ती शांतता वेगळीच होती.....
ती शांतता वेगळीच होती.....
ही गोष्ट एका रात्रीची... वेगवेगळे क्लास चालू होते .. सर्व मुले वेगवेगळ्या शिक्षकांची क्लास करत होती....
क्लासच्या मधेच स्लाईड सरकून एक वरतून msg आला ,
(...माझ्या प्रिय विद्यार्थी मित्रांनो....
तुमच्या स्वप्नातील पोस्टसाठी तुम्ही निरंतर झटत आहात आणि इथून पुढे तुम्ही असाच छान पैकी अभ्यास करत रहा.तुमच्या स्वप्नांना गवसणी घालने हेच तुमचं अंतिम ध्येय आहे. तुमची स्वप्न पूर्ण करण्यासाठी माझा आत्तापर्यंत खारीचा का होईना वाटा तुमच्यासाठी देता आला याचा मला आयुष्यभर अभिमान राहील.परंतु माझा तुमच्याबरोबरचा academy वरील माझा प्रवास आज इथे थांबत आहे. तुम्ही नक्कीच खूप भरभरून प्रेम दिलं मला ते कधीही न विसरण्यासारखा आहे. academy हा भारतातील सर्वात मोठा ऑनलाईन learning प्लॅटफॉर्म आहे इथे भारतातील टॉप एज्युकेटर्स तुम्हाला मार्गदर्शन करतात रात्रंदिवस तुमच्यासाठी झटतात तुम्ही नक्कीच याचा फायदा करून घ्या आणि तुमचा स्वप्न साकार करा मी नक्कीच तुमच्याबरोबर असेल.
नेहमी प्रमाणे तुमची,घरच्यांची काळजी घ्या आणि Always be happy 😊👍......))
बघते तर काय नितेश सर चा msg होता . नेहमी प्रमाणे अस वाटलं की क्लास विषयी असेल कही तरी...असा विचार करत पुन्हा क्लास मधे लक्ष केंद्रित केले... पुन्हा एक विचार आला मनात की सरांनी आता पर्यंत एवढा मोठा msg केव्हा न केला.... म्हणून msg पुन्हा बघितला... बघते तर काय msg खूप लांभ दिसत होता ... म्हणून क्लास off करून व्हॉट्स ॲप ओपन केले आणि msg read करून बघते ते तर काय एक विपरीत विचित्रच घडले.... मला माझ्या वाचण्या वर विश्र्वासच बसत नव्हता म्हणून पुन्हा पुन्हा msg वाचला... वाचता क्षणी डोळ्याला धार लागलत होती अश्रूंची... हे असे का झाले ? का बर काय कारण असेल?? काय problem झाला असेल???
असे वेगवेगळे प्रश्न मी स्वतःच स्वतःला करू लागले....
हा msg जेव्हा सर्व विद्यार्थ्यांनी बघितला त्याच क्षणी.....सर्व मुले group वर एकत्र गोळा झाली.....एक मेकांना विचारू लागली ... काय झालं हे ?? कोणाला काही माहिती आहे का??? सरांनी असा msg का बर केला असेल ??? कोणी म्हणू लागले तुला माहिती आहे का रे ??? कोणी बोलू लागले तुला माहिती आहे का ग??? .....
ज्याला ज्याला जसे जसे कळू लागले ... तसतसे सर्व ग्रुप वर येवून msg करू लागली.... आणि प्रत्येक जण आपआपली. मते मांडू लागली....
सर्वांचा तो सरान बद्दल चा जिव्हाळा बघून मनात आनंद पण होत होता ...आणि दुःख पण दाटुन येत होते....
आनंद असा की कमी काळात सरांनी विद्यार्थी संपती किती जोडली .... आणि दुःख असे की सरांना academy सोडावी लागली.....
एकावर एक msg चालू होती ..कोणी रडत होते ..तर कोणी रागा मधे बोलत होते प्रत्येक जन आपल्या भावना व्यक्त करत होते.... मात्र सर्वांच्या बोलण्याचे तात्पर्य मात्र एकच होते .... ते म्हणजे नितेश सर वापस येण्याचे.....
त्या रात्रीला कोणती रात्र म्हणावं कळत नव्हते....
कोणाचेच डोळे लागत नव्हते... सर्व विद्यार्थी खूप वेळ पर्यंत जागीच होते msg करत होते.... अधून मधून विचारत होते ... झाले का आता नीट म्हणून बघत होते...
सर्वांनी मग विचार असे केले academy ला msg करून करून जणू आंदोलनच सुरू केले......
प्रत्येक जण email करू लागले ... Cll करू लागले...ज्यांच्या कडून जे होईल ते .. ते ते करू लागले...
शेवटी रात्र खूप झाली ... झोप येत नव्हती पण नाईलाजाने ... एक एक जण group मधून left होवू लागले..... उद्याला सर्व ठीक होईल या विचाराने सर्व झोपी जाऊ लागले ... झोप कसली लागते या विचाराने... न उठणारे सकाळी आज पहाटे उठून आधी मोबाईल बघू लागले.....
झाले असेल सर्व कही नीट म्हणून व्हॉट्स ॲप msg चेक करू लागले.....पण न दिसता काही,, सर्वजण नाराज होऊ लागले...... आता पुढे काय करावं म्हणून विचार करू लागले..... रात्रीचा हा सर्व प्रकार बघून जसे आंदोलनच झाले असे मनाला भासू लागले.....
मधेच ग्रुप वर कोणी तरी msg करू म्हटले की... हा एक उपाय करून बघा होईल तर होईल सर्व कही बरे.....
सर्व विद्यार्थी झाले तयार .... या विचाराने ते प्रत्येक जण करू लागले तो उपाय ....पण मधेच कही वेगळेच घडले......
जेव्हा हे सर्व कही नितेश सराना कळले...तेव्हा त्यांनी प्रत्येक विद्यार्थ्याला विनंती केली की असे नका करू तुम्ही...
(((विद्यार्थी मित्रांनो परत msg टाकतोय त्यासाठी की खूप जण मेसेज आणि कॉल करत आहेत मला सर्वांशी बोलण आता शक्य होत नाहीये परंतु आपण कोणत्या तरी मार्गाने connect राहू आपल ध्येय अंतिम गाठू....सर्व academy चे शिक्षक दिवस रात्र मेहनत करून तुम्हाला शिकवतात. माझी फक्त एक विनंती आहे की त्यांच्या class ला कोणीही disturb करू नका. कारण शिक्षण देणारे ठिकाण ज्ञानच मंदिर आहे. तुमचं माझ्यावरचा प्रेम आणि विश्वास यासाठी मी सदैव आपला ऋणी असेल.....))
