तानाबाई...!
तानाबाई...!


गावाकडे एखादी व्यक्ती एकदा घरास चिकटली की कायम चीकटून रहायची.आता सारख पर्मनंट होण्याची वाट वगैरे पहावी लागत नसे.जिवाभावाची नाती आपोआप तयार व्हायची.त्या नात्यातल एक नात म्हणजे आमची तानाबाई. तीच नाव तानाबाई तोडकर,ती सकाळ संध्याकाळची भांडी घासायची आणि दिवसभर शेतावर काम करायची,लहान पणापासून तिचा सहवास फार मजेशीर लाभला.ती शिकली सवरली नव्हती पण तीन श्रद्धा म्हणजे काय हे मात्र दाखवून दिलं.
एकदा दुपारी आली आणि अण्णा डोकं दुखतंय म्हणाली.बहुतेक भुकेन दुखत असावं म्हणून तिला प्रथम जेवायला सांगितलं आणि गोळी देतो म्हणून सांगितलं. तीच जेवण होई पर्यंत खडूची गोळी तयार केली आणि तिला देवाला नमस्कार करायला सांगितले आणि गोळी दिली.
भोळी भाबडी तानाबाई,तीन नमस्कार केला आणि गोळी घेतली,तिची इतकी श्रद्धा की तिची डोके दुःखी थांबली आणि पुन्हा ती शेतावर कामाला गेली.
पण जाता जाता तिच्या निरागस पणाने श्रद्धा म्हणजे काय हे दाखवून दिले.श्रद्धा म्हणजे दुसरं तिसरी काही नाही दृढ विश्वास म्हणजेच श्रद्धा..!
आजही तिच्या मुळे माझा माझ्यावर विश्वास टिकून आहे ,जीवना वरची श्रद्धा अटल आहे.
तिच्या आठवणीने सुद्धा बर वाटत.आशा अनेक तानाबाई आहेत म्हणून जीवन सुखमय होत इतकं मात्र खरं....!