STORYMIRROR

Sunil Khaladkar

Tragedy Inspirational

3  

Sunil Khaladkar

Tragedy Inspirational

झाडसुद्धा बोलतं....

झाडसुद्धा बोलतं....

2 mins
171

एक विलक्षण अनुभव

जवळ जवळ 15 वर्षांपूर्वीची गोष्ट असेल, त्यावेळी एक हृदय हेलावून टाकणारा प्रसंग प्रमोदच्या आयुष्यात घडला होता.


प्रमोदला आध्यात्मिकतेची खूप आवड, त्यामुळे कुठेही, काही संत महात्म्यांचे कीर्तन अथवा माहिती सादर केली जात असेल तर तिथे हा पहिला हजर असायचा..


त्यावेळी त्याला कोणीतरी सांगितले की, आंध्र प्रदेशात चित्तूर जिल्ह्यात रामकृष्ण परमहंस यांच्या आश्रमात खुप छान सत्संग होतो आणि जीवनाशी संबंधित बऱ्याच गोष्टी शिकविल्या जातात.


हे समजल्यावर हा पठ्या लगेच रेल्वे ने चित्तूरला गेला, आणि आश्रमात पोहचला...कोणाच्या तरी मदतीने त्याने तिथे नोंदणी केली...आणि 8 दिवसाचा कोर्स केला....


तिथे जमलेल्या लोकांना, तेथील उपदेशकांनी झाडाला पाणी घालण्यास सांगितले...

त्यावर प्रत्येकाने हातात बादली आणि तांब्या घेवून भर उन्हात तेथील आमराईमध्ये जावून पाणी घालण्यास सुरुवात केली...


प्रमोदने ही एक बहरलेले झाड़ पाहुन पाणी घालण्यास तिथे गेला....त्या आंब्याच्या झाडाला इतके रसरशित आंबे लागले होते की, कोणालाही ते तोड़ायची आणि खायची इच्छा होईल.


परंतु ते बहरलेले झाड़ फक्त समोरून छान दिसत होते, प्रमोदला वाटले की, त्या झाडाला प्रमोदला काही तरी सांगायचे आहे...आणि ते खुप रडते आहे....


प्रमोदला काही कळेना की करावे?

त्याला त्या झाडाचे हुंदके ऐकायला येत होते, प्रमोद त्या झाडाला पाणी घालण्यासाठी पुढे गेला, आणि पाणी घालत घालत झाडाच्या मागील बाजूस गेला....


तिथे गेल्यावर त्याचा तोल सुटला आणि डोळ्यात अश्रूच्या धारा वाहु लागल्या....


मित्रांनो, ते झाड़ मागून सपशेल कीड़े मुंग्यानी पोखरले होते, समोरून दिसणारे झाड़ मागे असे दिसेल असे त्याला वाटले नव्हते....

ते झाड़ जणू प्रमोद ला विनंती करित होते की, मला वाचव, मला जगायचंय....


खरंच मित्रांनो, आपल्या आसपाससुद्धा या झाडासारखी माणसे असतात...जे बाहेरुन आनंदी दिसतात आणि आतून पोखरलेले असतात....


झाड़ पुन्हा ठीक होईल की नाही माहित नाही, परंतु अशी माणसे जर तुमच्या आयुष्यात आली तर त्यांना आपण मदत केली पाहिजे....

हाच अनुभव सांगायचा होता......


Rate this content
Log in

Similar marathi story from Tragedy