Suhas Mishrikotkar

Thriller

3  

Suhas Mishrikotkar

Thriller

आठवणीतील भयकथा

आठवणीतील भयकथा

1 min
204


*मी,माझी बहिण व माझे आईवडील आम्ही एका खेडेगावात रहात होतो.* *आई प्राथमिक शिक्षिका तर वडील इलेक्ट्रिशियन होते* *आमच्या गावापासून ६ किमी अंतरावर असलेल्या कारंजा (लाड) या तालुक्याच्या ठिकाणी जातांना रस्त्याच्या कडेला एक शनिदेवाचे मंदिर.* *आमच्या गावातून कारंज्याला गेलेले सर्व लोकं अंधार पडायच्या आत गरी यायचे कारण त्या मंदिर परिसराविषयी अनेक आख्यायिका सर्वत्र चर्चिल्या जात होत्या.*


*मंदिराच्या आजूबाजूला रात्री दिवा फिरतो अशी चर्चा होती.* *मला अचानक कारंजा येथील मामांकडे सायकलने जावे लागले.* *मी जेमतेम बारा वर्षाचा होतो.* *मामाकडचे काम आटोपून परत निघणार तेव्हा मामामामींनी सायंकाळी जेवणाचा आग्रह केल्यामुळे निघतांना सात वाजले.* *मनात अत्यंत भिती तरीही सायकलने परत निघालो.* *मंदिराच्या जवळ येईपर्यंत अंग घामाने चिंब झाले होते.*  *देवाचे नाव घेत सायकलवरून मंदिराकडे तिरपी नजर टाकली तर दिवा फिरतांना दिसला.* 


*हिंमत करून थांबलो व देवाचे नामस्मरण करीत जवळ गेलो तेव्हा आश्चर्याचा धक्काच बसला* *मंदिर परिसरातील शेतातील उंदीर कणकीचे दिवे ओढून नेत होते.* *हे दृश्य पाहून मनातील भिती पूर्ण दूर झाली व त्यानंतर त्या परिसरातून जातांना मला काहीही गैर वाटले नाही.* *मनुष्य स्वतः मनात भिती घालून घेत जीवन जगत असतो.* *म्हणून प्रत्येक गोष्टींची शहानिशा केलीच पाहिजे*

🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏


Rate this content
Log in

Similar marathi story from Thriller