Avanee Gokhale-Tekale

Others

4.0  

Avanee Gokhale-Tekale

Others

माझ्या घरातील कृष्ण..

माझ्या घरातील कृष्ण..

2 mins
3.3K


आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर आपल्याला कृष्ण भेटत राहतो.. प्रत्येक वेळा भेटणारा कृष्ण वेगळा .. त्याला सामोरे जाणारे आपले रूपही वेगaळे . कधी आपण यशोदा असतो, कधी राधा, कधी रुक्मिणी, कधी मीरा, कधी द्रौपदी.. एवढंच काय कधी आपण अर्जुन असतो, कधी राधेय, कधी उद्धव तर कधी स्वतः कृष्ण ही.. काहींना कृष्ण देव्हाऱ्यात रंगनाथ म्हणून दिसतो तर काहींना तो चालत्या बोलत्या माणसात.. पण भेटतो मात्र नक्की.. 

आपण लहान असतो.. शाळकरी मित्र जमवून हैदोस घालणारे.. त्यात आपल्या group चा leader आपला कृष्ण असतो आणि आपण आपले पेंद्या.. पण तो कृष्ण आपल्याला सामावून घेतो.. आपल्यामधल्या माणसाला हळूहळू प्रगभ करतो.. आता आपण शाळेतून बाहेर पडून कॉलेज मध्ये येतो.. आपले विश्व बदलत जाते तसे मैत्रीच्या व्याख्याही.. पण त्या मित्रांच्या ग्रुप मध्ये पण काही मुलं खूप जबाबदार असतात.. घरच्यांचा पण त्यांच्यावर नितांत विश्वास असतो.. की ते आहेत ना सोबत मग जा बिनधास्त.. ही मुलं आपले मित्र तर असतातच.. पण त्याच बरोबर आपली काळजी सुध्धा घेतात..गैरफायदा तर सोडाच पण प्रसंगी टवाळ मुलांपासून आपल्याला जपतात सुध्धा.. अशा वेळी ते आपला कृष्ण असतात आणि अापण द्रौपदी.. 

आणि मग हळूहळू पंखात बळ येऊन पंख झेप घ्यायला बघतात.. आयुष्याला एक स्थैर्य यावं वाटत.. आपल्याला वाटायला लागत की आपणही कोणाची तरी राधा व्हावं, रुक्मिणी व्हावं.. आपल्या आयुष्यात त्या वेळेला आपला नवरा भेटतो कृष्ण म्हणून.. आपल सुखदुःख वाटून घेणारा हक्काचा सखा, सोबती.. 

आणि मग या रुक्मिणी ची नकळत यशोदा होऊन जाते.. आणि ताक घुसळत असताना तिचा कृष्ण/राधा लोण्याचा गोळा कधी येऊन फस्त करतात तिलाही कळत नाही.. त्या बाललीला बघण्यात ती गुंगून जाते.. कधी ती प्रेमळ तक्रारी करते तर कधी कौतुक सांगते.. पण ती सतत बोलते मात्र आपल्या लेकराबद्दलच.. 

घरचे सांभाळत उंबरठा ओलांडून ऑफिस मध्ये पाऊल ठेवतो आपण आणि सामना होतो तो corporate politics शी.. अशा वेळी आपल्याला योग्य मार्ग दाखवणारा, कणखर व्हायला शिकवणारा एखादा senior भेटतो.. तेव्हा तो कृष्ण असतो आणि आपण सारे अर्जुन..

मोठा भाऊ कामानिमित्त परदेशी.. घरच्यांच्या मनात काळजी, विरह, अभिमान, कौतुक सगळेच मिश्र भाव.. तो जाणार म्हणून उदास घराला सावरायची वेळ येते ती धाकट्या भावंडांवर.. अशा वेळी धाकटे भावंड उद्धव तर मोठा भाऊ कृष्ण..

कधीकधी आपणच खंबीर राहून सगळी सूत्रे हाती घ्यावी लागतात.. घराचा आधारस्तंभ होऊन उभ राहायला लागतं.. अशा वेळी रथाची दोरी आपल्या हातात असते.. आणि या विशाल महाभारताचे तेव्हा आपणच असतो कृष्ण!!!


Rate this content
Log in