The Stamp Paper Scam, Real Story by Jayant Tinaikar, on Telgi's takedown & unveiling the scam of ₹30,000 Cr. READ NOW
The Stamp Paper Scam, Real Story by Jayant Tinaikar, on Telgi's takedown & unveiling the scam of ₹30,000 Cr. READ NOW

Deepali Rao

Inspirational Others

2.5  

Deepali Rao

Inspirational Others

थ्रीडी...तिसरी बाजू.

थ्रीडी...तिसरी बाजू.

6 mins
650


"मन्या किती खराब रिझल्ट आहे हा.

अरे किती कमी मार्क पडले आहेत.

कसं होणार तुझं..काय करशील तरी काय भविष्यात मोठे होऊन.

आता या रिझल्टला पाहून शाळेतून ही सांगावा आलाय..वर्ष रिपीट करा म्हणून...

काय करायचं आम्ही. तुला काही देण्यात कमी पडतोय का कुठे?

सगळे लाड, हट्ट पुरवतो. तू म्हणशील ते देतो आणून.

अरे! मी इथे मर मर मरतो दिवस-रात्र. घरात तुझी आई सतत राबत असते आणि तू हे असे दिवे लावतोस परीक्षेत.

अरे लोक शेण घालतील तोंडात आमच्या नापास झालास तर.

किती बोलतात सगळे तुझ्याबद्दल...

नको वाटतं ते ऐकताना. "

. ....मन्या खाली मान घालून कोपर् यात उभं राहून बाबांचं सारं ऐकून घेत होता. त्याला प्रचंड अपराधीपण आलं होतं. नको त्या मित्रांची संगत नडली होती. पण आता कस सावरायच हे? त्याला उमगतच नव्हतं.

आई बाबा समजावतात. तेव्हा पटतं सारं पण मग मित्रांबरोबर गेलं की मन कसं भरकटतं कुणास ठावूक. त्यांचच बरोबर वाटू लागतं.

अभ्यासापेक्षा मजा मस्ती करण्यात जास्त रमतो मी. मित्रांसोबत धमाल येते. चिडवाचिडवी.. भांडाभांडी.. सायकलवर टांग टाकून क्लास बंक करून फिरायचं... घरी कळूही न देता... बेमालूम.

कसलं थ्रिल आहे यात.

आई बाबांना नाहीच समजणार कधी.

मोठा होतोय मी ही आता.....


"अरे बोल की. पेपर मिळाले का विचारलं तर काही ना काही कारण सांगून लपवून ठेवायचास आमच्यापासून.

का आता घुम्या सारखा बसला आहेस." बाबा ओरडत होते. जाम चिडले होते आज.


....काय दाखवणार होतो? हे असले मार्क्स? मग तर खैरच नव्हती. आरडाओरड, मारझोड, रडारडी.. परत परत तेच सगळं

वीट आलाय.

कधी मोठा होणारे मी कोण जाणे. हे दोघे तर सतत सतत काही ना काही इंस्ट्रक्शन्स च देत राहतात.

जरा काही आपण बोलायला जावं तर....तुला काही कळत नाही अजून लहान आहेस. सांगू तेवढं कर.... हेच

त्यापेक्षा मित्र बरे.. म्हणतात.. मोठा झालायस यार आता. काही निर्णय तुझे तू घेउ शकतोस. लहान बाळासारखा काय प्रत्येक गोष्ट घरी विचारून करतो..

मग क्लास बुडवून फिरतो त्यांच्याबरोबर.

चूक वागतोय का बरोबर? उमगतच नाहीये.

आई बाबांचं ही खरं मनाला पटतय. माझ्या करियरसाठी तर झटताहेत दोघे जीव तोडून.....


"अरे सुंभा...

आता दोनच पर्याय...एकतर हे वर्ष रिपीट करायचं नाही तर दुसर्‍या शाळेत अॅडमिशन..

