लग्नगाठ
लग्नगाठ


आज प्रसाद जरा लवकर तयार झाला।। कपाटातून एक ठेवणीतील कुर्ता काढला।।खरतर त्याने तो जेम तेम दोन वेळाच घातला होता ।। एकदा चाळीच्या कोणत्यातरी कार्यक्रमात आणि शेजारच्या रामा च्या लग्नात।। आईच्या दहावेळा ओरडून झाल्यावर प्रसाद आवरून बाहेर च्या खोलीत आला।।खोली म्हणजे त्यांच घर म्हणजे चाळीतल दहाबाय दहा च्या दोन खोल्या सगळा संसार त्यातच..एवढ्या दोन खोल्यात प्रसादच जग सामावल होत..... अंथरुणाला खेळलेली एक वयस्कर आजी तिची खाट, बाळांतपणाला आलेली त्याची बहिण, थकलेले आई वडील सगळे अगदी त्या घराला महाल समजूनच राहत होते।।। अश्यात आज घरात वेगळाच उत्साह होता.. प्रसाद ला मुलगी पाहायचा कार्यक्रम होता आज।शेजारच्या नेने काकांच्या मित्राच्या मुलीच स्थळ आल होत प्रसादला।। तस प्रसाद ला आत्ताच लग्न करायच नव्हत।। अजून कशात काही नाही त्यात अजून एक भर कशाला अस म्हणन होत त्याच।।पण वय आणि समाज दोन्ही गोष्टी अगदी गुढग्याला बाशिंग बांधुन तयार होत्या।।।
प्रसाद ..एका कंपनीत अकाऊंटस् मधे कामाला होता...अतिशय मेहनती, प्रामाणिक आणि तेवढाच प्रॅक्टिकल असा प्रसाद।।अवाजवी खर्च,दिखावा या गोष्टी त्याच्या स्वभावातच नव्हत्या।। याच कारणामुळे बऱ्याच वेळा त्याला कंजूष देखील म्हनायचे।।।पण त्याचा त्याला कधीच फरक नाही पडला।।
पण आज प्रसाद च्या वागण्यात कोणताच उत्साह नव्हता।।उलट चिडचिड होत होती ...त्यात भर म्हणजे चाळीतील जवळ जवळ सगळ्यांना माहिती झाल होत त्याला मुलगी पाहायला जाणार आहेत ते, त्यामुळे सकाळ पासून कोणी कोणीतरी येतच होत घरात आणि त्याची खेचत होते।।। त्याचा पारा चढत होता।। त्याचे वडील, नेनेकाका आणि प्रसाद असा त्यांचा ताफा निघाला।। चाळीतल्या लोकांनी आधीच ढीगभर शुभेच्छा दिल्या होत्या,त्याला आता आपण कोणत्यातरी युद्धाला जातोय असा फिल येत होता।।जो तो काम फत्ते करूनच ये अश्या आवाक्यात बोलत होता।।
ते सगळे पोहचले एकदाचे मुलीच्या घरी।।त्यांची स्थिती पण प्रसाद ला त्याच्याच सारखी वाटली।।तशीच चाळ,तसेच लोग।घरात जागोजागी केलेली झाकापाक अगदी सगळ।।।।
सुरवातीला इकडच्या तिकडच्या अश्या पारंपारिक गप्पा झाल्या।। मुलाची कसून चौकशी सुरु झाली, प्रसाद ला कळत नव्हत कि तो मुलगी पाहायला आलाय कि इनकमटॅक्स भरायला, सगळे अगदी नजर रोखून त्याच्या हालचालीच निरीक्षण करत होते।।।। प्रसाद ला श्वास घेऊ कि नको असं वाटायला लागल होत।।। तेवढ्यात मुलीची एन्ट्री झाली अगदी साग्रसंगीत पद्धतीने।।हातात कांदेपोहे चा ट्रे घेऊन।।। तिने सगळ्यांना पोहे दिले तेव्हा त्यांची नजरानजर झाली ।।।।
इतका वेळ त्याला श्वास घेन मुश्कील वाटत होत त्यावर... वाऱ्याची मंद अशी फुंकर आल्या सारखी वाटली।।।
प्रसाद ला हायस वाटल।।।
दोघांची नजरा नजर झाली,प्रसाद च्या मनात कुठेतरी तिने जागा निर्माण केली होती, दोघांना बोलण्यासाठी म्हणून आत पाठवल।।। एरवी अगदी ताठ कणा घेऊन चालणारा प्रसाद आता मात्र थंड पडला होता।। दोघेही रूम मधे होते पण सुरुवात कुठून आणि कोणी करायची हे ठरत नव्हती।।शेवटी प्रसाद च धीर करत बोलला, नाव काय तुमचं??
