Rajendrakumar Shelke

Tragedy

3.5  

Rajendrakumar Shelke

Tragedy

कलियुग की सतयुग

कलियुग की सतयुग

2 mins
138


*पृथ्वीवर कलियुग संपून "सतयुग" आले की काय ?*


खरंच या कलियुगात आज काय घडेल याची कोणीच कल्पना करू शकत नाही. तंत्रज्ञान, औद्योगिक क्षेत्रात आज नवनवीन प्रयोग यशस्वी होत आहे. परंतु आज या कोरोना नावाच्या एका रोगाने संपूर्ण जगाची व्याख्याच बदलली आहे. याला कारण ही तसेच आहे. आज समाज बदललाय ,माणूस बदललाय अन निसर्गही बदललाय.काळानुसार बदल होणे गरजेचे आहे. पण या एका महाभयंकर रोगाने आज संपूर्ण जग बदलत आहे. कारण आज या धकाधकीच्या जीवनात कोणाला कोणापाशी थांबायला वेळ नाही, बोलायला दोन शब्द नाही पण गेल्या एक महिन्यांपासून सगळे जग स्तब्ध झाले आहे.जो तो शहरे सोडून आज आपल्या गावी खेड्याकडे बसून आहे.पुन्हा एकदा जुन्या काळातील दिनक्रम चालू आहेत जणू काही पृथ्वीवर आज सतयुग अवतरले की काय असे वाटते!त्याचे कारण ही तसेच आहे-


ना रविवार संपण्याची चिंता,

ना सोमवार उजाडण्याची भिती, 

नापैसे कमावण्याची लालसा,

नाखर्च करण्याची धडपड,

ना हाॅटेलात जेवण्याची इच्छा,

ना फिरायला जाण्याची भावना,

 ना सोने चांदी खरेदीचा मोह,

ना,नवे कपडे घालण्याची उत्सुकता,

ना चांगले नटण्या थाटण्याची अभिलाषा... 

जणू काही

*सगळेजण मोक्षाच्या व्दारावर पोहचलो की काय.?

असं वाटतय कलियुग संपून सतयुग आलं आहे.*


आज सगळेच जण आपल्या परिवारासह पूजाअर्चा, उपवास, मस्त वातावरण स्वच्छ निसर्ग, निरोगी हवामान जणू काही संपूर्ण सृष्टीवरील प्रदूषण कमी झाले असेच वाटते. निसर्गाबरोबर आता मनुष्य योनी प्राण्यालाही हायस वाटू लागलं. कारण रोजच धावपळीचं जीवन संपले.सगळ्यांचे जगणे झाले धीरगंभीर. अन या कोरोनाच्या रोगाने एक मात्र बरे झाले ते म्हणजे सगळेच झाले शाकाहारी.आज सर्वजण फक्त खात आहेत दाल रोटी,पालेभाज्या, फळफळावळ अन आरोगी आयुष्य.


*सर्वांना समान हक्क*

आज समाजात बदल मोठ्या प्रमाणावर दिसून येतो. आज सगळेच आलेत एका पातळीवर. जो न्याय राष्ट्रपती, उद्योगपतींना तोच न्याय गावातील जनसामान्यांना. आज सारेच जग चार भिंतींच्या घरात बंद आहे....!कारण आज कोणीही कोणाचा नोकर नाही. घरात सगळे मिळून काम करताहेत, कोणी दागदागिने घालून मिरवत नाही, कोणी महागडे कपडे घालून रुबाब दाखवत नाही, सगळेच दान धर्म करण्याची भाषा बोलतात आणि देवच आता तारणहार म्हणत प्रार्थना करण्यात मग्न आहे कारण जिथे विज्ञान हतबल होते तिथे अध्यात्म कृती करत ही काळ्या दगडावरची रेष आहे. आणि हो 'अहंकार' शांत झाला हे मोठे फलित.आज सारेच लोक एकमेकांना सहकार्य करण्याची भाषा बोलू लागलेत. घर, गावं सोडून नगरवाशी झालेली मुलं आपल्या वृध्द आई वडीलांच्या जवळ येऊन राहात आहेत. यापेक्षा चमत्कार तो कोणता ?


निदान या महामारी रोगाने लोकांना पुन्हा एकदा सतयुगाची जाणीव करून दिली. व खऱ्या अर्थाने महात्मा गांधींच्या खेड्याकडे चला हा कळकलीचा संदेश लोकांच्या मनावर अधिराज्य गाजू लागला. म्हणूनच आज सर्वत्र हेच पहावयास मिळते की खरंच आज हे सतयुग नाही तर काय आहे.? असा प्रश्न उपस्थित राहतो. म्हणूनच पुन्हा एकदा त्या परमेश्वराला मनापासून विनंती करतो की हे *विघ्नहर्ता माणसातला हा बदल कायम राहू दे आणि संपुर्ण सृष्टीवरील हे विघ्न टळून जाऊ दे आणि पुन्हा एकदा माणसातल्या माणसासाठी स्नेहाचे रामराज्य येऊ दे .* एवढीच प्रार्थना🙏🙏


*काळजी घ्या तुमची,तुमच्या परिवाराची,कुटुंबाची,आपल्या गावाची,जिल्याची,राज्याची,देशाची व पर्यायाने या संपूर्ण विश्वाची🙏*

💐💐!! शुभ भवतु !!💐💐

***********************************


Rate this content
Log in

Similar marathi story from Tragedy