तूच सांग. मी तर थकलो तुझ्यापुढे बोलून. बरोबरच बोलतात सगळे... वाया गेलाय तुमचा मन्या"

मन्याची अवस्था बघून आई पुढे आली, त्याला जवळ घेत म्हणाली,

"हे पहा बाळा, काही प्रॉब्लेम असेल तर आत्ताच सांग वेळ जाण्याआधी.

कुठे चुकीच्या मार्गाने तर जात नाहीयेस ना? नंतर निस्तरण कठीण होण्यापूर्वी आधीच कल्पना दे"


"नाही ग आई!"

काहीही काय बोलतेस. तुला नेहमीच माझा संशय वाटतो.

सारखा चेक ठेवत असतेस ..

कुठे जातोय? कुणाला भेटतोय? कुणाशी बोलतोय?...

मोठाय ग मी आता. कळत कसं नाही तुला? "


"आईला उलट उत्तर करतोस? त्या शेजारच्या गौतमला बघ. तुझ्याच वयाचा ना तो? किती अभ्यास करतो.

चांगले मार्क पाडतो, व्यवस्थित वागतो. तुझ्यासारखा थिल्लरपणा नाही. सगळेच चांगला म्हणतात त्याला आणि आमच्या नशिबी मात्र हे ध्यान."बाबा त्याला मारायला धावले.


आईच्या मनाची तगमग वाढली. या गोष्टीला असं वळण नको मिळायला.

तिने विचार केला...

वयात आलेलं प्रकरण नीटपणेच हाताळायला हवं होतं....


"बर सोडा आता या सगळ्या गोष्टी. मी जेवणाची पानं घेते. जेवून घेऊ. जरा डोकं शांत झाल्यावर काहीतरी तोडगा निघेल. "

तिनं कडक शब्दात सांगितलं तसं दोघेही स्वयंपाक घराकडे चालू लागले.


जेवताना देखील प्रत्येकाच्या मनात वेगवेगळे विचार..

मन्या मनात खात होता..

सारखी कंपॅरिझन... प्रत्येकाशी.. हा असा, तो तसा.. माझ्यात काही चांगलं नाहीच आहे का?

जेवणं उरकली. बाबा तणतणतच झोपायच्या खोलीत निघून गेले.

आई हळूच मन्याच्या खोलीत डोकावली.


"मन्या! तुझ्याशी बोलायचं आहे. अर्थात तू हो म्हणालास तरच. "


"एकच अट आहे. उपदेश ऐकायच्या मनस्थितीत मी नाही. " मन्या म्हणाला.


"ठीक आहे! पण थोडं ऐकून तर घेशील? थोडक्यात सांगते "


"बोल! " भिंतीकडे तोंड वळवून तो उत्तरला.


" मनू! आताशी तर टर्मिनल झाली आहे. या समस्येवर दोन बाजू दिल्या आहेत आहेत आपल्याला एकतर वर्ष रिपीट करणे किंवा दुसरी शाळा बघणे...

तशी अजून एक तिसरी बाजू ही आहे बरं. तुमच्या भाषेत थ्री डायमेंशनल प्रॉब्लेम.

खूप छान अभ्यास करून पुढच्या दोन्ही परिक्षेत टॉप स्कोअर करायचं. कदाचित मघाचचे दोन्ही पर्याय वापरायची गरजच उरणार नाही.

बघ तुला पटतंय का?

मला तर कॉन्फिडन्स आहे.. तू हे करू शकशीलच" आई विश्वासाने सांगत होती.


"आई तुलाsss? तुला माझ्यावर कॉन्फिडन्स आहे?

खरच? का असच बोलतीयेस!"


"तु तुझं ठरव. मला तर नक्कीच वाटतय तुला हे काही जड नाही. फक्त काही काळासाठी कॉन्सन्ट्रेशनची गरज आहे.

आपल्या आयुष्यातील इतका थोडासा वेळ तर आपण स्वत:साठी नक्कीच घेऊ शकतो.

तुला एक गोष्ट सांगते..

मन्या सरसावून लक्ष देऊन ऐकू लागला.


दोन मित्र होते. एकदम जिग्री . अगदी तुमच्या सारखे.

