परतीचा प्रवास... (अलक लेखन )
परतीचा प्रवास... (अलक लेखन )
माझ्या अगदी जवळचा मित्र दोन दिवसांपूर्वी अचानक उच्च रक्तदाबाने गेला.
घरातून लवकर बाहेर पडलो. बरेच मित्र आणि त्याचे नातेवाईक त्याच्या घराबाहेर जमले होते.
अनेक स्थानिक नेते ही उपस्थित होते. प्रत्येकाच्या तोंडात एकच गोष्ट की, माणूस खूप चांगला होता.
तिथून नंतर सर्व स्मशानभूमीत गेलो. सर्व विधी आटोपल्यावर आम्ही बाहेर निघालो तर तिथे एक मोठ्या अर्थाचा एक छोटा बोर्ड दिसला.
त्यावर लिहिले होते की,
*स्मशानभूमी बाहेर पडताना तुमचा *ego, घमेंड इथेच सोडून जावा.
कारण आपल्या सर्वाना पुन्हा इथेच यायचे आहे.*
हे माझं ते माझं, माणूस आयुष्यभर करतो,
हातचं सुख ठेवून, पळत्या दुःखाला धरतो....
शेवटी काही काळासाठी आपण आलोय इथं,
हेच तो वारंवार का विसरतो????