तिने आपल्या नाजूक आवाजात उत्तर दिल... "आनंदी"!!
काय आवडत तुम्हाला??
वाचन करायला!!
आता रूम मधे परत शांतता पसरली।।
पुढे काय विचारायच??हा प्रश्न प्रसाद ला पडला होता।।
त्यांच्या डोक्यावर असलेला पंखा खडकड आवाज करत होता।।तेवढीच त्यांना साथ।।
तुम्हाला काही विचरायचय का??
तिने मानेनेच नकार दिला।।
तुम्हाला काहीच नाही विचारायच?? प्रसाद तिच्याकडे प्रश्नार्थक नजरेने पाहत होता।।
नाही।। तिने शांततेत उत्तर दिल।।
मी तुम्हाला पसंद आहे का??
तिने मानेनेच होकार दिला।।
त्याला काय विचाराव आता हा प्रश्न परत पडला।। दोघेही बाहेर आले
आम्ही कळवतो अश्या वचनावर ते निघून गेले।।
प्रसादला सगळे एका वेगळ्या नजरेने पाहू लागले होते ।। त्याचा होकार कि नकार या वर होत सगळ।।
पण नेहमी प्रॅक्टिकल वागणारा प्रसाद मेंदु आणि मन याच्या मधे अडकला होता।। त्याला आत्ताच लग्न करायच नव्हत, आणि आनंदी हि आवडली होती।। अश्या वेळी काय कराव हे त्याला सुचत नव्हत।। त्याने आत्ता नको म्हणून नकार दिला, आणि तिच दुसरीकडे लग्न झाल तर?? प्रसाद ची मनस्थिती खचत चालली होती।।त्याला ऐकलाच निवडायच होत आणि ... त्याने नकार कळवला।।।
त्याने नकार कळवला, पण मनातून त्याला याच खूप वाईट वाटत होत।। मग सुरु झाल परत रोजचच रुटीन।।।
घरात मात्र त्याने सांगून टाकलेल, जो पर्यंत तो बोलत नाही,तो पर्यंत लग्नाचा विषय हि काढणार नाही कोणी म्हणून।।। दोन तिन महिने झाले असतील याला।।
आज प्रसाद ला ऑफिस ला जायला वेळ झाला होता,आजीची तब्बेत ठीक नव्हती म्हणून डॉक्टरांना घरी बोलावल होत, ते जाईपर्यंत खूपच वेळ झाला होता।।
प्रसाद घाईतच घरातून बाहेर पडला, लोकल पकडली।। दादर ला उतरला आणि नेहमीच्या बस मध्ये चढला।। बस ला गर्दी तशी कमीच होती।।। कोणी ऐकट बसलं होत,तर कोणी जोडीत।।
प्रसाद च लक्ष एका सीट वर गेलं, तिथे आनंदी बसली होती, आज ही ती तितकीच गोड, आणि निरागस दिसत होती।। तिच्या केसांची बट तिच्या गालावर खेळत होती।।
एकदा त्याला वाटलं हि कि बोलाव तिच्याशी... पण काय म्हणेल ती?? मी स्वतः लग्न मोडून आता स्वताच सलगी करतोय।।
"तिकीट"....तिकीट च्या आवाजाने तो भानावर आला।।।
स्वतःचा तोल सांभाळत त्याने खिशात हात घातला, तर पाकीट नव्हतं त्याच।। दुसरा खिसा हि शोधला पण पाकीट नव्हतंच।।। त्याला जणू धक्का च बसत होता,कोणी खिसा कापला असेल का??कि पडलं असेल ?? दोन मिनिट तो स्वताशीच बोलत होता।। कंडक्टर च्या आवाजाने परत भानावर वर आला, आत्तापर्यंत बस मधील बरीच लोक त्याच्याकडे पाहू लागली होती।। त्यात ती ही आलीच।। आता तर त्याला घामच फुटू लागला।। तिकीट घेणं हि महत्वाचं होत पण पैसे???
