STORYMIRROR

manisha sunilrao deshmukh

Abstract Drama Inspirational

3  

manisha sunilrao deshmukh

Abstract Drama Inspirational

स्वार्थ असे पर्यंत गोड

स्वार्थ असे पर्यंत गोड

1 min
229

एक दिवशी एक गाढव विहिरीत पडला. गाढव जोराने ओरडत होता. आणि मालक विचार करत होता, याला बाहेर कसे काढायचे .त्याने विचार केला बाहेर काढणे अवघड आहे. नाहीतरी गाढव म्हातारा आहे .त्याला वाचवून काही फायदा नाही, त्यापेक्षा त्याला विहिरीतच पूरून टाकू. 


मालकांने आजूबाजूच्या लोकांना मदतीला बोलावले. सगळेजण विहिरीत माती लोटत होते .गाढव आणखीनच घाबरु लागला. थोडा शांत झाला. थोड्यावेळाने मालकांनी विहिरीत डोकावले, पाहतो तो काय गाढवाच्या पाठीवर जशी माती पडत होती तसतसा ती माती झटकून तो मातीतून पाय काढून उभा राहत होता शेवटी विहीर बुजली . गाढव विहिरीच्या बाहेर आला व वाट दिसेल तिकडे पळू लागला .


तात्पर्य- तुमच्या आयुष्यात अनेकदा तुमच्यावर माती फेकली जाईल, वेगवेगळ्या प्रकारची घाण तुमच्यावर फेकली जाईल, पुढे जाण्यापासून तुम्हाला रोखले जाईल ,तुमच्यावर टीका होईल, तुमचे यश पाहून मत्सराने वाईट बोलतील ,अशावेळी खचून जायचे नाही. निराशेच्या विहिरीत पडून राहायचे नाही. धाडसाने अंगावरील घाण झटकून योग्य तो धडा घेऊन त्याचीच शिडी करून पुढे जायचे. त्यासाठी सकारात्मक विचार करा सकारात्मक जगा.


Rate this content
Log in

Similar marathi story from Abstract