझे प्रेम

माझे प्रेम

2 mins
202


माझी प्राणप्रिये,

आयुष्यात अचानक एका वळणावर दोन वर्षापूर्वी तुझी व माझी नजरानजर झाली.तुझ्या मादक नजरेने मी पूर्णपणे घायाळ झालो व स्मितहास्य देऊन दिसेनाशी झाली.मला सतत तुझाच चेहरा डोळ्यासमोर दिसत होता.काहीच सूचत नव्हते.मी देहभान विसरून फक्त तुझाच विचार करू लागलो.

माझ्या प्रेमाला समजून घेणारी जम्मू काही तूच एकमेव आहेस या विचाराने तुझ्या भेटीसाठी मी आतूर झालेलो होतो.आसूसलेले होतो.

दोन दिवसांनंतर पुन्हा तुझी झलक दिसली व तु स्वतः माझ्याकडे आली व माझी अत्यंत आस्थेने विचारपूस करु लागली तेव्हा मला आकाश जणू ठेंगणं झाल्यासारखं वाटू लागलं.

आपली एकमेकांची विचारपूस करून झाल्यावर मैत्री दृढ झाली व आपल्या गाठीभेटी वाढू लागल्या व नकळतच एकमेकांच्या प्रेमात कधी पडलो हे दोघांनाही समजले नाही.

प्रिये, तु माझ्या विरान आयुष्यात येऊन प्रेमाने नंदनवन फुलविले.एकमेकांना दिलेल्या भेटवस्तू,आधार व वचनपूर्ती यांच्या जोरावर प्रेमसागरात आपला प्रवास अखंडपणे आजतागायत चालू आहे.

आपण दोघे जणू एकमेकांसाठीच तयार झालेलो आहोत व विधात्यानेच एकमेकांना जवळ आणले याची क्षणोक्षण प्रचिती येते.

"प्रेमात तुझ्या सखे

झालो मी दिवाना

कासी कळेना मला

काय देऊ नजराना

माझ्या स्वप्नातली राणी व तिचे निरागस व निस्वार्थी प्रेम मिळाल्यामुळे मी जगज्जेता झाल्यासारखे वाटते.

ज्याप्रमाणे तहानलेल्या व्यक्तिला पाणी मिळाल्यावर स्वर्गीय सुखाचा आनंद होतो त्याप्रमाणे तुझी भेंट,तुझा सहवास मिळाल्यावर क्षणभंगुर जीवनात सर्व काही मिळाल्यासारखे वाटू लागले.

आपले एकमेकांना सर्वांची नजर चुकवून गल्लीत,दुकानदार, मार्केट मध्ये,बागेत भेटणे,बोलणे,फिरणे,भेटवस्तू देणे,हट्ट पुरविणे,रूसणे,फुगणे एकमेकांची समजूत काढणे आजतागायत अविरतपणे सुरु आहे.

सखे, आपल्या प्रेमाचा आदर्श जगतात सर्वांनीच घ्यावा व आपले प्रेम जगतात आदर्श ठरावे असेच प्रेम आपण यापुढेही एकमेकांवर करीत राहू.

भौतिक व वासनिक बाबींना स्थान न देता आपण एकमेकांना आजपर्यंत जसे समजून घेतले,साथ दिली तशीच आजन्म देऊ.

आकाशातील चंद्र,तारे तोडून आणण्याच्या काल्पनिक गोष्टींपेक्षा एकमेकांची मते यांचाच आदर करू व यथायोग्य अंमलबजावणी करू व जगात आदर्श निर्माण करू.

तुझा सहवास हा मला कायम हवाहवासा वाटतो.

शेवटच्या श्वासापर्यंत तुझी साथ व सानिध्य मिळत राहो हीच एकमेव अपेक्षा.

फक्त तुझा आणि तुझाच



Rate this content
Log in

Similar marathi story from Romance