त्यातल्या एकाला कमी ऐकू यायचं. अगदी कानाजवळ जाऊन बोललं तरच समजायचं. एकदा ते नदीकाठी फिरायला जातात. दोघांना पोहायची इच्छा होते. मग काय

टाकतात उडी.

बाजूच्या शेतातून लोक धावत येतात.

"अरे मुलांनो बाहेर या! बाहेर या!"

जोर जोराने ते ओरडायला लागतात.

नदीत मोठा भोवरा आहे. अडकलात तर कठीण. कोणीही वाचवू शकणार नाही. ज्याला नीट ऐकू येत होतं त्यानं पटकन पाण्यातून बाहेर येण्यासाठी धाव घेतली.

आता ते काठावरून दुसर् याला सावध करत होते. बाकीच्या लोकांना कुठे माहित की त्याला कमी ऐकू येत होतं. मित्र त्याचा जीव वाचला म्हणून देवाचे आभार मानत होता आणि इकडे दुसरा बहिरेपणामुळे पाण्यात आत शिरला.

आता काही तो वाचत नाही असे म्हणून लोक हळूहळू लागले. काठावरचा मित्र रडत घराकडे पळाला.

लोकांनी पाण्यातल्या मुलाच्या दिशेने एक लांब काठी फेकली तसा त्याला अंदाज आला की काहीतरी गडबड आहे. लक्षात आलं की काठावरून लोक हातवारे करतायत, त्याला काही सांगू पाहतायत. पण तोपर्यंत तो भोवर् याच्या बराच जवळ पोहोचला होता.


तो भोवर्याच्या जवळ पोहोचलेला पाहून लोकं बोलायला लागली.


"गेला आता हा."....

"आता हाती लागत नाही." .......

"हा वाचणं शक्यच नाही."......

"मरणारच शंभर टक्के.".......


सगळे बोलत होते. सार् या निगेटिव्ह कमेंट्स....


पाण्यातला मुलगा मात्र जीव वाचवण्यासाठी नेटाने लढत होता. काठी पकडून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत होता. बराच वेळ त्याची झटापट चालू होती. काठावरच्या लोकांनी तर आशाच सोडली होती.

आणि चमत्कार झाला. अथक प्रयत्नानंतर त्या मुलाला पाण्यातील भोवर् यातून स्वत:ला वाचवायला यश मिळाले.

तो कष्टाने, नेटाने पाण्याशी दोन हात करून बाहेर आला.

काठावर येताच लोकांनी त्याच्या भोवती घोळका केला.

इतक्यात घरी पळालेल्या मित्रासोबत याचे आईवडिल धावत तिथे पोहोचले.

मुलाला सुखरूप पाहून जीवात जीव आला त्यांच्या.

आईने पटकन पोटाशी धरून त्याला कुरवाळले. रडतच होती ती.

लोक सगळे अचंबित होते की हा वाचलाच कसा?

मग त्याच्या बाबांनी खुलासा केला..

त्याला ऐकू कमी येतं. तुम्ही त्याला वाचवण्यासाठी ओरडलात ते त्याला कळलं नाही तसच तुमच्या निगेटिव्ह कमेंट्स ही त्याच्या पर्यंत पोहोचल्या नाहीत.

भोवर् यात अडकताना त्याने जर ते बोलणं ऐकलं असतं तर प्रयत्न करण्याआधीच तो खचला असता. नामोहरम झाला असता आणि मग स्वत:ला वाचवण्याची ताकद त्याच्यात उरलीच नसती.

कारण नकारात्मक विचार माणसाला दुसरा कोणताही पर्याय जोखण्याची बुद्धी वापरण्यापासून वंचित ठेवतात. मनुष्य त्या नकारात्मकतेच्या गर्तेत फिरत राहतो अन् सरते शेवटी सरेंडर करतो स्वत:ला.....

तुम्ही त्याच्या आयुष्याची आशा सोडून दिलीत पण तो मात्र टाकलेल्या काठीचा आधार घेऊन जीव वाचवण्यासाठी धडपड करत राहिला आणि म्हणतात ना.. प्रयत्नांती परमेश्वर.

