Deepali Rao

Inspirational

4.0  

Deepali Rao

Inspirational

स्वातंत्र्य...

स्वातंत्र्य...

4 mins
58


गावातलं वातावरण सुन्न झालं होतं 

आज कोणाला काहीच सुचत नव्हतं

ती... दहशतवाद्यांशी लढताना वीरगती प्राप्त झालेल्या नवऱ्याला घेऊन येणाऱ्यांची भरल्या डोळ्यांनी वाट बघत होती.... 

तिरंग्यात लपेटलेला नवरा बघून काळीज हललं तिचं  

जोरानं हंबरडा फोडला 

दोघं पोरं ...शाळकरी वयातली ... आईच्या पदराआड लपून भांबावलेल्या नजरांनी पहात होती सारं

 बापावेगळ्या पोरांची सारी जबाबदारी आता तिच्यावरच 

 उत्तम रित्या पार पाडली एकटीनं...दु:ख मनात दडपून

 चार-पाच वर्षा खालीच मिलिटरीमध्ये जॉईन झाला मोठा मुलगा. 

त्यालाही लढायचं होतं देशासाठी

 भरभक्कम पाठबळ दिलं हिनं 

 पोस्टिंग लागलं दूर तिकडे जम्मू-काश्मिरात 

इकडे हिच मन बावरलं..

पुन्हा तेच ठिकाण...जिथून तिचा नवरा तिच्या नजरेआड झाला होता कायमचा..

.....आज कितीतरी दिवसांनी मुलगा सुट्टीवर येणार 

 त्याचे सगळे लाड, हट्ट पुरवणार ती


तो आला. तिच्यासहित .. गावकरीही हजर

त्याचं कोड कौतुक करायला

दिवस असे मजेत जात होते

 त्याला जाणवलं...

लहान भाऊ कॉलेजमध्ये शिकता शिकता मित्रांमध्येही बराच रमायला लागला होता.

 टोळकी करून नाक्यावर उभं राहायचं, 

 गप्पा ठोकायच्या, 

मजा..मस्ती ..यातच लहान्याचा आनंद 

 निवडणुकांचे वारे 

चहुकडे फिरणारे

मग काय यांचं मित्रांचं टोळकं कुठल्यातरी पक्षाच्या पाट्या घेऊन दिवसभर गावामध्ये धुडगुस 

 नंतर नंतर पक्षा-पक्षांच्या आरोपांच्या फैरी

 गावातलं वातावरण एकदम तंग 

 सगळी एकाच गावातली मुलं..

एकमेकांच्या विरोधात उभी ठाकली 

त्या दिवशी सकाळी खूप हाणामारी झाली

 दोन पक्षांच्या या "सेल्फ डिक्लेअर्ड" कार्यकर्त्यांमध्ये

 डोकी फुटली..हात-पाय फ्रॅक्चर ...गाड्यांची नुकसानी ..नुसताच धिंगाणा


....लहान्याला बघायला तो आणि आई हॉस्पिटलमध्ये आले. आईनंही खूपदा कळकळून सांगितलं होतं त्याला याआधी, त्याच्या वागण्याबद्दल. .पण तो मित्रांनाच सर्वस्व मानत होता

वेळ आली आहे.... 

आता बोललंच पाहिजे.....फौजीनं मनाशी ठरवलं

मग छोटा भाऊ आणि त्याचे मित्र दवाखान्यातून घरी आल्यानंतर त्यानं रात्री गावातल्या सगळ्या मुलांची मिटिंग घेतली

"अरे ! या निवडणुका दर पाच वर्षांनी येणार . 

पक्षाशी निष्ठा..फार चांगली गोष्ट

 पण त्यासाठी विरुद्ध पक्ष वाईट ठरवून तुम्ही इथेच एकमेकांशी का मारामाऱ्या, भांडणं. 

पक्षांचे अधिकारी .. उमेदवार...त्यांना त्यांची मतं नक्कीच मांडण्याचा अधिकार 

 निवडून आल्यानंतर ते काय कार्य करतील त्याचा तपशील योग्यरीत्या देणं हे त्यांचं कामच

 पण मग कुठेही ..कधीही.. कुठल्याही भाषणांमध्ये तुम्हाला ते असं सांगतात का? ...कमेकांशी लढा..विरुद्ध पक्षाच्या लोकांना नामोहरम करा...नाही...

उमेदवार त्यांचं काम करतात

 तुम्ही तुमचं काम करा

ज्याची मतं तुमच्या ह्रदयाला पटतील..भावतील..त्यालाच निवडून द्या. 

राहिली तुमची गोष्ट.. 

चांगला नागरिक बना.. स्वत:च उत्तम भविष्य घडवा

मारामाऱ्या, भांडणं करून कुठलंही करीयर घडणार नाही 

 अजुनही वेळ गेली नाही

 सुधारा! ! 

 इतकीच खुमखुमी आहे अंगात तर ... 

उठवा आवाज त्या आई- बहिणींसाठी..ज्यांच्यावर आजही अनन्वित अत्याचार होत आहेत 

बळी जात आहेत ज्यांचे हकनाक

लढा पण.. अन्यायाविरुद्ध...दहशतवाद्यांविरुद्ध...

देशासाठी ...एकीसाठी लढा !

सीमेवर लढताना सांडू द्या तुमचं रक्त ज्यातून असंख्य वीर योद्धे पुन्हा पुन्हा जन्माला येतील

तुमची बुद्धी , तुमची ताकद तिथे उपयोगी आणा "

पोटतिडकीने बोलत होता तो ..

