Sunil Khaladkar

Drama Tragedy

4.0  

Sunil Khaladkar

Drama Tragedy

ती आणि tea

ती आणि tea

5 mins
387


प्रत्येक माणसाच्या आयुष्यात काही घटना घड़लेल्या असतात की जो कधीही विसरू शकत नाही.

माणसाने क्लेशदायी गोष्टी आठवून रडण्यात वेळ घालविण्यापेक्षा आनंद, सुख देणाऱ्या छोट्या मोठ्या गोष्टी आठवाव्या की, ज्याने एक हास्य तुमच्या चेहऱ्यावर येईल आणि तो आनंद बराच काळ तुमच्यासोबत असेल…..

त्यातलेच काही प्रसंग तुमच्या सोबत शेयर करतो....


साधारण १५ वर्षापूर्वी सरकारी कामामुळे बाबांची बदली झाल्याने आमचे ताम्हणकर कुटुंब नाशिकला राहायला आले.. 

खरंच नाशिक खुप सुंदर शहर आहेच आणि त्याचसोबत तेथील तिच्या आठवणीमुळे तर त्याला चार चांद लागले आहेत....

आम्ही नाशिकला एका वाड्यात राहत होतो तेथील घरे अगदी चिकटुन चिकटुन असल्याने, बाजुच्या घरात जर कोणी टीव्ही सीरियल पाहात असेल तर सर्व संवाद ऐकायला यायचे. थोड़े दिवस मला त्याचा वीट आला होता म्हणून मी बराच वेळ बाहेर असायचो.


एके दिवशी घरात जेवत बसलो होतो, आईने आंबट कढ़ी आणि भात बनवला होता. काही वेळाने मला मुलांना शिकवण्याचा आवाज येवू लागला, बहुतेक बाजुच्या घरात कोणीतरी ट्यूशन घेत असावे. 


तुम्हाला सांगतो, तो आवाज इतका मधुर आणि गोड होता की, तो कढ़ीभातसुद्धा मला नारळीभातासारखा गोड वाटायला लागला. झाले तर मग, मला त्या आवाजाची ओढ़ लागली आणि मी तसाच बाहेर गेलो परंतु बाजुच्या घराचे दार बंद असल्याने आत तिचा चेहरा मी पाहू शकलो नाही आणि नाराज होवून मी घरी परत फ़िरतोच तर मला त्या घरातून मस्त चहाचा सुगंध यायला लागला. मला तो वास घेवून चहाची तलब झाली मन बेचैन झाले आणि न राहवून तिच्या घराचा दरवाजा ठोठावला. तिने दार उघडले आणि तिला पाहताच माझ्या हॄदयाचे ठोके वाढले. सर्व आसमंत स्तब्ध झाल्यासारखा झाला. मला फक्त तिचा गोड गुलाबी चेहरा दिसत होता...ती माझ्याशी बोलू लागली की कोण आहात तुम्ही? काय पाहिजे?

 

मला तर काहीच ऐकायला येत नव्हते. मी पूर्ण मंत्रमुंग्ध झालो होतो. शेवटी तिने थोडा आवाज वाढवला. कोण पाहिजे तुम्हाला? 

मी झोपेतून उठल्यासारखा झालो, आणि तिला माझे नाव आणि तुमच्या बाजूला राहतो सांगितले. त्यावर तिने हलके smile देवून, ती आणि तिची आई काही दिवसांसाठी हे घर भाड्याने घेतले आहे आणि इथे ट्यूशन चालू केले असे सांगितले कारण अगोदरची रूम खुप लहान असल्याने तिथे मुलांना बसायला जागा होत नव्हती...


ती माझ्याशी बोलत होती आणि माझ्या मनात एकच गोष्ट घुमत होती की, तिने मला चहा प्यायला आत बोलवावे.

पण ती काहीच बोलली नाही आणि ट्यूशन चालू आहे आपण नंतर बोलू असे सांगून दार पुन्हा लावले.


मला माझीच कीव यायला लागली आणि मी घरी परतलो.


ती रात्र माझ्या अजून स्मरणात आहे कारण ती रात्र, तिच्या सुंदर चेहऱ्याने, मृदुल आवाजाने माझी झोप उडवली होती. ती रात्र उघड्या डोळ्यांनी पाहणाऱ्या स्वप्नांची होती. अशी परिस्थिती माझी कधीही झाली नव्हती.

 

मी सतत तिच्या घरासमोरून जायचो आणि चहाचा सुगंध आला की, जरा वेळ तिथेच घुटमळायचो, मला वाटायचे की कदाचित ती बाहेर येईल आणि मला चहासाठी तरी घरात बोलावेल परंतु नाही बोलावले.


एक दिवस मी असाच घरात बसलो असता मला तिच्या रूममधून भांडी पडल्याचा आवाज आला आणि मी लगेच तिथे पाहायला गेलो तर बघतो तर काय! तिची आई चक्कर येवून जमिनीवर पडली होती, मी लगेच त्यांना हातात उचलून जवळच्या डॉक्टरकडे गेलो, त्यांनी तिच्या आईला तपासले आणि घाबरण्याचे काही कारण नाही, अशक्तपणामुळे त्यांना चक्कर आली असे सांगून काही औषधे लिहून दिली.


तिच्या आईला घेवून मी घरी आलो आणि त्यांना औषधे घेवून दिली. मी बराच वेळ त्यांच्या मुलीची वाट पहात बसलो परंतु ती आली नाही. आईना विचारणा केल्यावर समजले की, ती काही कामा निमित्त बाहेर गेली आहे आणि संध्याकाळी येईल.

तिथुन मी माझ्या घरी आलो आणि बिछान्यावर सहज पडल्या पडल्या मला डोळा लागला.