वाचवलं त्यानं स्वत:ला. आज त्याचं कमी ऐकू येणं त्याच्यासाठी वरदान ठरलं..... "

............

"या गोष्टी प्रमाणेच मन्या तू निगेटिव्ह विचार मनातून पार हद्दपार कर. दुसर्यांच्या नकारात्मक बोलण्याचा स्वत:वर परिणाम करून न घेता आलेल्या अपयशासाठी काही उपाय करता येईल का ते बघ.... "


मन्या ची उत्सुकता वाढली होती...


"यश मिळवणं अजिबात अवघड नाही बाळा.

खरतरं प्रत्येक जण कुठल्या ना कुठल्या बाबतीत अपूर्णच असतो...

आणि म्हणूनच ज्यानेत्याने आपपले पॉझिटिव्ह पॉईंट्स ओळखून त्यावर जास्त कष्ट घ्यायचे. मेहेनत करायची.

सिद्ध करायचं स्वत:ला.

जेव्हा निराशा जाणवेल.. हरल्या सारखं वाटेल तेव्हा सकारात्मक विचार करायचा. आयुष्यातील चांगले उत्साही क्षण.. बक्षीस, शाबासकी, कौतुक मिळाल्याच्या घटना आठवायच्या आणि सर्वात महत्वाचे.. लोकांच्या निगेटिव्ह कमेंट्स बाबतीत तात्पुरत बहिरं असल्यासारखं वागायचं, दुर्लक्ष करायचं.

मग बघ सगळच जग किती अफलातून वाटेल.

Nothing is so hard that no one can break. Just time differs case to case. There is no problem lies in world that doesn't have any solution. So cheer up now & get ready for new challenges."

आई मन्याला समजेल अशा भाषेत सांगायचा प्रयत्न करत होती.


"राहता राहीले मित्र...

ते कुठे जाणारेत?

असतीलच की बरोबर.

स्वत:च्या आयुष्यातील थोडा वेळ स्वतःसाठी...भविष्य घडवण्यासाठी काढला अन् ते न पटून त्यांनी मैत्री तोडली तर अशी मैत्री काय कामाची?

लगेच असं बॉयकॉट वगैरे करणार असतील तर.....

मग अशा मित्रांना आपणच बॉयकॉट करून टाकायचं .. आयुष्यातून. Cut thy name from your friend list.

नाही का? बघ पटतय का? "


...पटलं! एकदम पटलं. भारीच आहे हे.

मन्याचे डोळे लकाकले. गोष्टीची तिसरी अनभिज्ञ, अव्यक्त बाजू ही असू शकते...

त्यानं पक्कं केलं मनात. प्रॉsssमिस...

ही तिसरी बाजू जास्त आशादायक होती......

अजून एक संधी देणारी.....

कदाचित आयुष्यात पुढे कधी कुठला प्रॉब्लेम आलाच तर थ्री डी च काय पार सिक्स डी पर्यंत पर्याय अव्हेलेबल होतील. फक्त प्रॉब्लेम वर मात करायची तयारी ठेवायला हवी... ती ही चांगल्या लोकांच्या सोबतीने, सकारात्मक दृष्टीकोन बाळगून.

हुरर्र ss रेsss

आईच्या विश्वासामुळे आणि मोटिवेशन मुळे मन्याचाही आत्मविश्वास वाढला.

आणि याच विश्वासाच्या शक्तीच्या बळावर तो जगाशी लढायला सिद्ध झाला.

आता सक्सेस फार अवघड वाटत नव्हतं.

Nothing is impossible...

अगर मनमें है विश्वास।

जरुर होंगे कामियाब।

स्त्री मग ती कोणीही असो आई, बहीण, बायको अथवा मुलगी अगदी कोणीही बिकट परिस्थितीत ती रणरागिणी होते तशीच आयुष्याचा सल्लागारही..


Rate this content
Log in

More marathi story from Deepali Rao

Similar marathi story from Inspirational