निलम घाडगे

Romance

2.5  

निलम घाडगे

Romance

मनातलं पत्र

मनातलं पत्र

10 mins
2.2Kप्रिय.... 

राघव,


पत्र लिहिण्यास कारण की.. आताच रेडिओ वर एक गान एकल.."जिंदगी कैसी हे पहेली हाये! कभी ये हँसाये कभी ये रुलाये!!" आणि तीव्रतेने तुझी आठवण आली रे!!! तूच म्हणायचास ना हे गाणं तुला फार जवळच वाटत.. !! काय पटकन वर्ष संपतात ना!! मला अजूनही आठवतो तो दिवस दोन वर्षापूर्वी ज्या दिवशी तुला प्रमोशन मिळाल!! हातात कसली तरी फाइल घेवुन तु खुप आनंदात धावत आला होतास आणि मला काही कळायाच्या आतच मला मीठी मारली होती...किती खुश होतास तु आणि तुला अस पाहून माझा आनंद गगनात मावत नव्हता!!

अरे पण सांग ना आधी काय झाल ते..

"माझी ट्रान्सफर झालीय"ती पण आपल्या हेड ऑफिस USA ला..रिजनल हेड म्हणून!!"

तुझ्या या वाक्य्यावर मला आनंदी व्हाव की दुखी तेच समजत नव्हत!! आनंद याचा की तुझ्या कष्टाच फळ तुला मिळालेल!! आणि दुःख याच की तु दुर जाणार माझ्यापासून!! 

पण त्या वेळी माझ्या दुखापेक्षा तुझा आनंद मोठा होता माझ्यासाठी.. 

मग कधी जातेय स्वारी...

"एक महिन्यानी"!! 

हम्म...good congratulation!!

मी माझे मनातले भाव लपवत बोलले खरी पण मला खुप मोठा धक्का बसला होता रे तेव्हा!! पण तुला ते भाव समजलेच नाहीत माझे!! तुला आठवतय तु त्यावेळी गमतीत बोलला होता की...यार पण मी खुप एकटा 

पड़ेन ग तिकडे... कारण तु नसशील ना तिथे!! 

तुझे ते शब्द काही क्षणासाठी का होईना पण सुखद गारवा देणारे होते मला!!! पण पुढच्याच क्षणी तु हसत बोलला...कारण तुझी बकबक ऐकायची सवय लागलीय ना ईथे!! अस म्हणून मला माझ्या स्वप्नातून बाहेर अनलस तु!!! आता माझ्या कड़े फ़क्त एक महिना होता...तुझ्या आठवणी आयुष्यभर साठवून ठेवण्यासाठी!! मला प्रत्तेक क्षण जगायचा होता तुझ्या सोबत...

तो एक महिना माझ्यासाठी आयुष्य भराच्या आठवणी सोबत देवून जाणारा होता...

म्हनुनच..ऑफिस मधे किव्हा ऑफिस सुटल्यावर तुझ्यासोबत रहायच होत मला...पण तुला मी अशी का वागतेय कळलच नाही कधी... एकदा मी असच गमतीत बोलले होते की" माझ्या घरचे माझ्यासाठी मुलगा शोधतायत..यावर मला तुझी रिएक्शन पहायची होती... 

पण तु तर फार इजीली हसत बोलून गेलास की "अग मग करुन टाक ना"लग्न!!! तेवढेच काका काकू सुटतील तुझ्या जाचातुन....

किती सोप होत ना तुझ्यासाठी हे सगळ!!

तुला आठवतय तु USA ला जाण्या आधी मी तुझ्यासाठी एक शर्ट घेतला होता!! आणि तुला हे ही सांगीतल होत की USA ला जाताना तोच शर्ट घाल तु!!!माझी आठवण म्हणून!!

हम्म..पण जाताना पाहिल तर तु नव्हता घातला शर्ट तो!! 

खुप वाईट वाटल होत मला तेव्हाही!!!