संध्याकाळ कधी झाली मला समजले नाही, अचानक कोणीतरी दरवाजा वाजवला, मला वाटले की, आई-बाबा गावावरुन परतले, मी दरवाजा उघडला आणि समोर ती ऊभी होती, तिच्या चेहऱ्यावर मला आभारप्रदर्शनाचे भाव दिसले आणि तिचे सुंदर डोळे त्यावेळी पाण्याने भरले होते. 


तिने हात जोडून मला धन्यवाद दिले. बहुदा झालेला प्रसंग तिच्या आईने तिला सांगितला असावा.

मला काय करावे, काय बोलावे सुचेना. मग धीर करून तिला सांगितले की तुम्ही काळजी करु नका सर्व ठीक होईल असे सांगितले, तिनेही माझा झोपेतून उठलेला चेहरा पाहुन, तिच्या घरी चहा प्यायला बोलावले...


मित्रांनो काय सांगु, जगातील सर्वात मौल्यवान गोष्ट मला कोणी देत आहे असे वाटले आणि मी लगेच तोंडावर पाणी मारले आणि तिच्या घरी गेलो.

आई खाटेवर पडून होत्या. त्यांनी मला पाहिल्यावर तिला सांगितले की, अगं, चहा बनव लवकर.

मला अस्स झाले होते की, तिच्या हातचा बनवलेला चहा मी कधी पिऊ......


ती चहा बनवायला जाणार, इतक्यात तिचा मोबाईल वाजला. आणि तिच्या चेहऱ्यावर एक घबराहट निर्माण झाली, तिला आईने विचारले असता, तिने सांगितले की, तिचा मामा आणि मामी एका मुलाला घेवून त्यांच्या घरी येत आहेत. 

तिच्या आईने सांगितले की, अगं, मला त्याने मला सांगितले होते की, तो आज येईल परंतु माझ्या आजच्या प्रसंगामुळे काही लक्षात राहिले नाही.


मी तर अक्षरशः बुचकळ्यात पडलो होतो. तिच्या आईनेसुद्धा मला छान कपड़े घालुन 10 मिनिटात परत या असे सांगितले. मी आतून खुष होतो की, कदाचित मामा मामीशी माझी ओळख करून देणार.....

मी घरी गेलो, छान कपड़े घातले, परफ्यूम लावले आणि त्वरित तिच्या घरी पोहचलो, तिथे ती माणसे अगोदरच येवून पोहोचली होती. मला बसायला जागा करून दिली आणि मी एका ठिकाणी बसलो. चहाचा मस्त सुगंध सुटला होता...आता मला ती आणि tea हे दोन्ही आयुष्यात येतील असे वाटू लागले आणि तिथेही चहाच्या उकळ्या फूटत होत्या आणि माझ्या ही मनात आनंदाच्या उकळ्या फूटत होत्या.


तेवढ्यात तिच्या आईने माझी ओळख करून दिली आणि त्यांना सांगितले की, ही व्यक्ती जर नसती तर आज माझे काय झाले असते कुणास ठावुक.

माझी कॉलर ताठ झाली आणि चेहऱ्यावर एक हास्य आले.

तीसुद्धा tea चा ट्रे घेवून आली, वाह! ती साडीत काय सुंदर दिसत होती म्हणून सांगु.. चहाच्या वाफ़ा तिने धरलेल्या ट्रेमधून येत असताना अगदी रामायणमधील एखादी देवी समोर ऊभी असल्याचा भास मला होवू लागला.


तिने पुढे येवून सर्वांना चहा दिला, सर्वांनी चहाचा घोट पिला परंतु ते हातात आलेले अमृत पाहुन माझे हात अगदी कापत होते, तिने बनवलेल्या चहाचा घोट पिणार इतक्यात आवाज आला.....मुलगी पसंत आहे.....


मी मागे वळून पाहिले तर, मामा मामी सोबत जो मुलगा आला होता त्याने ते उद्गार काढले होते...


त्यावर तिच्या आईच्या तोंडातून शब्द निघाले की, माझ्या मुलीच्या हातचा चहा जो पीईल तो तिला नक्कीच पसंत करणार....माझ्या चेहऱ्यावर बारा वाजले होते, माझी अवस्था जिंकण्यासाठी 1 धावाची गरज असताना धावबाद झाल्यासारखी झाली होती....


त्या चहामधून येणारा सुगंधसुद्धा हवेत विरुन गेला होता...मी तिच्याकडे पाहिले आणि मला तिथेच भोवळ आली आणि तसाच पडलो, हातातुन चहाचा कप सुद्धा खाली पडला. 


काही वेळाने मला जाग आली आणि डोळे उघडले असता मी स्वतःला माझ्या घरात पाहिले , समोर माझे आई बाबा आणि बाजुच्या घरातील मुलगी आणि तिची आई उभी होती. 


तो उभा प्रसंग आज ही माझ्या डोळ्यासमोर आहे ,जो मी आयुष्यात कधी ही विसरु शकणार नाही. 

एक म्हण मला आठवली की,

तेल ही गेले तूप ही गेले, हाती आले धूपाटणे... आणि

माझी अवस्था अशी होती की,

ती ही गेली, tea ही गेले 

हाती आले धूपाटणे....


मला त्या मुलीचे नाव आज ही माहित नाही. कारण तिने ही कधी सांगितले नाही आणि मी सुद्धा कधी विचारले नाही...

म्हणूनच मनातील गोष्टी वेळेवर प्रकट कराव्या नाहीतर रडत बसायची पाळी येते...


गेला तो काळ आणि राहिल्या त्या आठवणी....

ती आणि tea च्या....ज्या मला मिळाल्या नाहीत....


Rate this content
Log in

Similar marathi story from Drama