तिच्या डायरीतून
तिच्या डायरीतून


ती त्याला सोडायला आली होती.त्याची रात्रीची 8.23 ची गाडी होती.तो तिचा हात पकडूनच डबा शोधत होता.रिजवेशन नव्हतं अचानक त्याला जान झाल्यानं सगळंच साठून कदाचित दाटून आल होत. ते पोहचे पर्यन्त जनरल डब्बे पण फुल्ल झालेले.ती त्याला समजावत होती की आधी जागा शोध, स्थीर हो.मी आहे इथंच.पण त्याच लक्ष डब्याकडे नव्हतंच.शेवटी जनरल मध्ये अगदी वरती कोपऱ्यात खोचून एक जागा झाली.त्यानं फक्त बॅग टाकली. गर्दीची परवा न करता तिचा हात पकडून परत बाहेर हवेत आला. गाडी सुटायला पाच मिनीटच उरले होते.त्याचे डोळे डबडलेले होते.तिचा हात अजूनच त्याच्या हातात घट्ट होत होता.तो तिच्या कडे दुर्लक्ष करत होता. ती परत त्याला समजावत होती.
कोई नई, हो जायेगा ठीक.तू रो क्यु रहा है पागल.!!
एरवी खमका ,हिरो सारखा आव आणणारा आज हळवा झाला होता. त्याला शब्द च फुटत नव्हते.
जर ह्या भर उन्हाळ्यात पाऊस जरी पडला तरी काय तो आधार झाला असता त्याला अशी त्याची हालत झालेली.
गाडीचा हॉर्न वाजला,तस त्याला आवंडा गिळता आला नाही,त्याने तिला
घट्ट मिठी मारली.अन न पाहताच गाडीत चढला. ती मात्र खिडकीच्या बाहेर होती.त्याला सावरण्यासाठी हसत. तिच्या हातात त्याच घड्याळ होत,कदाचित ते न्यायला तो परत येणार असेल. तो मात्र तुटल्या सारखा उभा होता ट्रेन मध्ये.ट्रेन हलली,ती ट्रेन सोबत चालत होती. त्याच नाक लाल झालं होतं,पण तरी त्याला तिच्याकडे शेवटच पाहुन बाय म्हणायच धाडस होत नव्हतं.
तिने खिडकीतून तिचा हॅंकी पास करून त्याच्या पर्यन्त पोहचवला होता.ज्याच्या वर तिच नाव कोरल होत.त्यानं तो हॅंकी घेतला. गाडी आता फास्ट होत होती, तस त्याच हृदय अजूनच धडधडत होत, त्यानं अश्रू सावरत तिच्या कडे पाहिल. ती त्याला बाय करत होती हसत....
गाडी ने आता वेग घ्यायला सुरवात केलेली
"जल्दी आ मोटू, आय एम हियर"!!!!
हे शेवटचे शब्द त्याच्या कानावर पडले,अन खिडकी बाहेर आता धावणाऱ्या बिल्डिंग दिसू लागल्या. स्टेशनवर दोन डोळे वाहत होते तर दुसरे दोन भरल्या डब्यात तेच लपवत होते.
मला मात्र प्रश्न पडलाय ????
येईल ना तो परत?????