ऑफिस मधे तुझ्यासोबत जास्त वेळ घालवता यावा म्हणून मी धडपडत असायचे!!!पण तु तुझे प्रोजेक्ट,तुझे मित्र यांच्या सोबत च सतत असायचा!

यावरून आपल भांडण पण झाल होत!! पण तुला मी नक्की ईतकी का चिड़तेय तेच कळत नव्हत!!शेवटी मीच माघार घेतली!! जर तुला माझ्या विषयी काही भावनाच नसतील तर काय फायदा माझ्या अश्या हक्क गाजवन्याचा!! पण मीच विचार केला की का मी अशी वागतेय???काय अधिकार माझा तुझ्यावर??? त्यावेळी माझी अवस्था म्हणजे...."छुपाना भी नहीं आता!!जताना भी नहीं आता!!

हम्हे तुमसे प्यार कितना....

 बताना भी नहीं आता!!!" अगदी अशी झाली होती!! पण तुला यातल काहीच कळत नव्हत!! शेवटी मीच ठरवल की आपल्या प्रेमाची कबुली आपणच द्यायची!!!!!

आणि म्हनुनच मी तुझ्या डेस्क वर एक लव लेटर ठेवल!!आता आठवल तरी हसू येत.... पण काय अवस्था झालेली ते लेटर ठेवताना...कोणाच्या ही 

नकळत ते लेटर ठेवल मी तुझ्या टेबलावर!!! आणि तुझी वाट पाहू लागले!!! खर सांगू खुप धडधडत होत मला तेव्हा मनात.....

आणि तु आलस ही नेहमी प्रमाणे डेस्क वर बैग ठेवली आणि चेयर वर बसलास आणि ते लेटर पहिलस ही!!! मला हे सगळ दिसत होत कारण मी तुझ्या समोरच्या डेस्क वर बसले होते... पीसी च्या अडून मी पाहत होते...कारण मला पाहायच होत की तू कसा रियेक्ट होतो...तू ते लेटर उघडल आणि वाचू लागलास...ईकडे मात्र माझे ठोके वाढत होते!!! तु काही वाचलस आणि नजर वर करुण माझ्याकड़े पाहिल...खर सांगते तुझा तो कटाक्ष जीवघेणा होता....

तु जागेवरून उठून माझ्या कड़े येत होतास पण मला खुप भीती वाटत होती...मी तेव्हा कामात आहे अस दाखवल खर पण माझे हात थरथरत होते!!! 

तु आलास आणि लेटर माझ्यासमोर धरलस....तेव्हा तर मला ठसकाच लागला होता...मी सावरत ते लेटर घेतल आणि विचरल...काय आहे हे??

"लव लेटर" तु शांत उद्गारलास... 

मी धीर करत विचरल,कोणी दिलय हे?

तेव्हा।....मला अस वाटल होत की तुला कळेल की ती मीच आहे म्हणून... 

तु माझ्या शेजारच्या चेयर वर बसलास आणि माझा हात हातात घेवुन म्हणाला की..... तु कोणाला सांगू नको पण हे "अनामिका" ने लिहलय!!

काय???माझा जीव जायचाच राहिला होता फक्त एव्हढ्या जोरात ओरडले मी.... 

मी मनात म्हंटल

ही अनामिका कोण??? मी लिहलेल लेटर तिझ कस होईल "राग आणि अश्रु" एकत्र येत होते मला पण मला दाखवायच नव्हत काहीच!!!

तु हसत होतास तेव्हाही!!! अग लेटर लिहलय खर पण नाव लिहायला विसरली बहुतेक सो... "अनामिका"

तेव्हा माझा जीव भांड्यात पडला!!! आणि मी लेटर उघडून पाहिल तर खाली "फक्त तुझीच" एवढच लिहल होत!!! माझच चुकल नाव का नाही लिहल मी!! मी स्वताशिच पुटपुटले

आणि तुला विचरल की मग...काय विचार केलायय याचा!! 