स्वतावरच त्याला राग येत होता, तेवढ्यात मागून आवाज आला।।
" हे घ्या!!"
त्याने पाहिलं तर आनंदी होती, त्याला अवघडल्या सारख झाल।।
काय कराव? हे सुचत नव्हत।।। तिने त्याच्या हातात पैसे ठेवले, आणि उतरून गेली।। तो तसाच उभा होता।। नक्की काय घडल याचा अंदाज बांधत।।
तो सीट वर बसला, तिकीट हि काढली।।
साध तो तिला थँक्यू सुद्धा म्हणण्याचा चान्स नाही दिला तिने।।। पण ऑफिसमध्ये आज प्रसाद च वागण काही वेगळ।होत।।
एरवी कामात बुडालेल्या प्रसादच लक्ष आज कशातच लागत नव्हत।।
त्यात घरून फोन आलेला,कि तो पाकीट घरीच विसरला आहे,त्यामुळे त्याचा जीव भांड्यात पडला होता।।।
पण राहून राहून त्याला आनंदी आठवत होती।।।
नेहमी लवकर जाणारा प्रसाद दुसऱ्या दिवशी ही घरून उशिरा निघाला।।।
सेम लोकल पकडली, आणि तीच बस हि।। चढल्या चढल्या त्याची नजर तिला शोधु लागली।।
तर ती आज ही त्याच जागेवर बसली होती।।।
त्याने तिकीट काढली।। अन तिच्या शेजारी बसला।। तिच लक्ष नव्हतं।। आणि त्याला तर बोलायच होत,।।।
धिर करत तो बोलला......
हाय।।
तिने पाहिल त्याला आणि गोड स्माईल दिली।।।
काल तुम्ही ..ते ...मी पाकीट विसरलो होतो, त्यामुळे ।।।। तो गोंधळला होता।।
त्याचा गोंधळ तिने ओळखला।।।
त्याला अडवत ती बोलली, होत अस कधी कधी!!!
त्याला काय बोलाव समजत नव्हत पुढे।।
त्याने पैसे देऊ केले,तिनेही काही न बोलता घेतले।।।
दोघेही शांत बसले होते, ती खडकी तुन बाहेर डोकावत होती,आणि वाराच्या ओघात तेचे केस त्याला स्पर्श करून जात होते।। काल प्रमाणेच तिचा स्टॉप येताच ती उठली।। त्याची ईच्छा नव्हती, तरीही त्याला बाय म्हणाव लागल।।।
ती गेल्यावर तो उगाचच खिडकीला डोक लावून स्माईल करत होता।।
खरतर प्रसाद ला खूप बोलायच होत,पण कस ते कळत नव्हत।।
पण रोज उशिरा ऑफिस ला पोहचून चालणार हि नव्हत,आणि त्याला तिला हि भेटायचं होत,आता यातला सुवर्णमध्य म्हणजे "लग्न"।। पण.... एकदा नकार दिल्यावर ते तयार होतील का?? आणि घरी तरी कसं सांगायच??अचानक निर्णय कसा बदलला विचारल तर घरच्यांनी?? आणि त्या तयार होतील का? आणि त्यांच दुसरीकडे कुठे ठरल असेल तर?? असे एक ना अनेक प्रश्न प्रसाद ला सतावत होते!! नेहमी प्रत्येक बाबतीत अगदी क्लियर असलेला तो,आता मात्र पूर्णपणे गोंधळलेला!!!!
तरीही त्याने धीर करून विचारायच ठरवल, सगळ्यात आधी आनंदी च्या मनात काय आहे ते जाणुन घेण महत्वाच होत।।। लगेच पुढच्या दिवशी तो मानसिक तयारीसह गेला हि।। सगळ आधी ठरवून, अगदी ताठ कण्याने गेला,तिच्या सीटवर हि बसला।। ती नेहमी प्रमाणे बाहेर बघत होती,त्याला विचारायच होत पण शब्द फुटत नव्हते।।
त्याने दिर्घ श्वास घेतला आणि बोलता झाला।।
हाय! त्याच्या आवाजाने तिने त्याच्याकडे पाहिलं अन त्याचा सगळा कॉन्फिडन्स गळून पडला।। तिने परत एक गोड स्माईल दिली,पण काही बोलली नाही।।
तुम्ही इकडे जॉब करता का?? त्याने धीर करत विचारल।।
हो।। फक्त एवढंच उत्तर आलं।।आता??
