Ujwala Rahane

Inspirational

4.4  

Ujwala Rahane

Inspirational

"ती अनोखी गौराई"

"ती अनोखी गौराई"

4 mins
430


   आज तिने गणपतीच्या आगमनाची सगळी तयारी केली. सामान पण online आले. फुले दुर्वा पत्री तिच्या बंगल्याभोवतीच होती. जास्वंद पांढरा, शेंदरी, लाल नुसता बहरला होता. मोगरा मस्त फुलला होता. सासरे सतत निसर्गाच्या सान्निध्यात रमणारे, त्यामुळे तिच्या बंगल्याभोवती सतत हरतऱ्हेचे फुले नेहमीच बागडत असत. तिची बाग नेहमीच येणार्‍या जाणाऱ्यांच्या कौतुकाचा विषय असायची.


    गणपती आगमनाची तयारी अगदी जय्यत. यावर्षी भाच्चींने कौतुकाने मामाला गणेशाची मुर्ती बनवून दिली होती. लाडक्या लेकिने मस्त सजावट केली होती. गणरायाचे आगमन जोरदार झाले. सासुबाईंनी त्याच्या स्पेशल उकडीच्या मोदकाचा नैवेद्य गणरायाला मनोभावे अर्पण केला.


   नणंदा पण दरवर्षी प्रमाणे प्रतिष्ठापनासाठी आलेल्या गणरायाचे आगमन खुप छान झाले. 


  अचानक आहोंना तापाची कुणकुण जाणवली. दगदग झाली असेल म्हणून पॅरॅसिटीमॉल घेतली. ताप उतरत नव्हता. तोच सासऱ्यांना खोकल्याने पकडले. तिची तारांबळ सासूबाईं धीराच्या त्या म्हणाल्या, अग हवा बदलामुळे होते कशाला घाबरतेस?


   पण हीचे मन राजी नव्हते. नवऱ्याला गळ घातली व covid टेस्ट करून घेतली.अचानक Report पॉझिटिव्ह मग एकापाठोपाठ सगळ्यांचेच Report पॉझिटिव्ह?


    ती डगमगणाऱ्यातील नव्हती.देवभोळी तर मुळीच नव्हती. पण आज सहज मखरात विसावलेल्या गणरायाला तिने हात जोडले.आता तुच रक्षण कर,परत आरतीची जय्यत तयारी केली. धुमधडाक्यात आरती ही केली. 

   गणेश आश्चर्यचकित झाला. ही घाबरत नाही? तिचा आत्मविश्वास दांडगा सगळे निर्णय पटापट घेतले.


   आलेल्या रिपोर्ट्सची माहिती आपणहून महानगरपालिकेत नोंदवली. कोव्हिड हॉस्पिटलची पडताळणी करून, घरातील सगळ्या सदस्यासह तीही चांगल्या हॉस्पिटलमध्ये तीही अ‍ॅडमिट झाली. 


  हे सगळे करत असताना मखरातल्या गणरायाकडे साश्रूनयनाने बघत होती. 


   नक्कीच तो परीक्षा घेत होता.हे तीने मनोमन जाणून होती. तेवढ्यात एक जमेची बाजू म्हणजे मुले यातून सुरक्षित होती. मग तीने मुलांना दुसऱ्या घरात शिफ्ट केले. मोठया बंगल्यात फक्त दोन लहान मुले. मनात धाकधूक मन तिने चेहऱ्यावर दाखवले नाही. धीराने तिने पाऊले उचलली.


   BMC वाले आले.अचानक बंगल्याच्या गेटला बॅनर लावले."contentment zone"


   आजुबाजुच्या घराच्या नजरा थोडावेळ हिच्या बंगल्यावर खिळल्या.काही साशंक तर काहींच्या नजरेत मदतीची भावना. काहींनी फोन करून मदतीची तयारी दाखवली.


   पण तीने हो मदत लागली तर, तुमचीच घेईल.असे मधुरवाणीने सांगितले.


   तिची कणखर भुमिका गणराया बघत होता. तिची व गणरायाची नजरानजर चालूच होती. गणरायाच्या सेवेत तसूभरही कसूर ठेवत नव्हती. आरती मनोभावे ती करत होती. 