तुझ ते उत्तर अनपेक्षित होत मला...  "काय करायचय यात!!जो विचार करायचय तो लेटर ज्याने लिहलय ती करेल!!"

किती सहज सोप होत ना तुझ्यासाठी हे सगळ!!मी मात्र आतून तळ मळ त होते... तुझ्या प्रेमासाठी!!!

किती प्रयत्न केले असतिल मी..तुला मनातल सांगायला... पण मी हरले शेवटी!!!नाही जमल मला तुला आपलस करायला!!! तुला आठवतय तु USA ला गेल्यावर एक महिन्याने मला एकदा फोन केला होतास.....

मला अजुनही तेव्हा तुला काय बोलायच होत कळत नाहीये...कारण त्यावेळी तु सतत मी कशी आहे,माझ काय चाललय, माझ्या लग्नाच्या काय झाल हेच विचारत होतास!!!त्यावेळी राहून राहून अस वाटत होत की खरच तु पण मला तेवढच मिस करतोयस का जेवढ मी करतेय???? नंतर नंतर आपल बोलन कमी झाल... तु तुझ्या प्रोजेक्ट मधे, मी ईकड़च्या कामात!!! 

fb वर तुझे तिथल्या फ्रेंड्स सोबत चे बरेच फोटो पाहिले!!! बराच बदलायस तु!! तुला माहिती नाहीये पण मी आज ही तुझ्या डेस्क वरच बसते... तु गेल्यावर मी तिथ शिफ्ट केल..निदान तुझ्या माझ्या आठवणी तरी सोबत राहतील म्हणून!! आपण त्या जागेवर केलेल्या गप्पा... एकत्र उशीरा पर्यन्त केलेल काम.... त्याच जागेवर बसून एकत्र पिलेली कॉफ़ी!! सगळ माझ्या सोबत आहे अजूनही!!!

 मी हे सगळ आत्ता का सांगतेय अस वाटत असेल ना तुला !!! तर अरे खुप वर्ष मनात काही साठलेल ते बाहेर काढायच होत!!! आणि आता बस...

नव्या आयुष्याला सुरुवात करायची आहे..आणि महत्वाच......

" मी लग्न करतेय"..

हो मी लग्न करतेय!! खरतर माझा ही अजुन विश्वास बसत नाहीये... सगळ स्वप्न च वाटतय अजूनही!! पण तस नाहीये!!!खरच मी लग्न करतेय!!!

आणि ज्याच्याशी करतेय त्याच खुप प्रेम आहे माझ्यावर!! आणि मी ही खुप प्रेम करते त्याच्यावर... आता तुला वाटेल की....ईतक्या पुढे गेल्यावर का मी हे सगळ सांगतेय....तर माझा हा अट्टाहास यासाठी की..नवीन 

आयुष्याची सुरुवात मला मागच सगळ पुसून करायचीय!!!आणि ते सगळ मनातून जाण्यासाठी मला तुला हे 

सांगन महत्वाच आहे... काय योगायोग आहे बघ ना...माझ्या होणार्या नवऱ्याच नाव पण "राघव"च आहे!!!

हो राघवच आहे माझ्या होणाऱ्या 

नवऱ्याच नाव!! कारण तो राघव तूच आहेस!! आता तुला वाटत असेल हे सगळ आत्ता सांगायची गरज आहे का?? तर हो...गरज आहे... तुला न भावलेली मी अचानक तुझ्याशीच लग्न करतेय ही थोडी न समजनारी गोष्ट आहे!!! तर जेव्हा तु माझ्यापासून दूर गेलास तेव्हा मी खुप डिप्रेशन मधे गेलेले!!! कशात लक्ष लागत नव्हत!!

