STORYMIRROR

manisha sunilrao deshmukh

Others

3  

manisha sunilrao deshmukh

Others

निस्वार्थ प्रेम......

निस्वार्थ प्रेम......

1 min
212

एकदा एक झाड़ वेलीच्या प्रेमात पडल ,

तिला पाहताच त्याला तीच वेड लागल ,

वेलीला विचारू तरी कस? या प्रश्नाने त्याला पछाडल,

पण, आपण जरा धीर धरावा अस म्हणत त्याने

स्वतःला सावरल,

वेल मात्र आपली हसत, खेळत राहत होती,

ते पाहून झाडाने तिच्याशी मैत्री केली होती ,

काही दिवसाने वेल मात्र जमिनीवर पसरू लागली ,

ते पाहून झाडाने तिची विचारपूस केली ,

वेल म्हणाली, झाडा मला तुझा आधार हवा आहे ,

तू मला आधार देशील का ??

यावर झाड़ म्हणाले , तू माझी होशील का ???

ते ऐकताच वेलिने नकारार्थी मान हलवली ,

ते पाहून झाडाची निराशा झाली ,

हिरमुसलेले ते झाड़ क्षणभर विचारात पडले ,

विचार करून त्याने वेलीला आधार देण्याचे वचन दिले ,

वचन देताच वेल मात्र झाडाला बिलगली ,

अन , हसता हसता त्याची आसवे हळूच ओघळली ,

आसवे पुसत पुसत त्याने तिला आधार दिला ,..

अश्या प्रकारे निस्वार्थ प्रेम झाडाने वेली वर केल..


Rate this content
Log in