End of Summer Sale for children. Apply code SUMM100 at checkout!
End of Summer Sale for children. Apply code SUMM100 at checkout!

Avanee Gokhale-Tekale

Tragedy


3  

Avanee Gokhale-Tekale

Tragedy


आश्मान...!

आश्मान...!

6 mins 340 6 mins 340

१ महिन्यापूर्वी...


आज भैरवी-आश्मानच लग्न.. भैरवी माझी शाळेपासूनची मैत्रीण.. त्याच लग्नात एका मुलीशी ओळख झाली.. उर्वी.. उर्वीला बघून काही कळत नव्हतं.. "कोणाची कोण असेल ही?" भैरवीची तर मैत्रीण नक्कीच नव्हती.. कारण भैरवीच्या सगळया मैत्रिणींना मी ओळखते.. आश्मानची मैत्रीण म्हणावी तर त्याच्या मित्रांमध्ये पण ती सामील होत नव्हती.. आणि नातेवाईकात पण नाही.. लग्न लागल्यावर एक लढाई जिंकल्याच्या आविर्भावात तिनी एक नजर स्टेजकडे टाकली.. आणि ती कार्यालयातून निघून गेली..


आज...


मला उर्वी भेटली अचानक.. वेश्या वस्तीमधील मुलांसाठी ती काम करत होती...हाडाची सोशल वर्कर.. मनापासून लोकांचे प्रॉब्लेम्स स्वतःचे समजून हँडल करणारी.. त्यातच समाधान वाटणारी.. आणि आम्ही आपले ऑफिसमधून चेंज म्हणून सोशल वर्क करायला गेलेले.. चहाच्या वेळी सहज गप्पा चालू होत्या.. आणि मग त्या गप्पांत मला त्या दिवशी पडलेल्या "कोणाची कोण असेल ही?"चं उत्तर मिळालं जे फारच अनपेक्षित होते.. आणि तिच्यासाठी ही स्टोरी लिहावीशी वाटली..


१ वर्षापूर्वी...


आश्मान आणि उर्वी दोघं बघाबघीच्या कार्यक्रमात पहिल्यांदा भेटलेले.. तिचे आणि त्याचे सगळे विचार, सगळया आवडीनिवडी जुळत गेल्या.. अगदी खाण्यापिण्याच्या, झोपण्या- उठण्याच्या सवयींपासून कौटुंबिक स्थिती, छंद, करिअर, नोकरी, फ्रेंड सर्कल, थोडक्यात म्हणजे पहिल्यांदा भेटण्यात जे जमायला पाहिजे ते सगळं जमलं.. पण आश्मानच्या घरून नकार आला.. आणि तो विषय तिथेच थांबला..


(उर्वी हे सांगत असताना मी एकदा परत बघितलं तिच्याकडे. आश्मान दिसायला हॅंडसम कॅटेगरीमध्ये मोडेल असा.. वागण्याृबोलण्यातून एखाद्या मुलीला पटकन आकर्षित करेल असा.. समोरच्या व्यक्तीच्या काळजाचा ठाव घेणारे डोळे, मुलींच्या दृष्टीने स्वप्नातला राजकुमार.. त्याचं लग्न झालं ती माझी मैत्रीण पण लाखात एक दिसेल अशी आणि त्याची जाणीव असणारी.. आम्ही तर भैरवीला खूप चिडवलं होतं लग्नात... भैरवी आणि आश्मानचा जोडा शोभून दिसेल असा.. परत एकदा भैरवी आणि उर्वीची तुलना झाली उगीचच.. त्या मानाने उर्वी अगदीच सामान्य.. डोळे प्रचंड करारी, एका नजरेत तिच्यामधला आत्मविश्वास पोचला होता माझ्यापर्यंत.. पण सावळी.. दिसायला चार चौघींसारखी ..आश्मानला बघताच क्षणी आकर्षित करेल अशी मुलगी हवी असणार.. नकाराचं कारण स्पष्ट माझ्यासमोर बसलं होतं..)


तसं पण ती एक स्थळ एवढंच बघत होती त्याच्याकडे.. त्यामुळे तिला फार फरक पडला नव्हता या सगळ्याचा.. नकार आल्यावर ती आपल्या मार्गाला लागली, परत तिचे तेच कांदेपोहे चालू राहिले..


८ महिन्यांपूर्वी..


उर्वी: "आश्मान, तू हे चांगलं नाही केलंस.. तू मला तेव्हा सांगायला हवं होतं.. तुझ्या आयुष्याचा खूप गुंता झाला आहे.. निदान मैत्रीण म्हणून तर मला सांगायचं हे सगळं..

