संगत.....
संगत.....
मित्रांनो,
आपल्याला माहीतच आहे की, अंतरात्मा कितीही स्वच्छ असला तरी त्याला देहासोबत अनेक सुख दुःख भोगावी लागतात. माणसाला जशी चांगली वाईट संगत लाभते तसा तो घडतो आणि त्याला गती अथवा अधोगती प्राप्त होते.
जवळपास पंधरा वर्षांपूर्वी, स्वप्नील माझ्या शाळेत शिकणारा अत्यंत ढ, मस्तीखोर मुलगा होता. त्यात त्याचा दोष एवढंच होता की, त्याला ज्यांची सोबत लाभली होती ती सर्व अनेकदा नापास झालेली आणि जीवनात कोणतेही ध्येय नसलेली मुले होती. त्यामुळे साहजिकच सोबत गुण संगत गुण हे स्वप्नील लां ही लागले होते.
परंतु आज वर्तमानपत्र वाचताना त्याची बातमी छापून आली होती की, पोलिसांच्या चकमकीत कुविख्यात गुंड ठार झाला.
काय वाटले तुम्हाला? कोण होता तो गुंड?
तो गुंड स्वप्नीलचा शाळेतील जोडीदार होता आणि तो पोलीस ऑफिसर म्हणजे आपला स्वप्नील.
शाळेनंतर आम्ही सर्व वेगळे झालो तेंव्हा स्वप्निलचे वडील वारले होते. कुटुंबाची जबाबदारी त्याच्या एकट्यावर आली होती. सुदैवाने त्याला संगत सुद्धा चांगल्या मुलांची लागली आणि तो आज शिकून पोलीस इन्स्पेक्टर झाला.
पाण्याला उसाच्या संगतीने गोडवा येतो आणि विषारी वेलीने पाण्याचा प्राणघातक रस तयार होतो.
थोडक्यात काय तर....
उत्तम संगतीचे फळ सुख | अध्दम संगतीचे फळ दु:ख | आनंद सांडूनिया शोक | कैसा घ्यावा ||