तू जेव्हा तो कॉल केला होता..तेव्हा थोडीशी आशा वाटली होती की माझ्यासारखच तुझ ही झालय काय??पण तु तस दाखवल नाहीस!! पण मला माहितेय तु ही माझ्यावर तेवढच प्रेम करत होत माझ्यावर फक्त कबुली दिली नव्हतीस!!! 

शेवटी तिथेही मलाच पुढाकार घ्यावा लागला!! आपल्या कंपनीच एक प्रोजेक्ट साठी USA ला जाण्याची संधी आली..खरतर मला चांस नसता मिळाला...पण तुझ्यासाठी आता ही शेवट ची संधी समजुन मी तो प्रोजेक्ट माझ्या टीम कड़े घेतला!!! तुला मी सांगीतल नव्हत खर की मी USA ला येतेय...सांगीतल असत तर तुझ्या चेहर्यावरचा आनंद कसा पाहता आला असता!!! सगळी तयारी करून आम्ही फ्लाईट पकडली!!! तुला सरप्राइज द्यायच होत म्हणून हॉटेल मधे 

सगळ्यांना सोडून मी तुझ्या कड़े आले तुझा पत्ता तर आधिच घेतला होता मी!!सो जास्त प्रोब्लेम नाही झाला!! तुझ्या रूम वर पोहचले तेव्हा तु   नव्हतास तिथे.... सो मी बाहेरच थांबले तुझी वाट पाहत... तुला फोन नाही केला कारण मला वाट पहायची होती तुझी...

मी जेव्हा तुझ्याकडे येत होते ना तेव्हा खुपकाही चालल होत मनात!!!म्हणजे तु काय म्हणशील??कसा रियेक्ट होशील..अस खुप काही!! तुला भेटून त्या दिवशी खुप भांडायच होत मला तुझ्याशी!!! जाब विचारायचा होता की असा क़ा वगातोय माझ्याशी, मग तुझ्या मिठित राहून खुप रडायच होत मला... आयुष्यभर माझ्या सोबत राहण्याच वचन घ्यायच होत मला!!! हे सगळ चालल असताना तु अचानक आलास..

मला पाहून तुला खरच वाटत नव्हत की मी कशी तिथे... कस शक्य आहे वैगेरे वैगेरे... पण मी मात्र फार कँजवली...सगळ पाहत होते.खर तर मला आतून खुप आनंद झालेला पण तो असा सहजा सहजी नव्हता दाखवायचा!!! मला तिथे पाहून तुला जवळ जवळ धक्का बसला होता!!! आपण नंतर तुझ्या रूम मधे गेलो!!! तरीही तुझे प्रश्न संपत नव्हते... मग मीच म्हंटल अरे थांब जरा..मला बसु तरी दे...मला अस वागताना तुला वाटल असेल ना की ही वेडी तर झाली नाही ना?? रूम छान ठेवलीस तु!!मग कोणी गर्लफ्रेंड बनवली की नाही ईथे??? माझा प्रश्नाने तू भानावर आला

गर्लफ्रेंड??कपाळावर आठ्या पाडत बोलला तु!!! मला समजल तू रागावला आहेस माझ्यावर ते...किती चिडतो रे तु मी सहज बोलले तेव्हा!!! यावर

तु कशी ईथे???अस विचारलस मला!! मग मी बोलले..."तुझी आठवण आली म्हणून आले मग निघुन.. "माझ्या अश्या बोलण्यावर तुला धक्का च बसला होता!!!खर सांगते पण मला खुप हसू येत होत त्यावेळी तुझा चेहरा पाहून!!किती घाबराट होतास तु!!! 

मी अस बोलल्यावर लगेच...मला बर आहे ना..ताप आलाय का?? अस कोण विचारत रे???खुप 

अनरोमँनिट्क आहेस तु हो अजूनही आहेसच!!! मग तिथेही मीच बोलले काय रे माझी आठवण नाही येत का तुला???? तर चक्क गोंधळलेलास तु!