ओह्ह,घरचे कसे आहेत?? तो
छान आहेत!!
आणि...तो पॉज घेत बोलला, मग काय चाललय सध्या!!
काही विशेष नाही ,रोजचंच।। ती जेवढ्यास तेवढ बोलत होती।।
आता मात्र त्याला राहवत नव्हत, त्यान विचारल... तुम्ही रागावला असाल ना,मी लग्न मोडल।।
आनंदी त्याच्याकडे पाहत बोलली.. नाही हो,राग कसला।।तो तुमचा निर्णय होता आणि तो काही विचार करूनच घेतला असेल ना।।
प्रसाद क्षणभर..स्तब्ध झाला,इतका निर्मळ विचार करणारी मानस असतात??
हो पण तरीही..मला थोडं बोलायच होत,जर तुम्हाला चालणार असेल तर, तो।।
हो बोलाना!!
तुम्ही नंतर कुठे म्हणजे... लग्नाच वैगेरे।।
नाही अजुन !! तिच्या या उत्तराने त्याचा आनंद गगनात मावेना।।
पहिली स्टेप तर झाली.... आता पुढे तो मनात घोकत होता।।
म्हणजे ,खरतर मी विचार करून च निर्णय घेतला होता,त्यामागे जी सध्या परिस्थिती आहे त्याचा विचार करूनच मी नाही बोललो होतो पण आता मला अस वाटतंय कि मी माझा निर्णय बदलावा।।
म्हणजे!!ती प्रश्नार्थक नजरेने पाहत बोलली।।
म्हणजे..तुम्ही माझ्याशी लग्न करायला तयार आहात का??
दोन क्षण ती ही गोंधळली।।काय बोलावे तिला समजत नव्हते।।
तिने काही वेळ घेतला,आणि बोलली...
मला कळाल कि तुम्ही काय बोलला, पण मी हि कोणतं खेळण नाहीये ना!!जेव्हा मनात आलं नुसतं पाहिलं परत मनात आल कि खरेदी केल।। माझ्या हि भावना आहेत ।। तुमचे प्रॉब्लेम्स होते तेव्हा मी तुम्हाला अडचण वाटत होते,आणि आता उपाय !! हे चुकीच नाही का??मी तुम्हाला वाईट नाही बोलत आहे,पण जेव्हा तुम्ही एखाद्या मुलीला पाहायला जाता,तेव्हा आधी तिच्याकडे माणूस म्हणून का नाही पाहत!!
आत्ता पर्यंत साधी सोजवळ असणारी आनंदी .. आता मात्र चांगलीच तापली होती।।। आणि हे प्रसाद ला अजिबात अपेक्षित नव्हत।।
प्रसाद ने सरळ हार मानली, तो समजून गेला की आनंदी दुखावलीय।।
मला माहितेय मी चुकलोय,आणि मी माफी हि मागायला तयार आहे,आयुष्याचा परिपूर्ण जोडीदार निवडताना ,मी आयुष्यभर साथ देईल असा जोडीदार निवडायला विसरलो।। पण मला तुमची साथ हवीय आयुष्यभर मला माहितेय तुम्ही दुखावलाय पण माझा कोणताही आग्रह नाहीये, तुम्हाला हवा तेवढा वेळ घ्या,मी थांबायला तयार आहे।।
एव्हाना..आनंदी च्या डोळ्यातून गंगाजमुना वाहू लागल्या होत्या।।याला कळत नव्हत नक्की आता काय करावं,
अहो ...त्याने त्याचा रुमाल दिला तिला...
खरच सॉरी पण तुम्ही अश्या रडु नका।। लोक बघायला लागलेत इकडे।
तशी आनंदी शांत झाली।। काही वेळ कुणीच काही बोलल नाही,प्रसाद पुरता हिरमुसला होता।। थोडा वेळ गेल्यावर आनंदी च बोलली।। मग पुढे!!
