Click Here. Romance Combo up for Grabs to Read while it Rains!
Click Here. Romance Combo up for Grabs to Read while it Rains!

निलम घाडगे

Romance


3  

निलम घाडगे

Romance


थोडसं मनातल❤️

थोडसं मनातल❤️

2 mins 1.2K 2 mins 1.2K

आज तिला घरी जायची काहीच घाई नव्हती.शून्यात पाहत खिडकीच्या कुशीत शिरली होती ती. तिला कुठेच जायच नव्हतं,ट्रेन च्या गतीने फक्त ती डोळे उघडझाप करत होती,दोन चारच थेंब ओघळले होते तरी डोळे जड झाल्याच ओझं वाटत होत तिला. कानात हेडफोन लावून जुन्या काळात गेली होती ती.केसांची बट तिला जाग करायचा प्रयत्न करत होती,पण तिला ती दूर करावी हि वाटत नव्हती.शेवटी बऱ्याच वेळाने एक आवंढा गिळला तिने,दचकन जागी झाली अन खिडकीची उशी सरकवत सरळ बसली. डोळ्या वरून अन चेहऱ्या वरून मायेन हात फिरवला स्वताच्या.एक मोठी पण निरस स्माईल केली स्वतःवर. लगेच गाणं चेंज करत अगदी dj च्या आवाजतलं कडक गाणं लावलं तिने. केसांना जरा सावरल.घोठ्भर पाणी पिल.एकदा मोबाईल कडे पाहिल. काही आठवणी बघून कायमच्या डिलीट मारल्या. वेलकम बॅक टू युअर ओल्ड लाईफ अस म्हणत दारात मध्ये येऊन उभी राहिली. बॅगला स्वताशी कवटाळल. वारा धुंद होऊन तिला स्पर्श करून जात होता,अन ती मंद अशी हसत होती. परत एक मोठा श्वास घेत स्वतावर कोवळं हसली ती. जे होत ते चांगल्यासाठीच होत अस स्वतःलाच सूनवल. कोई बात नई, होता है होता है ऐसा आफ्टरऑल यु आर द युनिक ना!! अस म्हणत एकदा आभाळाकडे भुवया उंचावल्या. स्वतःलाच कुरवाळत सजीव माणसांच्या जगात इमोशनलच वार सोडून आता प्रॅक्टिकलचा पदर पकडायचा हे स्वतःला समजावलं.  

तिच्या आयुष्यात जे काही घडलं असेल त्याचा दोष तीन कुनावरच ठेवला नाही,


एवढं सगळं होऊन हि...

अगदी खमकी बनत आपल हास्य जगाला वाटत या सगळ्यात परत एकदा तीच भाव खाऊन गेली .


Rate this content
Log in

More marathi story from निलम घाडगे

Similar marathi story from Romance