   घरी आल्यावर लहान्यानं वेडात काढला त्याला ,

"काय लेक्चर देतोरं

 उबग आला ऐकून 

सारखं सारखं तेच तेच

 पंक्चर झालाय मेंदू आता"

 मोठ्याला समजलं आत्ता बोलण्यात काहीच अर्थ नाही.

...परतीची वेळ जवळ येत होती

 सुट्टी संपायला लागली होती

 "आता पुढल्या वेळेस आलास की लग्नाचं पक्क करून टाकू तुझ्या. लहान्याचंही शिक्षण संपत आलयं. मी तरी एकटीने किती दिवस सांभाळायचं घर", आई हसत हसत म्हणाली

 तोही लाजला 

"अग आई ! 

पहिली कमिटमेंट देशाशी... 

 अन् दुसरी स्वतःशी

ठरवलंय मी.. काही काळानं कायमचा परत येईन...तुझ्या आयुष्यातलं. .नशिबातलं सगळं सुख तुझ्या ओंजळीत टाकेन" 

  आईला जवळ घेत फौजीनं म्हटलं. 

 आईच्या उरात अभिमान पेटला

 म्हणता म्हणता जायचा दिवस उजाडला

 साश्रुनयनांनी त्यानं आईच्या पायांवर डोकं ठेवलं.


 सारा गाव लोटला निरोप द्यायला 

छोट्याला त्यानं टपली मारत जवळ घेतलं "लक्ष दे रे आईकडे...घराकडे आणि हो तुझ्या भविष्याकडेही. 

बघ जमलं तर मी जे सांगितलं त्यावर नीट विचार कर"

   तो गाडीत बसला..गाडी सुरु झाली 

 आईच्या आणि भावाच्या गळ्यात आवंढा दाटून आला.

 गाडी पार नजरेसमोरून दिसेनाशी होस्तवर अच्छा करत रस्त्यावरच उभे राहिले ते. 

दिवस सरत होते.... 

आणि एके दिवशी टीव्हीवर, नेटवर, सोशल मीडियाच्या सगळ्या साइट्सवर त्याच बातम्या ..

पुलवामा ॲटॅक...

कितीतरी जवान शहीद

 छिन्नविछिन्न देह

इतस्ततः पसरलेले

सगळीकडे रक्त मांसाचा चिखल 

आक्रोश...आक्रंदन

इकडे गावाकडे आई सैरभैर 

 तिचे चित्त थाऱ्यावर राही ना 

छोट्याला म्हणत राहिली

"बघ ना रे फोन करून

 तो बरा आहे ना? 

सगळं ठीकठाक आहे ना? "

 कळायला मार्गच नव्हता काही

 दिवस उगवत होता आणि मावळत होता

 रोज परत परत संभ्रमात टाकत होता.. 

 बेचैनी त्या दोघांनाही आता सोसवत नव्हती

 .... फोन आला अन् पायाखालची जमीनच हादरली...

त्याचा उधडलेला देह घेऊन येत होते...थोड्याच अवधीत

 आभाळच कोसळलं  

काळानं असा दावा साधला ...

आज तिचा मोठा लेक.... 

लेकाचं स्वप्न..तिच्या कुशीत पुन्हा लहान होऊन निजण्याचं

 पण ही झोप..काळ झोप ...चिरनिद्रा

...सरकारी इतमामात त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले..

एका वीरगती प्राप्त झालेल्या जवानाला साजेसे

 आईला बढती.. नकोशी असलेली

वीरपत्नी....आता वीरमाता  

  लहान्याच्या मनावर भावाच्या शब्दांनी कोरलेली रेघ गडद झाली

 गावातल्या मुलांचा जीव गलबलला 

"काय जगत होतो यार आजपर्यंत 

कुठे जात होतो..भरकटलो होतो पार

 डोकी ठिकाणावर आली

 पेटून उठले सारे

 थैमान चालू होतं डोक्यात 

सापडलं....काहींना ध्येय सापडलं 

काहींची अजून वेगळीच टार्गेट

बदला?  

बदला.....तर घेतलाच पाहिजे"

  थोड्याच महिन्यांत गावात वेगळंच दृश्य

आठवडाभर गावात गडबड

त्यांचीच हवा... 

गावकर् यांचे चेहरे मनात दु:ख लपवून तटस्थपण मिरवणारे... 

चेहऱ्यावर एक वेगळीच अपूर्वाई.. वेगळच अप्रुप


१५ऑगस्ट ,स्वातंत्र्य दिवस.. 

भारावून टाकणारे शब्द आणि गावातलं वातावरण. 

स्वातंत्र्याचा खरा अर्थ आज प्रत्येकाला कळला होता आणि ते स्वातंत्र्य अबाधित ठेवणं किती गरजेचं हे ही उमगलेलं. दिवसभर वेशीवर औक्षणं.. 

ते डोळ्यात आलेलं पाणी परतवून हास्यवदनी.. अभिमानानं दिलेले निरोप


....त्या नाक्यावरच्या टोळक्यातले "स्वयंघोषित" कार्यकर्ते निवडले गेले. 

कार्यकर्त्यांचं पोस्टिंग लागलेलं

...कुणाचं पोलीस भरतीत.. कुणाचं मिलिट्रीत.... 


सद् रक्षणाय खल निग्रहणाय!! 

जय हिंद !! जय भारत


Rate this content
Log in

Similar marathi story from Inspirational