असा कसा रे तु??मी स्वत: एवढ्या हिंट्स दिल्या तरीही तुझ्या कस काहीच लक्षात नव्हत येत!!की तस तू दाखवत होतास??? मला खुप राग येत होता त्यावेळी!!तरीही मी तो कंट्रोल करुण विचारल!! मग काय ठरवलयस तु???

तर तु कशाच काय ठरवल ??अस विचारलस??

मी काय तिथे देशा देशा मधील सबंध कसे सुधरतील यावर चर्चा करायला भेटले होते का तुला??? 

  खर सांगते पण त्यावेळी मी शांत राहिले तसा माझा स्वाभाव नसतानाही ..मला माझ उत्तर जवळ जवळ मिळालच होत!!! कारण मी एवढे सगळे प्रयत्न करून ही तुला माझ्या मनात काय चाललय हे कळत नसेल तर काय फायदा माझ्या अश्या रागावन्याचा !!! मी काही नाही कशाच अस म्हणून निघाले तिथून!! तो दिवस माझ्या जीवनातला खुप वाईट दिवस होता!!! खुप रडले मी त्या दिवशी अगदी ओक्साबोक्षी रडले!!कारण मला आता हे ईथेच संपवायच होत!!!ती रात्र गेली रडन्यात..पण माझ्या समोर एक नवीन दिवस आला..आणि मी ठरवल..बस आता..move on...

आणि कामामधे स्वताला झोकुन दिल!!

पुढचे पाच दिवस आम्ही सगळे काम आणि कामच करत होतो!! शेवटचा दिवस होता....काम संपल म्हणून 

सगळे खुश होते..कोणी फिरायला जात होत,कोणी शॉपिंगला!!!मला मात्र कशातच इंटरेस्ट नव्हता!! उलट मला या अनोळखी देशातून लवकरात लवकर जायच होत!! कारण माझ अस काही राहील नव्हतच ईथे तर.....अस असतानाच डोर बेल वाजली!! मी दरवाजा उघडला तर समोर तु उभा!!! 

सगळ संपल्यावर तु कसा ईथे असा वाटल मला!!तुला दारात पाहून डोळ्यात टचकन पाणी आल पण मी लगेच माझ्या भावनांना आवर घातला!! आणि जस काही घडलच नसल्यासारख तुझ स्वागत केल!!

रूम मधे ईतकी शांतता पसरली होती की हृदयाचे ठोके पण एकु येत होते!!! मी ती शांतता तोडत बोलले "ईथे कसा तु"??? काही काम होत का?? मी सगळ फार सोप सोप बोलत होते कारण मला परत स्वताला दुखवायच नव्हत... तु थोडा नरवस वाटलास तेव्हा!! नाही तस काम नव्हत तुलाच भेटायच होत!! तु अस बोलल्यावर मला जरा भीती वाटू लागली होती..कारण याच्या आधीही तु अस बोलून माझ्या आशा वाढवल्या होत्या म्हणून आता नाही.. 

तु : बाकीचे सगळे कुठे गेलेत??

मी : बाहेर गेलेत उद्या आम्ही जातोय परत सो फिरायला गेलेत!!

तु : मग तु नाही गेलीस??

मी : नाही..मला थोड़ बर नव्हत सो..

मी फक्त तुझ्या प्रश्नांची उत्तर देत होते.. तु काही घेणार आहेस का?? तर

तुला नको होत काही!!

तु : मग उद्या परत जाणार तू!!

मी : हसत ...हो!!!

तु : कस वाटल ईथल वातावरण...

ईथले लोक..एंड आँल....

मी : छान आहेत!!! 

 माझी भीती वाढायला लागली होती ...कारण आत्ता पर्यन्त एका आशेवर तरी होते मी की कधीतरी तु होशील माझा!!!पण आज तु सांगुनच टाकलस तर की तुझ माझ्यावर प्रेम नाहीये...तर काय करेन मी??? म्हनुनच मी विषय बदलला त्यावेळी...