आश्मान: हो, पण उर्वी एक विसरते आहेस तू.. आपण बघाबघीच्या कार्यक्रमात समोर आलो होतो तेव्हा.. तू माझी मैत्रीण असतीस तर हे सगळं तुला आधीपासूनच माहित असतं.. सांगायची आवश्यकता पडली नसती.. आणि मी तुला तसं पण नंतर सांगणार होतो.. पण मला वाटलं नाही आपले लग्नाचे पुढे काही बोलणे होईल.. त्यामुळे नाही सांगितलं.. मला आधीच खूप मनस्ताप झाला आहे, उर्वी.. खूप गिल्ट सहन केलं आहे आत्तापर्यंत.. प्रेमभंग झालेला.. मग एक लग्न ठरून मोडलेले.. खूप टोमणे ऐकले आहेत लोकांचे.. खूप त्रास होतोय मला या सगळ्याचा.. आता शांतता हवी आहे.. मला आता अजून एक मनस्ताप नको आहे उर्वी.. तुला जो काय त्रास झाला त्याबद्दल माफ कर मला.. आपण नको भेटायला परत..


जेव्हा आश्मानबद्दल उर्वीला कळलं तेव्हा ती थोडी चिडली होती.. आपल्यापासून काहीतरी लपवलं गेल्याची भावना उसळली तिच्या मनात.. आणि तिनी त्याची उलट तपासणी घेण्यासाठी भेटायला बोलावलं होतं.. पण आता मात्र तिच्या नकळत त्याच्या बोलण्यात ती अडकत चालली होती.. त्याच बोलणं तिला पटत होत.. त्याच्या डोळ्यात तिनी खरे पणा तर बघितलाच पण तिला हे कळल कि हा व्यक्ती कोणाला धोका नाही देऊ शकत कधी.. जे त्याच्या मनाला वाटेल तेच तो करत असणार.. खूप हळवा झाला होता तो तेव्हा.. डोळे भरले होते त्याचे.. फक्त तिच्या समोर तो डोळ्यातला पाणी बाहेर येऊ देत नव्हता.. एवढ सगळं होऊन पण त्याच्या मधला माणूस जिवंत होता.. समोरच्याला होण्यार्या त्रासांनी तो स्वताला त्रास करून घेत होता,.. आज त्याचा स्वतःवरच विश्वास राहिला नव्हता.. लग्न वगैरे या सगळ्याचा विचार करायची त्याची आत्ता मनस्थिती नव्हती.. त्याच्या मधला आत्मविश्वास हरवला होता..

तिला त्याही परिस्थितीत याचा आनंद झाला कि आपण माणसाची पारख करायला नाही चुकलो.. या मुलामध्ये खरेपणा आहे.. खरच सुसंस्कारी आणि माणसाच्या भावनांची कदर असणारा.. समोरच्याला समजून घेणारा.. 

त्याच बरोबर तो खूप एकटा आहे आणि त्याला आत्ता एका चांगल्या मित्राची गरज आहे हे तिला पहिल्या बघाबघीतच कळल होतं.. पण त्याच कारण तिला तेव्हा कळल नव्हत.. आता ते कळल्यावर तिच्या मधला माणूस तिला शांत बसू देत नव्हता..


६ महिन्यांपूर्वी..


उर्वी आणि आश्मान ची आता खूप चांगली मैत्री झाली होती.. इतके दिवस ते मित्र पण नव्हते, आणि कुठल्या नात्यात पण नव्हते.. त्या नात्याला काहीच नाते नव्हते.. बोलताना त्यांना कळत नव्हते आपण का बोलत आहोत, का भेटत आहोत.. पण आता त्यांची इतकी चांगली मैत्री झाली होती कि हे सगळे प्रश्न गळून पडले होते.. दोघं शेजारी बसल्यावर काही ना बोलता त्यांना एकमेकांच्या मनातले विचार कळायला लागले होते.. उर्वी त्याला वर्तमानात आणण्यासाठी खूप प्रयत्न करत होती..


उर्वी: आश्मान, आता बाहेर यायला पाहिजे यातून.. किती दिवस आता हा ताण घेणारेस डोक्यावर.. आणि घरच्यांचा तर विचार कर.. आता विचार कर लग्नाचा.. मी बघू का मुली तुझ्यासाठी? घरी बोलू का तुझ्या?

आश्मान..आता मला पण वाटत आहे.. खूप झाला एकट जगणं .. आता आयुष्यात पुढचं पाऊल टाकायची वेळ आली आहे.. 


४ महिन्यांपूर्वी..