तर हा ढिम्म बोलला ..काही नाही,अजून दोन स्टॉप नंतर उतरेन!!
काय!! त्याच्या केविलवाण्या चेहऱ्या कडे बघून आनंदी ला हसू आवरत नव्हत।।
ती उठली, आणि जाऊ लागली।।
प्रसाद ला सगळ संपल्यासारख वाटत होत...तोच आनंदी बोलली.. रुमाल नकोय?? त्याने हात पुढे केला,
तर ती बोलली उद्या घरी याल तेव्हा देईन,अन ती निघून गेली।।
काही वेळ हा तसाच बसून होता, नंतर त्याला उमगल कि आनंदी ने घरी बोलवलय।। अश्या प्रकारे एकदाची त्यांच्या लग्नाची गाठ पक्की झाली।।
आनंदी लग्न करून प्रसाद च्या घरी आली।। त्याच घर अगदी तिच्या सारखंच होत,फक्त मानस वेगळी ।।
त्यांच्या चाळीतील घरात एकांत तो कसला...सतत माणसांची रेलचेल।।
खरतर लग्नानंतर प्रसाद ला तिला बाहेर कुठे तरी फिरायला न्यायच होत,पण सध्याच्या स्थितीत ते शक्य नव्हत, अन आनंदी ने हि कधी हट्ट नाही केला।। पण न चुकता रोज एक गुलाब मात्र आनंदी ला भेटत असत।। त्या दोघांचा संसार सुरु झाला,आनंदी अगदी सगळ जमेल तस करायची,घरासाठी काही दिवस ऑफिस मधुन सुट्टी घेतली होती।। ती संपली आणि आनंदी कामावर रुजू झाली।।
इतर सुनासारखं अगदी पहाटे उठून सगळ आवरून आनंदी कामावर जात असे।।तिची धावपळ त्याला दिसत होती,पण काही पर्याय नव्हता।। तिने हि कधी त्याची तक्रार केली नाही।।
एकदा मात्र प्रसाद ला यायला खूप उशीर झाला होता, आनंदी जेवायची थांबली होती,त्याचा फोन हि लागत नव्हता,आनंदी कासावीस झाली होती।। सगळे झोपी गेले तरीही ती दाराशी उभी होती.. एकदाचा प्रसाद घरी आला,पण तो हि नशेत!! लग्नानंतर पहिल्यांदा प्रसाद चा असा अवतार तिच्या समोर होता।। काही सुचत नव्हत।।त्याला धड उभ हि राहता येत नव्हत, धडपडत कसा तरी दाराशी आला तो।। तिने त्याला सावरल आणि त्यांच्या रूम म्हणजे किचन मधे नेलं।। आणि समोर बसवल, घरच्यांना त्रास नको म्हणून तिने कुणाला उठवल नाही।। त्याला चहा करून दिला, थोडासा सावध झाल्यावर त्याला जेवू हि घातल।। आणि झोपवल, ती मात्र त्या दिवशी उपाशी झोपली।। दुसऱ्या दिवशी प्रसाद उशीरा उठला डोक ठणकत होत,चहा ऐवजी सकाळी सकाळी लिंबु सरबत दिल तीन।। त्याने काही न बोलता पिल ।। तिच्या डोळ्यातला राग पाहून त्याला समजल आपण माती खाल्लीय ती।।
तिने त्या दिवशी सुट्टी टाकली होती पण घरी नव्हत सांगितल, त्याला हि आवरायला सांगितल, दोघेही एकत्र निघाले ऑफिस साठी।। अर्ध्यावर गेल्यावर तिने त्याला ऑफिस मधे सुट्टी टाकायला सांगितली।। का?कशासाठी?
विचारायची सोय नव्हती ?? त्याने ऑफिस मधे कळवल।।
दोघेही चौपाटी वर गेले।। पण दोघात संवाद नव्हता।। तिने दोघांसाठी एकच पुडी खारे शेंगदाणे घेतले आणि दोघंही किनाऱ्यावर बसले।।
बराच वेळ गेल्यावर प्रसाद बोलला...
आय एम सॉरी।।
नक्की कशासाठी?? तिने खोचक प्रश्न विचारला।।
रात्री साठी!!