तुला ऑफिस नाहिये का आज?? मला एक काम आठवलय सो मला जाव लागेल!! खरतर माझ काहीच काम नव्हत पण अजुन थोडा वेळ तु समोर असतास ना माझ्या तर नसते सावरू शकले स्वताला!! 

तु: आज मी सुट्टी काढलीय!! खुप गरम होतय ना!!! 

मला कळलच नाही एवढा फुल्ल AC चालू असताना तुला गरम होतय!!! आणि तेव्हा मी तुझ्याकड़े पाहिल तर तू शर्टाची कॉलर खेचत होतास!!! आणि तो शर्ट तोच होता जो मी तुला दिलेला!!

माझ्या लक्षात आल पण मी काही बोलले नाही!!! 

आपण निघुया का?? मी विचारल 

तर तु म्हणलास की हो निघुया ना.. फक्त दोन मिनिट....आणि चक्क तु

गुढघ्यावर बसून स्वताचे कान पकडले!! 

मला कळालच नाही तुला अचानक काय झाल अस!!! 

अरे अस काय..खाली का बसलायस?? उठ लवकर उठ!!!

तर तु नाही कानावरचे हात काढून खिशातून एक बॉक्स काढला आणि त्यातून एक रिंग....मला काही समजत नव्हत...हे स्वप्न आहे की सत्य!!!

"तु माझ्याशी लग्न करशील" अस म्हणत तु परत गूढ़ग्यावर बसला पण यावेळी हातात रिंग होती!!! 

पण मी "नाही" म्हणाले... एवढा वेळ लावत का कुणी हे बोलायला ....हे माझे शब्द आणि अश्रु एकाच वेळी बाहेर पडले.. आणि मी माझा हात पुढे केला.... त्यावेळी तो क्षण माझ्या

आयुष्यातला बेस्ट क्षण होता.... तू रिंग घातल्यावर तुझ्या मिठीत खुप रडले मी!!!खुप तक्रारी केल्या तुझ्या!!! 

 आणि परत अस वगलास तर बघ!  अस वचनही घेतल... तु त्यावेळी सगळ ऐकून घेतल माझ आणि फक्त सॉरी सॉरी अस म्हणत होतास !.... नंतर खुप वेळ रडलो आपण एकमेकांच्या मिठीत....  

 अशी ही आपली लवस्टोरी वळनावर आली!!!आणि आता "मी" लग्न करतेय "तु"झ्याशी....

हे सगळ तुला सांगन्याच कारण...प्रत्तेक वेळी सगळ्या भावना बोलून नाही दाखवता येत... पण त्या सांगायच्या असतात खऱ्या...अशा वेळी हा मार्ग...आणि मी तुझ्यासाठी एवढ्या वेळा गान गायचे तेव्हा चक्क हसायचास तु.....मला माहितेय माझा आवाज तेवढा चांगला नाहीये...पण ईतका वाईट हि नाहीये...की तु कानावर हात ठेवावे..... मी किती छान गान गायल होत मी तुझ्यासाठी.... तर तु म्हणाला की प्लीज् उपकार कर जगावर आणि त्याग कर गाण्याचा!!! एवढी वाईट गाते का मी???? हसू नकोस तु!!!!! आणि म्हनुनच आता आपल लग्न झाल्यावर रोज तुला माझ गान एेकाव लागेल.... आणि कौतूकही कराव लागणार आहे कम्पलसरी!!!! नो कोम्प्रोमाईज़.. आणखी एक.. तुला हे सगळ....वाचून लक्षात आलच असेल की तु मला किती त्रास दिलायस ते... किती रडवलय तू!!!आणि आता मी त्याची वसूली करते की नाही बघच तू!!!! हसू नको तु......        आणि हो एक राहिलच सांगायच.........

"I Love U"


फक्त तुझीच,

रागिनी


Rate this content
Log in

Similar marathi story from Romance