तिच्या डायरीतून
तिच्या डायरीतून


माणसाने सावरायच तरी किती??
तुला त्रासच द्यायचाय ना मला दे .मनासारखं वागायचय वाग, हवं ते कर.
अजून गुंता वाढव ,मी काहीच नाही म्हणणार. होऊदे ना तुझ्या मनासारखं.
फक्त तु तुटू नको. स्वताला खेचत राहू नको.
आपल्या नात्यात तुझी फरफट नकोय मला. कारण तु तुटलास तर मी काय करायचय हे कधी लक्षात येणार आहे तुझ्या.
तुला गुंतायला फार आवडत ना, सगळं मिक्स करायच असत तुला, माझा किती वेळ जातो तुला सावरायला हे कधीच तुझ्या लक्षात येत नाही.
एवढं होऊनही, मीच अडकलेय तुझ्यात कारण...
शेवटी गरज मलाच आहे न.!!!!
तुझं काय... आता आहेस उद्या बसशील रुसून मस्त गाल फुगवून.
पण मलाच ऐकायचं असत ना..तुला !!
तुझा आवाज नाही ऐकला कि जीव कासावीस होतो ,हे कधी कळतच नाही तुला..
हम्म...दुष्ट सारखा वागतोस नेहमी??
गालातल्या गालात मिश्किल हसतोस ??
निरागस भाव आणून,मला फसवतोस,
मी काय केलं ?? असे भाव असतात नेहमी तुझे. मी सतत सोबत असूनही,स्वतामध्येच हरवलेला असतो ?? कस म्हणजे कस जमत रे तुला हे??
पण... तुही एक ध्यानात ठेव चांगलंच,
मला ही तुझ्यासारख वागता येतं.!!
एक दिवस असा येईल कि, तु लाख म्हणशील कि.... मी आहे तुझ्या सोबत.!! पण त्यावेळी मी नाही सोडवणार तुझा गुंता.
हे लक्षात ठेव तु....
# हेडफोन
नवीनच घेईन तु जास्त त्रास दिलास तर !!!
हुश्श.. खुप अथक प्रयत्नांती झालाय बुआ आत्ताच.. सोडवून एकदाचा हेडफोन चा गुंता..
सकाळी सकाळी साग्रसंगीत कानावर पडायला हवं हिच एक भोळी अपेक्षा असते हो या पामराची !!!