उर्वी, आज एका मुलीला भेटलो.. चांगली आहे तशी.. पण माझ परत तोच गोन्धळ होत आहे.. एक दोन भेटीत मी मुलीला ओळखू शकत नाही.. आणि जास्त वेळ पण घेता येणार नाहीये या बघाबघी मध्ये.. काय करू?


उर्वी: मुलगी कशी आहे? तुला समजून घेईल ना? घरच्यांची काळजी घेईल ना? काय शिकली आहे? कशी आहे दिसायला? कुठे job करते? मला नाव सांग आणि कुठे राहते, काहीतरी सांग मी माहिती काढते.. बघू आपण मुलगी कशी आहे.. वेळ द्या थोडा एकमेकांना.. एक दोन भेटीत ती कशी आहे ते नाही कळणार तुला.. तिला पण वेळ दे तुला समजून घ्यायला.. "तुझा स्वभाव कसा आहे" असं तिला विचारू नको.. ते समजून घ्यायचा प्रयत्न कर.. आणि हे नात फुलायला वेळ द्यायला लागतो.. उगाच घाई करू नको.. जोडण्याची पण आणि तोडण्याची पण.. कमी बोल.. जास्त ऐकून घे.. समजून घे..आणि उगाच काहीतरी भाषण झोडू नको तिला.. पळून जाईल ती..


आश्मान: उर्वी, अग शांत हो.. तुला जरा पण दम नसतो ना कुठल्या गोष्टीमध्ये? किती बडबड, किती घाई.. स्वस्थ बस ना जरा.. थांब ना सांगत आहे ना सगळे हळूहळू.. 


३ महिन्यापूर्वी..


भैरवी: मी आश्मान कडून तुझ्या बद्दल बरच ऐकल आहे.. तुमच्या मैत्रीबद्दल भरभरून बोलतो तो.. तुझे खूप आभार उर्वी.. तू आश्मान ला जर रूळावर आणलं नसत तर आज आमच लग्न ठरलं नसत.. त्याच्या मधला confidence , decision making power तू परत आणलीस.. आणि हो.. तो माझा नाव का बदलणार आहे? तुला तर माहित असेलच..

उर्वी: मी काहीच केला नाही भैरवी.. आश्मान चा अर्थच मुळात सूर्यासारखा तेजस्वी.. ते तेज होतच त्याच्या मध्ये.. 

त्याच्या मनात झालेला गुंता फक्त मी सोडवला.. त्याच्या गिटार चा ट्युनिंग गेलं होत.. त्यामुळे notations बरोबर असून पण गाण बिघडलं होत.. fine tune केल्यावर आता परत guitar छान वाजायला लागली.. पण मुळात हे विसरू नको.. आश्मान पहिल्यापासूनच उत्कृष्ठ guitar वाजवतो..ते मी नाही शिकवलं.. मी फक्त tuning केलं..

आणि नावाच म्हणशील तर तुझा नाव शाल्मली.. एवढ चांगल नाव बदलून तो भैरवी ठेवणार आहे त्याबद्दल वैतागली असशील ना? चिडू नको.. अर्थ समजून घे म्हणजे राग जाईल तुझा..

भैरवी म्हणजे सगळया रागांमधला शेवटचा राग.. त्याच्या आयुष्यातली तू अशी मुलगी आहेस जी त्याला त्याच्या आयुष्याच्या शेवटपर्यंत साथ देशील..


आज..


उर्वी, hats off !! .. तू त्याच्या आयुष्याचा गुंता सोडवला.. त्याच तर लग्न लावून दिलास पण तुझ्या लग्नाचं काय? तुझा एकटेपणा?

उर्वी: अग माझा कसला एकटेपणा? मी खूप मजेत आणि समाधानात आहे.. खूप साधं आयुष्य जगतेय.. जे मनाला योग्य वाटेल ते करतेय... आणि लग्नाच्या बाबतीत म्हणशील तर ज्या दिवशी मी एखाद्या स्थळाकडे practically विचार करून फक्त "लग्नाचा मुलगा" म्हणून बघीन आणि माझा social work मध्ये नाही आणणार त्या क्षणाला लगेच माझं लग्न ठरलेला असेल :) आणि हो अवनी,हे सगळं ऐकून तू घरी गेल्यावर लिखाण करशीलच, त्याला नाव पण देशील.. नाव देताना एकच काम कर.. तुझ्या कथेचं नाव "उर्वी" नको देऊ.. कारण या कथेत उर्वी नाहीच कुठे.. ही कथा फक्त "आश्मान" ची आहे..!!!Rate this content
Log in

More marathi story from Avanee Gokhale-Tekale

Similar marathi story from Tragedy