थोडा बोध घ्यावा
थोडा बोध घ्यावा
प्रत्येकाने आता
थोडा बोध घ्यावा,
गोड लागलं म्हणून
मुळासकट का खावा.
आमदार खासदार
सारेच आहेत भ्रष्ट,
टाळूवरच्या लोण्याल्या
लागत नाही कष्ट.
इथे सारेच आहेत
बोलणारे पोपट,
समोरा समोर मात्र
बोलतात चावट.
सार्वजनिक मालमत्ता
यांच्याच बापाची,
आपल्याच चेल्याची
तळी भरायची.
कोणी काहीही म्हणा
इथे माझाच दरारा,
मिळो मला फक्त
खुर्चीचा आसरा.
एकदा का सत्ता आली
पहा मग दादागिरी,
विरोध कोणी करता
करतात त्याला भिकारी.
हे असेच असतात
पुढारी नेते न मंत्री,
जीएसटीच्या नावा खाली
गरिबाच्या खिशाला कात्री.
एक दिवस त्यांना
शिकवा चांगला धडा,
कधी ना कधी भरेल
त्यांच्या पापाचा घडा.
***********************
राजेंद्रकुमार शेळके.
नारायणगाव, पुणे.
