झाडे लावा झाडे जगवा....
झाडे लावा झाडे जगवा....
काही दिवसा आधीची गोष्ट... एकदा मी अशीच फिरत होते,, फिरता फिरता मला एक बाग दिसली म्हणून झाडांच्या सावलीत मी तिथे जावून बसले ...१०..१२ वर्षाचा एक मुलगा त्या बागेत आला, आणि माळीकाकांशी काही तरी बोलू लागला.
तेवढ्यात माझे लक्ष त्याच्या पाठीकडे आणि तोंडाकडे गेले. त्याच्या पाठी वर जणू विचवाप्रमाणे बिऱ्हाडच होते आणि नाकाला रुमाल होता ते बघून असे वाटले की त्याचे ओठ सुजले असेल .. आणि त्याला कुबड रोग झाला असेल , नाकालाही रुमाल बांधलेला होता. मी त्याला दुरूनच कुतूहलाने बघत होते.
थोड्या वेळाने त्याचे बाबा ही तिथे आले ...त्यांच्या हातात इवलेसे छोटेसे कडुलिंबाच्या झाडाचे रोपटे होते. माळीकाकानी केलेल्या खड्ड्यात त्या मुलाने ते रोपटे रोवले.. त्या रोपट्याला पाणी दिले... आणि परत जायला निघाला..
नंतर मला रहावले गेले नाहीं म्हणून मी त्याच्या कडे गेले आणि त्याला कारण विचारू लागले..
तो गोड मुलगा तितकाच गोड माझ्याकडे बघून हसला.
त्याने बाबाकडे बघितले आणि पाठीवरचे जॅकेट व रुमाल काढला. तो सर्व दृष्य बघून मला धक्काच बसला . कारण मी ज्याला कुबड रोग आणि सूजलेले ओठ समजत होते ... ते मात्र ते नसून माझा गैरसमज होता कारण ते पाठीवरचे कुबड म्हणजे Oxygen tubing आणि नाकाला मास्क होते....
तात्पर्य.... येत्या काळात ही वेळ आपल्या वर नको. यायला म्हणून निसर्गाला जपा...
