Avanee Gokhale-Tekale

Drama

3  

Avanee Gokhale-Tekale

Drama

ते घरून काम करत आहेत...

ते घरून काम करत आहेत...

2 mins
574


राजेश एका मोठ्या IT company मध्ये project manager म्हणून काम करत होता.. चालू प्रोजेक्टवरती साधारण ५०० माणसं काम करत होती.. २७ मार्चला project deploy करायचा होता त्याला.. आणि अचानक काही अत्यावश्यक कारणांमुळे त्याला सांगण्यात आले की १७ मार्च ते २७ मार्च सगळ्या टीमला घरून काम करावे लागेल.. 


ढीगभर प्रश्न होते त्याच्यासमोर.. security issues मुळे याआधी प्रत्येक व्यक्तीला घरून काम करण्याचा access दिलेला नव्हता.. बऱ्याच लोकांचे approval घेतल्यावर शेवटी त्याला परवानगी मिळाली आणि मग लोकांच्या access request raise करण्यात आल्या.. high priority वरती त्या approve करण्यात आल्या.. आणि मग खरा खेळ चालू झाला.. 


एकीकडे client मानगुटीवर बसलेला.. काही नवीन नवीन कामावर आलेली मुलं गायबच झाली.. त्यांचे फोन लागेनात, ते कुठे online दिसेनात.. delivery hamper व्हायला लागलेली.. त्यांच्याकडून फक्त फोनवरती काम करून घेता घेता त्याचा २५ वर्षाचा अनुभव पणाला लागत होता.. कधी कधी त्याला स्वभावाच्या विरुद्ध जाऊन कठोर बोलून काम करून घेणं भाग होतं.. अशा वेळेला तर त्याला खलनायक ठरवून त्याच्यावरती जोक पण पसरायला लागले होते.. 


आणि दुसरीकडे बायको पण घरून काम करत होती.. दोन्ही मुलांना सुट्ट्या लागलेल्या.. नाही म्हटलं तरी त्याच्या कामावरसुद्धा परिणाम होतच होता.. घरच्यांना पण वेळ द्यावा वाटायचा.. काम पण सोडता येत नव्हतं.. घरातल्या मावशीबाईपण गावी गेल्या होत्या.. मी पण जाते बरंका थोडे दिवस work from home म्हणून.. मावशीबाई पसार झाल्यावर बायकोने फक्त त्याच्याकडे पाहिलं.. आणि मग त्याला संभाव्य धोक्यांचे इशारे मिळायला लागले.. मधूनच "तुमची काय मजा चालू आहे घरी बसून.. करा करा मस्त अराम करा" असे दुरून डोंगर साजरे वाटणारे लोक बोलायला लागले होते त्याला.. 


पण काही सिनियर लोक स्वतःची जबाबदारी समजून जास्त काम करत होती.. त्यांच्यामुळे थोडी तरी राजेशला आशा होती.. दिवस-रात्र जसे आणि जेव्हा वेळ मिळेल तेव्हा हे लोक काम करत होते.. काही लहान मुलं असलेले लोक रात्री मुलांना झोपवून काम करायला बसत होते उशिरापर्यंत.. काही बायका कुकरच्या शिट्या मोजत मोजत कोडींग करत होत्या.. काही लोक सकाळी मुलं उठायच्या आत मांडीवर लॅपटॉप घेऊन बसायचे.. कुकरच्या शिट्या, मुलांचे रडणे, समजावणे हे पाठीमागे चालू असलेले आवाज नित्याचे झाले होते.. पण काही म्हणा लांब बसून सगळे जवळ यायला लागले होते.. थोडी कामासोबतच एकमेकांच्या घरची चौकशी करायला लागलेले.. 


सगळ्या धुमश्चक्रीमधून त्याच्या टीमने project केला deploy अखेर दिलेल्या वेळेला आणि मग सुटकेचा श्वास घेतला सगळ्यांनी.. आणि कधी नाही ते सगळेच वाट बघू लागले.. रात्र संपण्याची.. नव्याने उगवणाऱ्या सुर्याची..!!!


Rate this content
Log in

Similar marathi story from Drama