   इकडे नणंदेकडे गौरीची तयारी. दरवर्षी हक्काची सवाष्ण म्हणून नणंद हिलाच बोलवायची. पण यावर्षी निर्बंध. इकडे नेहमीप्रमाणे नणंदेने गौरीची स्थापणा केली. मन मात्र माहेरी गुंतलेले. सकाळीच फोन करून चौकशी केली. हीने सांगितले, काही काळजी करु नका, आम्ही सगळे व्यवस्थित आहोत. तुम्ही तुमच्या गौरीगणपतीचे सर्व व्यवस्थित करा.


  कुठे तरी बाप्पा जेवतात ना यात समाधान मानायचं. ती म्हणाली. नणंदेने स्वयंपाक केला. गौरीच्या नैवेद्याचं पानं वाढलं. मनोभावे गौरींना व गणेशाची पुजा करून मनोभावे नमस्कार केला.


   इतक्यात गौरी नणंदेच्या कानात कुजबुजली. का ग? यावर्षी तुझी भावजय नाही आली सवाष्ण म्हणून जेवायला ? नणंदेचे डोळे पाणावले. व नणंदेने सगळी करून कहाणी सांगितली.


   गौरीला भरून आले. गौरीने गणरायाला बोलते केले. का रे? हा रे, कोणता खेळ? आणि खेळायचे कोणाशी? आपल्या भक्ताच्या जिवाशी? गौरीचा पवित्रा पाहून गणराया बावरला, त्याला आपली चुक कळली. 


   पण इकडे ही खंबीर होती. तो धावत आला तिच्या मदतीला.सहज बोलून गेला चुकलो ग! ती म्हणाली, तु कुठे चुकलास? तु तर माझा गुरू निघालास. माझा फक्त अभ्यास बघितलास. हे बरीक हं! , पेपर थोडा अवघड काढलास. उत्तरे शोधणे कठीण होत होते. पण मी सोडवत आहे. तु स्वस्थ रहा! थोडी तुझ्या सेवेस कसुर झाली.पण सांभाळून घे तेवढे. 


  पण नक्कीच पुढच्या वर्षी पुर्तता करेल. तिने हार नाही मानली. ती जोमाने लढली गौराईच्या रूपाने घराला सावरले. कोरोना सारख्या राक्षसाला दुर पळवले. सगळे घरी आले. परत जोमाने कामाला लागले.जास्वंद बहरला. अनंताने तर सगळे वातावरण सुवासमय केले. मोगरा टवटवीत झाला. बाग तिची चांगलीच बहरली. गणराया हळूच तिच्या कानात कुजबुजला! 


 अग मला तुझ्या बागेतल्या फुलांचा हार आणि दुर्व्याचा हार हवाय! एवढेच ना तु पुटपुटली. बाबांना तिने हाक मारली. बाबांना बागेतल्या फुलांची मागणी केली. आवडीचे काम बाबांनी सगळे फुले आणली. सगळ्या झाडांना मालकाचा हात लागताच, सगळी झाडे मालकाला बिलगली. नवरोजीनी दुर्वा निवडला. सासुबाईंनी मस्त हार बनवला. मुलांनी हळूच आज्जी कडे मोदकाची मागणी केली. आज्जीने आपल्या आजाराची शाल दुर फेकून, जोमाने मोदकाच्या तयारीला लागली. 


  सगळेच कसे मंगलमय गणराया मखरातून मस्त बघत होता. परत नव्या उमेदीने सगळ्यानी गणरायाची आरती केली. आणि सगळ्यासाठी निरोगी आयुष्याची मागणी केली.


  शेवटी गणरायाला साश्रूनयनाने बघत ती म्हणाली, हे गणेशा अशी परीक्षा परत कोणाची नको घेवूस रे! आता एक काम करशील मला तुझ्या कडून एक बक्षीस देशील?गणराया उदगारला बोल काय हावे? ती म्हणाली, आम्ही जे भोगले ते इतरांच्या वाट्याला नको. म्हणून ह्या कोरोनाचे तु विसर्जन करशील? गणराया तथास्तू म्हणाला!.. गणरायाच्या डोक्यावरचे फुल हळूच हिच्या ओंजळीत पडले. 


   नक्कीच पुढच्या वर्षीच्या गणरायाच्या स्वागतासाठी सज्ज, (भले बुरे विसरुन) ती आत्तापासूनच तयारीला लागली. घर परत हसले.


Rate this content
Log in

Similar marathi story from Inspirational