तुझीच छबी
तुझीच छबी
🌹🍃🌹🍃🌹🍃🌹🍃
मनात माझ्या
तुझी *कल्पना,*
तुला पाहता
दिस *सरेना.*
हृदय गाभारी
तुला *ठेवले,*
प्रेम भावना
शोधू *लागले.*
प्रित अशीही
सांगु *लागली,*
फुल पाकळी
दवात *न्हाली.*
छेडतो वारा
कुंतल *कानी,*
उंच भरारी
तुला *पाहुनी.*
गाल गुलाबी
ओठ *रसिले,*
पाहून तुला
चिंब *भिजले.*
नखरा भारी
डोळे *शराबी,*
मनी पाहिली
तुझीच *छबी.*
-----------------------------------------
