Sunil Khaladkar

Drama

3  

Sunil Khaladkar

Drama

प्रेम आणि आपली माणसं...

प्रेम आणि आपली माणसं...

3 mins
242


मित्रांनो,

ही गोष्ट माझ्या शेजारील घरात , माझ्या मित्राच्या बाबतीत घडलेली आहे. ही गोष्ट त्यानेच मला शेयर केली आणि मी तुमच्या समोर सादर करित आहे.

त्या दिवशी दिनेश घरात एकटाच होता, त्याची बायको, मुले सर्व गावाला कोकणात गेली होती. दिनेश ला सुरुवातीला खूप छान वाटत होते की घरी कोणी ही त्याला बोलायला नाही, disturb करायला नाही...

एकदम मुक्त पक्ष्या प्रमाणे त्याला वाटत होते. रोज सकाळी उशीरा उठणे, आरामात जेवण करणे परत झोपणे ह्या सर्ब गोष्टी त्याच्या २ दिवस चालू होत्या.

झाले मग, 3 रया दिवशी त्याला काहीतरी कमी भासायला लागली. त्याला घरातील मुलांचे आवाज ऐकू यायला लागले, बायकोची सतत ची बडबड तो कुठेतरी miss करु लागला होता. त्याला आता करमेनासे झाले. Tv मध्ये , मोबाइल मध्ये लक्ष लागत नव्हते. ते तरी किती वेळ बघणार? शेवटी बोलायला , संवाद साधायला आपलीच माणसे लागतात. त्याला समजून चुकले होते की, ज्या बायको-मुलांना गावाला लवकर पाठविण्यासाठी तो कित्येक दिवस धडपडत होता आज त्यांना घेवून येण्यासाठी, त्यांना समोर पाहण्यासाठी अक्षरशः तड़फडत होता. बोलावे तर कोणाशी? भले भिंतीला कान असतात परंतु बोलायला तोंड कुठेय.....

दिनेश ने ठरवले की, गावाला जायचे आणि त्यांना परत घेवून यायचे. तो जाण्यासाठी निघाला आणि त्याने दरवाजा उघडला, समोर पहातो तर काय!

त्याची बायको, मुले डोळ्यासमोर ऊभी..... त्याला समजेना कि हे खरे आहे की स्वप्न आहे. त्याचा विश्वास बसेना.

परंतु त्याला एवढे समजले की, सच्या मनाने जर आपल्या प्रियजनाना हाक मारली तर ते तुमच्या समोर येतात.

मुलांनी आणि बायकोने दिनेशकडे प्रेमाने पाहिले.....आणि दिनेशने त्यांना जवळ घेतले.

मग त्याने बायकोला विचारले कि काय झाले तुम्हाला? तुम्ही अचानक कसे आलात? फोन नाही केला?

त्यावर मुले आणि बायको एकमेकाकड़े पहायला लागली आणि त्यांना रडू आले...

दिनेश ची बायको त्याला सांगायला लागली की, मुले घरात खुप कंटाळली होती , तुम्ही त्यांना lockdown मुळे बाहेर पाठवत नव्हता आणि मोबाईल, tv सुद्धा पाहुन देत नव्हता .

तसेच मी सुद्धा रोजच्या जीवनाला आणि सतत च्या कामाच्या व्यापाला कंटाळली होते त्यामुळे मी आणि मुले आम्ही विचार केला की , गावाला जावू म्हणजे आपल्याला काही काळ का होईना आराम मिळेल आणि तुमच्या रोजच्या हे करु नका, ते करु नका, हे पाहू नका, ते पाहू नका, यामधुन काहीशी सुटका मिळेल, परंतु गावाला 2 दिवस बरे वाटले आणि काहीतरी miss केल्या सारखे आम्हाला वाटू लागले.

आणि आम्ही लगेच यायचा विचार केला आणि आलो.

आम्हाला तुम्ही पाहिजेत..आपला माणूस पाहिजे...हे बोलताना त्याच्या बायकोचे लक्ष दिनेश ने भरलेल्या bag कड़े गेले.. तिने विचारले की तुम्ही कुठे निघाला होता त्यावर दिनेश च्या डोळ्यात चटकन अश्रु आले.

त्याने सुस्कारा सोडत बोलले की, तुम्हाला घरी परत आणण्यासाठी मी गावाला निघालो होतो..

हे ऐकल्यावर मुले आणि दिनेश ची बायको अक्षरशः हुंदके देवून रडायला लागली आणि तो परिवार पुन्हा एकत्र आला.

मित्रांनो,

प्रेम आणि आपली माणसे आपल्या जवळच असतात आपणच त्यांना सोडून बाहेर आनंद शोधायला निघतो आणि पदरी निराशा पड़ते.

दुख सुखात, चांगल्या वाईट प्रसंगात आपल्याला जवळची माणसे कामाला येतात त्यामुळे आपल्यावर प्रेम करणाऱ्या व्यक्तिना कधी दुरावू नये. त्यांचा नेहमी आदर करावा....


Rate this content
Log in

Similar marathi story from Drama