हि कितवी वेळ!!
कितवी म्हणजे!!पहिल्यांदाच!! तुझी शप्पथ।।
कारण समजेल?? आनंदी अगदी हळुवार त्याच्या मनाचा शोध घेत होती,खरतर ती कडाकडा भांडू हि शकली असती पण तिला तो पर्याय नव्हता वाटत।।
सांगाल का कारण??
तेव्हा कुठे..प्रसाद मनातलं बोलता झाला...
काल आमच्या ऑफिस मधे प्रमोशन दिल,सगळ्यांना अगदी लास्ट पर्यंत वाटत होत...ते मलाच मिळणार।।पण तस झालच नाही,प्रमोशन मिळाल कुणाला मॅनेजरच्या मेहुण्याला जो फक्त एकच वर्ष झालं लागलाय,आणि माझा ज्युनियर आहे।। प्रसाद स्वतावरच हसला,कस नशीब असत ना..एवढी मेहनत करून,वर्षभर त्रास घेऊन शेवटी हातात काय मिळत हार।।।
ताईची डिलिव्हरी आहे,आज्जीच दुखणं आहे।।सगळ्या जबाबदाऱ्या अश्या कश्या निभावू मी सांग ना।। त्यात बाबा हि थकलेत,मला नाही आवडत आता त्यांनी केलेल काम, मी त्यांचा धड धाकट मुलगा असूनही त्यांना नाही ठेवू शकत सुखात तर काय फायदा माझा,आणि तुझ्या तर कोणत्याच ईच्छा मी पूर्ण करू शकत नाहीये।।तुला हि असच वाटत असेल ना कसल्या माणसाची माझी गाठ बांधलीय।।एक मुलगा म्हणून,एक भाऊ म्हणून आणि एक नवरा म्हणून सगळ्या बाजुंनी मी फेल झालोय।।तुम्ही सगळे जरी बोलून दाखवत नसाल तरी मला कळत कि मी तुम्हाला सुखात नाही ठेवू शकत आहे।। मी हरलोय आनंदी मी पूर्णपणे हरलोय।।
आनंदी पहिल्यांदा प्रसाद अस तुटताना बघत होती।। तिने त्याचा हात हातात घेतला।। आणि त्याचे डोळे पुसले,
कोण म्हणत तुम्ही हरलाय??
फक्त आताची वेळ आपली नाहीये बस।।
आई बाबा ,ताई,आज्जी आणि मी आम्हा सगळ्यांना तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे आणि त्यापेक्षा तुमच्यावर आमचा जीव आहे... प्रमोशन आहे फक्त ते,आयुष्याची रेस नाहीये।।आज नाही तर उद्या नाहीतर परत कधी तरी मिळेल,पण तुम्हाला अस हरल्या सारख बघणं आम्हाला नाही शक्य।। आणि तुम्ही कशाला काळजी करता,मी आहे ना तुमच्या सोबत।।सगळ नीट होईल आपण सगळे सोबत असु तर काही अशक्य नाहीये।। मला काही नकोय तुम्ही आणलेलं ते एक गुलाब पण माझ्यासाठी सोन्यासारख आहे।। आपण दोघ कमवू हवे तेव्हढे कष्ट घेऊ ,आणि आपलं घर सावरू।।पण मला वचन द्या इथून पुढे तुम्ही कधीही दारूला स्पर्श करणार नाही,आणि असे विचारही मनात आणणार नाही।। त्याने आनंदी ला वचन दिल, दोघेजण किनाऱ्यावर बसले होते आणि सूर्य देखील दोघांच बोलण ऐकून हसत मुखाने सुर्यास्ताला निघाला होता।।
आनंदीने प्रसादाच्या खांद्यावर डोकं टेकवल होत.. दोघेही त्या सुर्यास्ताकडे पाहून नव्या सूर्योदयाची स्वप्ने बघत होती।। इतकी समजुतदार आणि वेळप्रसंगी खमकी बायको मिळाल्याचा आनंद प्रसाद च्या चेहऱ्यावर होता, तर आपल्या काळजी करणारा नवरा मिळाल्याच समाधान आनंदी च्या चेहऱ्यावर होत।। दोघांची लग्नगाठ अजूनच दृढ झालेली।।।